नांदेड

तब्बल अकरा तास चाललेल्या समनव्य समिती बैठकीतून अनेक कामे,योजनांना संजीवनी; सीईओ ठाकूर यांनी घेतला मॅरेथॉन आढावा

नांदेड,बातमी24- जिल्हा परिषदेच्या वतीने बुधवारी घेण्यात आलेली समनव्य सभा रेकोर्ड ब्रेक ठरली.जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकारी वर्षा ठाकूर यांनी तब्बल अकरा तास बैठक घेऊन विविध योजनांचा आढावा घेत प्रलंबित कामांना संजीवनी देत गतिमान प्रशासनाची प्रचिती दिली. या सभेतून त्यांनी मराठवाडा मुक्ती संग्रामाच्‍या स्वातंत्र्य महोत्सवाच्या औचित्याने विभागीय आयुक्तांनी दिलेल्या सर्व उपक्रमांची अंमलबजावणी अत्यंत प्रभावीपणे करावी, यासाठी विशेष उपक्रम आयोजित करावेत अशा सूचना वर्षा ठाकूर यांनी दिल्या.

बुधवार दिनांक 16 नोव्हेंबर रोजी जिल्हा परिषदेच्या कै. यशवंतराव चव्हाण सभागृहात मुख्य कार्यकारी अधिकारी वर्षा ठाकूर-घुगे यांच्या अध्यक्षतेखाली समन्‍वय सभा घेण्यात आली, त्यावेळी त्या बोलत होत्या. यावेळी जिल्हा ग्रामीण विकास योजनेचे प्रकल्प संचालक डॉ. संतोष तुबाकले, उप मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. सुधीर ठोंबरे, व्‍ही.आर. पाटील, नारायण मिसाळ, रेखा काळम-कदम, कार्यकारी अभियंता नीला, शिक्षणाधिकारी प्रशांत दिग्रसकर, डॉ. सविता बिरगे यांच्यासह खाते प्रमुखांची उपस्थिती होती.

पुढे त्‍या म्‍हणाल्‍या, संत गाडगेबाबा ग्रामस्वच्छता अभियान नव्या स्वरूपामध्ये सुरू झाले असून सर्व गट विकास अधिकाऱ्यांनी त्यांच्या अधिनस्त गावांना या अभियानात सहभागी करून घ्यावे. तसेच 19 नोव्हेंबर रोजी जागतिक शौचालय दिनानिमित्त गाव स्तरावर वैयक्तिक तसेच सार्वजनिक शौचालय बांधकामाचा शुभारंभ, शाळा व अंगणवाडी मधील शौचालयाची स्वच्छता मोहिम राबविण्‍याच्‍या सूचनाही मुख्य कार्यकारी अधिकारी वर्षा ठाकूर दिल्‍या.

 

समाजाप्रती बांधिलकी जपणारे खूप लोक आहेत. शासकीय सेवा करून पेन्शन घेतलेल्या मंडळींना काहीतरी करण्याची इच्छा असते. सेवा देण्याची इच्छा असते. त्यांच्या सेवा आपण आपल्या शाळा, ग्रामपंचायत तसेच विविध आस्थापनावर घेऊ शकतो. यासाठी गाव पातळीवर प्रयत्न व्हावेत. समाजा प्रतीची कृतज्ञता म्हणून त्यांच्या सेवांचा लाभ आपणास घेता येईल त्या दृष्टीने नियोजन करण्या सूचनाही मुख्‍य कार्यकारी अधिकारी वर्षा ठाकूर-घुगे यांनी दिल्‍या. मराठावाडा मुक्‍ती संग्रामाच्‍या अमृत मोहत्‍सवी वर्षानिमित्‍त माजी सैनिक व त्‍यांचे वारसदार व पेन्‍शनर्स यांच्‍यासाठी कृतज्ञता कार्यक्रमाचे आयोजन करण्‍याच्‍या सूचना दिल्‍या. मराठावाडा मुक्‍ती संग्रामाच्‍या अमृत मोहत्‍सवी वर्षानिमित्‍त वर्षभर विविध उपक्रम राबवण्‍याचे कॅलंडर तयार करण्‍यात येणार आहे. त्‍यानुसार कायक्रम राबवावेत असेही त्‍या म्‍हणाल्‍या. प्रारंभी जिल्‍हा परिषदेच्‍या कै. यशवंतराव चव्‍हाण सभागृहाच्‍या नुतनिकरणाचे उद्घाटन मुख्‍य कार्यकारी अधिकरी वर्षा ठाकूर-घुगे यांच्‍या हस्‍ते करण्‍यात आले.

याप्रसंगी महाराष्ट्र जिवन्‍नोती अभियान, महिला व बाल विकास, जिल्हा ग्रामीण विकास यंत्रणा, नरेगा, कृषी, ग्राम पंचायत, समाज कल्याण, पशुसंवर्धन, पाणीपुरवठा, स्वच्छ भारत मिशन, बांधकाम विभाग, आरोग्य, जलसंधारण विभाग आदी विभागांचा आढावा त्‍यांनी यावेळी घेतला.

चौकट

मनरेगाची राज्यात उत्कृष्ट कामगिरी

मनरेगाच्या महत्त्वाच्या निर्देशांकामध्ये नांदेड जिल्ह्याची राज्यात सर्वोत्कृष्ट कामगिरी केली आहे. त्याबद्दल मनरेगाचे आयुक्त शंतनू गोयल यांनी मुख्य कार्यकारी अधिकारी वर्षा ठाकूर-घुगे यांना पत्र पाठवून कौतुक केले आहे. या उत्‍कृष्‍ट काम‍गिरीबद्दल नरेगाचे उप मुख्य कार्यकारी अधिकारी व्‍ही.आर. पाटील व नरेगा कक्षातील कर्मचाऱ्यांचा मुख्य कार्यकारी अधिकारी वर्षा ठाकूर यांनी बुके देऊन सत्कार केला.

जयपाल वाघमारे - संपादक

Recent Posts

आंबेडकरी चळवळीच लोक नेतृत्व असलेल्या सुरेश गायकवाड यांना काँग्रेसने डावलेले;वाळूमाफियाला उमेदवारी

नांदेड,बातमी24:-लोकसभा निवडणुकीत दलित-मुस्लिम मतांवर विजयी साकारणाऱ्या काँग्रेसने यावेळी तिकीट विक्रीचे दुकान चालविले असून अनेक ठिकाणी…

4 weeks ago

सनदी अधिकारी वर्षा ठाकूर-घुगे यांना मराठवाडा भूषण पुरस्कार जाहीर

नांदेड,बातमी24:-मराठवाडा समनव्य समिती पुणे,याच्या वतीने दिला जाणारा या वर्षीचा मराठवाडा भूषण पुरस्कार सनदी अधिकारी तथा…

2 months ago

सीईओ करणवाल यांच्या पुढाकाराने शिक्षकांच्या रिक्त पदांचा प्रश्न निकाली;गुणवत्तेची चिंता मिटणार

नांदेड,बातमी 24:-मागील अनेक वर्षांपासून किनवट व माहुर या दोन तालुक्यातील पेसा क्षेत्रातील रिक्त पदांचा अनुशेष…

3 months ago

जिल्हयात अतिवृष्टीमुळे २ लाख हेक्टरपेक्षा अधिक क्षेत्र बाधित;९३ पैकी ४५ मंडळात अतिवृष्टी

नांदेड,बातमी24 : गेल्या 48 तासांपासून नांदेड जिल्ह्यावर आभाळ कोसळले असून रविवारी जिल्ह्याच्या 93 पैकी 45…

3 months ago

शेतकऱ्यांनी पीक नुकसानीची तक्रार 72 तासांच्या आत करावी:- जिल्हाधिकारी राऊत

नांदेड, बातमी24:- नांदेड जिल्ह्यामध्ये मागील दोन दिवसापासून अतिवृष्टीमुळे पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झालेले आहे. अशा…

3 months ago

नांदेड जिल्ह्यामध्ये अतिवृष्टी; नागरिकांना सतर्कतेचे जिल्हाधिकाऱ्यांचे आवाहन

नांदेड,बातमी24 : नांदेड जिल्ह्यामध्ये गेल्या २४ तासांमध्ये पावसाने जोर धरला असून अजूनही पाऊस सुरू आहे.…

3 months ago