जयपाल वाघमारे
नांदेड, बातमी24ः-अनेक राजकारणी मंडळी रात्री उशिरापर्यंत जागतात आणि सकाळी उशिरा उठतात. शरिराकडे फ ारस लक्ष देत नसल्याने तारण्यातच अनेक व्याधींचा सामना करत असतात. परंतु यास नांदेड जिल्ह्यातील एक नवखे आमदार अपवाद ठरत असून नित्याने पाच ते सात किलोमीटर ते मैदानावर धावून घाम गाळत आहे. आमदार मैदानावर पळत असल्याचे पाहून अनेकांना सुखद आणि आश्चर्यांचा धक्का बसत आहे.
कोरोनाच्या महामारीपुढे टिकण्यासाठी अनेक जण शाररिकदृष्टया तंदरुस्त राखण्याचा प्रयत्न करत आहेत. यासाठी नित्याने योगा, चालणे व धावण्याच्या प्रकाराकडे लक्ष देत आहे. यास नायगाव मतदारसंघातून विजयी झालेले भाजपचे आमदार राजेश पवार हे पण अपवाद नसून ते तर मागच्या पंधरा वर्षांपासून पाच ते सात किलोमीटर रोज मैदान किंवा घरातील मशीनवर नित्याने पळत असतात. नांदेडमध्ये असल्यास आ. पवार हे पिपल्स कॉलेच्या मोठया टॅ्रकवर ही धावण्यासाठी येत असतात.
कानाला हेडफ ोन लावून कुणाही संवादात वेळ न घालता परंतु; कुणाचाही नमस्कार न चुकविता आपल्या व्यायामात दंग असतात. अधून-मधून आमदार महोदय मैदानावर आले, की सामान्यांमधून आमदार पळायले लागले अशी जोरदार चर्चा होत असते. मैदानाव येताना कधीही त्यांच्यासोबत लवाजमा नसतो. साधा अंगरक्षक ते सोबत घेऊन येत नाही. मैदानावर तास-दीड तास व्यायामाचा आनंद घेऊन ते निघून जातात
व्यायाम झाल्यानंतर बातमी24.कॉम शी चर्चा करताना राजेश पवार म्हणाले, की पंधरा वर्षांपूर्वी माझे वजन 90 किलो होते. त्रास जाणवू लागल्याने व्यायामाकडे वळलो. त्या काळात वजन घटवून 68 किलोवर आणले तर आजही टिकवून ठेवले आहे. मेराथॉनमध्ये सहभागी होते. 22 किलोमीटरचे अंतर 2 तास 23 मिनिटामध्ये पूर्ण केले आहे. मेराथॉन स्पर्धा होत असेल तर आवर्जून सहभागी होणे आवडते, असे राजेश पवार यांनी सांगितले.
मतदारसंघातील युवकांना शाररिक दृष्टया मजबूत ठेवण्यावर माझे विशेष लक्ष आहे. यासाठी मैदानी स्पर्धा आयोजित करण्यासाठी क्रिडाधिकार्यांना सूचित केले आहे. कुस्ती स्पर्धा व आखाडे ही उभारण्याचा मानस त्यांनी व्यक्त केला. माझ्या मतदारसंघातील प्रत्येक नागरिक हा शाररीक व मानसिकदृष्या सक्षम करण्याचा माझा प्रयत्न असणार असल्याचे आ. पवार यांंनी सांगितले.
नांदेड,बातमी24:-लोकसभा निवडणुकीत दलित-मुस्लिम मतांवर विजयी साकारणाऱ्या काँग्रेसने यावेळी तिकीट विक्रीचे दुकान चालविले असून अनेक ठिकाणी…
नांदेड,बातमी24:-मराठवाडा समनव्य समिती पुणे,याच्या वतीने दिला जाणारा या वर्षीचा मराठवाडा भूषण पुरस्कार सनदी अधिकारी तथा…
नांदेड,बातमी 24:-मागील अनेक वर्षांपासून किनवट व माहुर या दोन तालुक्यातील पेसा क्षेत्रातील रिक्त पदांचा अनुशेष…
नांदेड,बातमी24 : गेल्या 48 तासांपासून नांदेड जिल्ह्यावर आभाळ कोसळले असून रविवारी जिल्ह्याच्या 93 पैकी 45…
नांदेड, बातमी24:- नांदेड जिल्ह्यामध्ये मागील दोन दिवसापासून अतिवृष्टीमुळे पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झालेले आहे. अशा…
नांदेड,बातमी24 : नांदेड जिल्ह्यामध्ये गेल्या २४ तासांमध्ये पावसाने जोर धरला असून अजूनही पाऊस सुरू आहे.…