नांदेड,बातमी24:-नांदेड लोकसभा मतदारसंघातील भारतीय जनता पार्टी महायुतीचे अधिकृत उमेदवार खा. प्रतापराव पाटील चिखलीकर आपला उमेदवारी अर्ज गुरूवार दि.4 एप्रिल 2024 रोजी दाखल करणार आहे. यावेळी खा.चिखलीकर यांच्या प्रचारार्थ दुपारी 12 वाजता गुरुद्वारा मैदान रेल्वे स्टेशन रोड (हिंगोली गेट) नांदेड येथील मैदानावर राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, भाजपा प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे, केंद्रीय मंत्री रावसाहेब दानवे, ना. भागवत कराड, माजी मुख्यमंत्री अशोकराव चव्हाण, पालकमंत्री गिरीष महाजन, सहकार मंत्री अतुल सावे, खा.अजित गोपछडे यांचीजाहीर सभा होणार आहे.
या जाहीरसभेला प्रमुख पाहुणे म्हणून माजी केंद्रीय राज्यमंत्री सूर्यकांताताई पाटील, माजी मंत्री भास्करराव पाटील खतगावकर, माजी मंत्री डॉ.माधवराव किन्हाळकर, विभागीय संघटनमंत्री संजयभाऊ कौडगे,आ. राम पाटील रातोळीकर, आ.डॉ.तुषार राठोड, आ. राजेश पवार,आ. बालाजीराव कल्याणकर, आ. भीमराव केराम, माजी आ. सुभाषराव साबणे, माजी आ. अमरनाथ राजूरकर, माजी आ. ओमप्रकाश पोकर्णा, माजी आ. अविनाश घाटे, प्रदेश सचिव देविदास राठोड, शिवसेना संपर्क प्रमुख आनंदराव जाधव, महाराष्ट्र संघटक (आठवले गट) विजय सोनवणे, लोकसभा निवडणूक प्रमुख व्यंकटराव पाटील गोजेगावकर, रा.काँ.पा.चे प्रदेश सचिव भाऊसाहेब देशमुख गोरठेकर, हरिहरराव भोसीकर, नांदेड दक्षिणचे जिल्हाध्यक्ष डॉ.संतुकराव हंबर्डे, रा.काँ.चे जिल्हाध्यक्ष दिलीपराव धर्माधिकारी, भाजपा नांदेड उत्तरचे जिल्हाध्यक्ष अॅड.किशोर देशमुख, महानगराध्यक्ष दिलीप कंदकुर्ते, शिवसेना जिल्हा प्रमुख आनंदराव बोंढारकर,उमेशराव मुंडे, गंगाधरराव बडूरे, रा.काँ.चे जिल्हाध्यक्ष (उत्तर) विश्वांभर पवार, जिल्हाध्यक्ष (आठवले गट) गौतम काळे, रा.काँ.चे शहराध्यक्ष जीवनराव घोगरे, प्रविण साले, उमरी कृउबाचे सभापती शिरीष देशमुख गोरठेकर, मारोतराव कवळे गुरुजी आदी मान्यवरांची उपस्थिती लाभणार आहे.
तत्पूर्वी सकाळी 10 वाजता जुना मोंढा, गुरुद्वारा चौरस्ता, महावीर चौक, हनुमान पेठ,मारवाडी धर्मशाळा, मुथा चौक, छत्रपती शिवाजी महाराज पुतळा, गुरुद्वारा मैदान (हिंगोली गेट) सभास्थळापर्यंत भव्य रॅली काढण्यात येणार आहे.
नांदेड,बातमी24:-लोकसभा निवडणुकीत दलित-मुस्लिम मतांवर विजयी साकारणाऱ्या काँग्रेसने यावेळी तिकीट विक्रीचे दुकान चालविले असून अनेक ठिकाणी…
नांदेड,बातमी24:-मराठवाडा समनव्य समिती पुणे,याच्या वतीने दिला जाणारा या वर्षीचा मराठवाडा भूषण पुरस्कार सनदी अधिकारी तथा…
नांदेड,बातमी 24:-मागील अनेक वर्षांपासून किनवट व माहुर या दोन तालुक्यातील पेसा क्षेत्रातील रिक्त पदांचा अनुशेष…
नांदेड,बातमी24 : गेल्या 48 तासांपासून नांदेड जिल्ह्यावर आभाळ कोसळले असून रविवारी जिल्ह्याच्या 93 पैकी 45…
नांदेड, बातमी24:- नांदेड जिल्ह्यामध्ये मागील दोन दिवसापासून अतिवृष्टीमुळे पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झालेले आहे. अशा…
नांदेड,बातमी24 : नांदेड जिल्ह्यामध्ये गेल्या २४ तासांमध्ये पावसाने जोर धरला असून अजूनही पाऊस सुरू आहे.…