नांदेड,बातमी24:- नांदेड-वाघाळा महापालिकेतील बांधकाम विभागाचे कार्यकारी अभियंता असलेल्या गिरीश कदम यांनी तब्बल 21 किलोमीटरचे अंतर सव्वा तासात धावून पूर्ण केले.विशेष म्हणजे हे अंतर पार करताना एका दमात पल्ला गाठला,याबद्दल पीपल्स कॉलेज मॉर्निग क्लबच्या वतीने सत्कार करण्यात आला.
आरोग्य हीच धनसंपती असते,या उक्तीप्रमाणे प्रत्येक जण निरोगी आयुष्य अधिक सुदृढ राहावे, यासाठी व्यायाम, पायी चालणे,क्रीडा प्रकारात नित्याने सहभाग घेणे असे प्रकार करत असतात.
गिरीश कदम हे नियमितपणे पाच किलो मीटर धावतात, अधून-मधून बारा ते तेरा किलो मीटरचा सराव आहे. दोन दिवसांपूर्वी गिरीश कदम यांनी 21 किलो मीटरचे अंतर हे अवघ्या 2 तास 19 मिनिट आणि 42 सेकंदमध्ये पूर्ण केले.सरासरी सात मिनिटांमध्ये 1 किलो मीटर सरासरीने ते धावले.विशेष म्हणजे वयाच्या पन्नाशीमध्ये ही इतका मोठा पल्ला पूर्ण करण्याची किमया साधली हे कौतुकास्पद म्हणावे लागेल.या कामगिरीबद्दल त्यांचे पीपल्स कॉलेज स्पोर्ट क्लबच्या वतीने ह्रदय सत्कार करण्यात आला. येणाऱ्या काळात तीस किलोमीटरचे अंतर कमी वेळात पूर्ण कसे करता यावर सराव केला जाणार असल्याचे गिरीष कदम यांनी सांगितले.
नांदेड,बातमी24:-लोकसभा निवडणुकीत दलित-मुस्लिम मतांवर विजयी साकारणाऱ्या काँग्रेसने यावेळी तिकीट विक्रीचे दुकान चालविले असून अनेक ठिकाणी…
नांदेड,बातमी24:-मराठवाडा समनव्य समिती पुणे,याच्या वतीने दिला जाणारा या वर्षीचा मराठवाडा भूषण पुरस्कार सनदी अधिकारी तथा…
नांदेड,बातमी 24:-मागील अनेक वर्षांपासून किनवट व माहुर या दोन तालुक्यातील पेसा क्षेत्रातील रिक्त पदांचा अनुशेष…
नांदेड,बातमी24 : गेल्या 48 तासांपासून नांदेड जिल्ह्यावर आभाळ कोसळले असून रविवारी जिल्ह्याच्या 93 पैकी 45…
नांदेड, बातमी24:- नांदेड जिल्ह्यामध्ये मागील दोन दिवसापासून अतिवृष्टीमुळे पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झालेले आहे. अशा…
नांदेड,बातमी24 : नांदेड जिल्ह्यामध्ये गेल्या २४ तासांमध्ये पावसाने जोर धरला असून अजूनही पाऊस सुरू आहे.…