Categories: नांदेड

नांदेड जिल्हाधिकारी आपण गंभीर आहात का?

जयपाल वाघमारे
नांदेड, बातमी24ः– नांदेड जिल्ह्यात औरंगाबादनंतर नांदेडमध्ये कोरोनाच्या रुग्णांची संख्या आहे. औरंगाबादमधील बडया अधिकार्‍यांमधील बेबनाब कोरोनाच्या स्फोटाला कारणीभूत ठरला, तशी परिस्थिती येण्याची वाट बघणे जिल्हाधिकार्‍यांचे सुरु आहे काय? लोकांनी स्वतःची काळजी घ्यावी असे सल्ले दिले जात आहेत,हे ठीक असले,तरी किमान शेजारच्या जिल्ह्यातील जिल्हाधिकार्‍यांप्रमाणे कडक अमल तरी करून पहावा.यासाठी नांदेड जिल्हाधिकार्‍यांना ही कडक भूमिका घेण्यसाठी गंभीर व्हावे लागेल, अशा प्रतिक्रिया उमटायला लागल्या आहेत.

नांदेड जिल्ह्यात कोरोनाच्या रुग्णांची संख्या 437 झाली आहे. आतापर्यंत 20 जण या आजारामुळे दगावले आहेत. पूर्वी नांदेड शहरापुरती कोरोनाची रुग्ण सापडत होती. आता ग्रामीण भागात ही कोरोनाच्या संसर्गाने पाय पसरले आहेत. याचा सामाजिक प्रादुर्भाव वाढायला सुरुवात झाली आहे. अशी परिस्थिती राहिली, तर कोरोनाचा आकडा कधी पाचशे आणि हजारात आत जाईल हे सांगता येत नाही.

या संसर्गाच्या प्रादुर्भावावर नियंत्रण आणण्यासाठी सामुहिक प्रयत्नांची आवश्यकता आहे.केवळ कोरोनासाठी निधी येतो, म्हणून खर्च करण्यासाठी कोरोनावर काम करणे नव्हे तर कोरोनाचे रुग्ण वाढू नयेत, वाढलेले रुग्ण बरे व्हायला हवेत, कुणीही या आजारातून दगावला नाही पाहिजे, यासाठी भौतिक सुविधा निर्माण करण्यासाठी शासनाने निधी दिला आहे. त्या दृष्टीने कामे होणे सरकारला अपेक्षीत आहे.

जिल्ह्याला थेट आयएएस अधिकारी असलेला जिल्हाधिकारी मिळाल्यामुळे जिल्ह्यातील नागरिकांच्या अपेक्षा ही उंचावलेल्या आहेत. मात्र तसा प्रभाव अद्याप पाडता आला नाही, अशी चर्चा दबक्या आवाज लोकांमधून व्हायला सुरुवात झाली आहे. यासाठी शेजारच्या हिंगोली व परभणी जिल्ह्यातील जिल्हाधिकार्‍यांचे उद्हारणे समोर ठेवली जात आहे. औरंगाबादनंतर हिंगोली जिल्ह्यात कोरोनाचे रुग्ण पॉझिटीव्ह होते. आजघडिला त्या जिल्ह्यात फक्त कोरोनाच्या रुग्णांची संख्या 295 आहे.परभणीत तर 141 रुग्ण संख्या आहे. आपल्या जिल्ह्यात 437 वर गेली आहे.

या दोन्ही जिल्ह्यातील कोरोनाच्या रुग्णांची संख्या नियंत्रणात येण्यामागचे कारण म्हणजे, तेथील जिल्हाधिकार्‍यांनी कोरोनाच्या अंमलबजावणी बाबत कुठेही गय किंवा दुर्लक्ष केल्याचे दिसत नाही. परभणी जिल्ह्यात रुग्ण वाढले, की संचारबंदी लावली जाते. हिंगोली जिल्हाधिकार्‍यांनी रविवार दि.5 जुलै सायंकाळपासून पाच दिवसांची संचारबंदी लावली आहे. आपल्याकडे संचारबंदी असल्याचे कधी जाणवले सुद्धा नाही. कोरोनाचे रुग्ण वाढत असताना जिल्हा पर्यटन क्षेत्र म्हणून घोषित केल्यासारखा नुसता भास होत नसून वास्तव दर्शन घडते.

वाढत्या कोरोनाच्या संसर्गाला आळा घालण्यासाठी काटेकोर संचारबंदीचा अंमल काही दिवस करून पहाणे योग्य राहू शकते.यातून काही रिजल्ट येतो का हे बघणे महत्वाचे ठरणार आहे. यातून कोरोनाच्या संसर्गाला आळा बसत असेल,तर अधून-मधून संचारबंदीचा प्रयोग करायला हरकत नाही. नांदेड जिल्हाधिकारी हे थेट आयएएस अधिकारी असल्याने तशा जनतेच्या आशा-अपेक्षा वाढत आहेत. अपेक्षा बाळगणे यात गैर ही नसावे.

जयपाल वाघमारे - संपादक

Recent Posts

सनदी अधिकारी वर्षा ठाकूर-घुगे यांना मराठवाडा भूषण पुरस्कार जाहीर

नांदेड,बातमी24:-मराठवाडा समनव्य समिती पुणे,याच्या वतीने दिला जाणारा या वर्षीचा मराठवाडा भूषण पुरस्कार सनदी अधिकारी तथा…

1 day ago

सीईओ करणवाल यांच्या पुढाकाराने शिक्षकांच्या रिक्त पदांचा प्रश्न निकाली;गुणवत्तेची चिंता मिटणार

नांदेड,बातमी 24:-मागील अनेक वर्षांपासून किनवट व माहुर या दोन तालुक्यातील पेसा क्षेत्रातील रिक्त पदांचा अनुशेष…

1 week ago

जिल्हयात अतिवृष्टीमुळे २ लाख हेक्टरपेक्षा अधिक क्षेत्र बाधित;९३ पैकी ४५ मंडळात अतिवृष्टी

नांदेड,बातमी24 : गेल्या 48 तासांपासून नांदेड जिल्ह्यावर आभाळ कोसळले असून रविवारी जिल्ह्याच्या 93 पैकी 45…

2 weeks ago

शेतकऱ्यांनी पीक नुकसानीची तक्रार 72 तासांच्या आत करावी:- जिल्हाधिकारी राऊत

नांदेड, बातमी24:- नांदेड जिल्ह्यामध्ये मागील दोन दिवसापासून अतिवृष्टीमुळे पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झालेले आहे. अशा…

2 weeks ago

नांदेड जिल्ह्यामध्ये अतिवृष्टी; नागरिकांना सतर्कतेचे जिल्हाधिकाऱ्यांचे आवाहन

नांदेड,बातमी24 : नांदेड जिल्ह्यामध्ये गेल्या २४ तासांमध्ये पावसाने जोर धरला असून अजूनही पाऊस सुरू आहे.…

2 weeks ago

नांदेड जिल्ह्याचे खासदार वसंतराव चव्हाण यांचे निधन

नांदेड,बातमी24:-नांदेड जिल्ह्याचे नवनिर्वाचित खासदार वसंतराव चव्हाण यांचे निधन झाले, ही वार्ता दि.26 सोमवारी सकाळी धडकली.त्याच्यावर…

3 weeks ago