नांदेड

नांदेड जिल्हा बाधीत क्षेत्र म्हणून घोषित;लम्पी आजाराबाबत जिल्हा प्रशासन दक्ष:-जिल्हाधिकारी राऊत यांची माहिती

नांदेड,बातमी 24 :- जिल्ह्यात लम्पी चर्मरोगाचा प्रादुर्भाव दिसून आल्याने याचा प्रतिबंध, नियंत्रण, निर्मुलन करण्यासाठी संपूर्ण नांदेड जिल्हा नियंत्रित म्हणून जिल्हाधिकारी अभिजीत यांनी घोषित केला आहे.

प्राण्यामधील संक्रमण व सांसर्गिक रोगास प्रतिबंध व नियंत्रण अधिनियम 2009 अन्वये जिल्हाधिकारी अभिजीत राऊत यांनी लम्पी चर्मरोगाच्या बाबतीत नांदेड जिल्हा नियंत्रित क्षेत्र म्हणून घोषित केला आहे. जिल्हाधिकारी तथा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणाचे अध्यक्ष अभिजीत राऊत यांनी पुढीलप्रमाणे आदेश निर्गमित केले आहेत.

लम्पी चर्मरोगावर नियंत्रण, प्रतिबंध किंवा त्याचे निर्मुलन करता येईल आणि गोजातीय प्रजातीची सर्व गुरे यांची ज्या ठिकाणी ते पाळले ठेवले जातात त्या ठिकाणापासून नियंत्रित क्षेत्रातील किंवा त्या क्षेत्राबाहेरील अन्य कोणत्याही ठिकाणी ने-आण करण्यास मनाई करण्यात आली आहे.

गोजातीय प्रजातीची बाधित असलेली कोणतीही जिवंत किंवा मृत गुरे, गोजातीय प्रजातीच्या कोणत्याही बाधित झालेल्या प्राण्यांना शव, कातडी, किंवा अन्य कोणताही भाग किंवा अशा प्राण्याचे उत्पादन किंवा असे प्राणी नियमित क्षेत्राच्या बाहेर नेण्यासाठी कोणत्याही व्यक्तीस मनाई करण्यात आली आहे.

गोजातीय प्रजातीच्या बाधित पशुधनास स्वतंत्र ठेवणे व अबाधित पशुधनास वेगळे बांधणे तसेच या रोग प्रादुर्भावाने पशुधनाचा मृत्यू झाल्यास मृतदेहाची शास्त्रीय पध्दतीने विल्हेवाट लावावी. असे बाधित परिसरात स्वच्छता व निर्जतुक द्रावणाची फवारणी करुन निर्जतुकीकरण करावे व रोगप्रसारास कारणीभूत असलेल्या डास, माश्या गोचीड इत्यादीच्या नियंत्रणासाठी औषधाची फवारणी करावी.

लम्पी चर्म रोगाचा प्रादुर्भाव व प्रसार थांबविण्यासाठी नांदेड जिल्ह्यातील सर्व ग्रामपंचायती, नगरपंचायत, नगरपरिषद व महानगरपालिका यांचेमार्फत त्यांचे कार्यक्षेत्रातील भटक्या/मोकाट पशुधनाचे नियमित निरीक्षण करण्यात यावे तसेच बाधित पशुधनाची काळजी घ्यावी व जनावराचे गोठे व त्या लगतच्या परिसरात कीटकनाशक फवारणी मोहीम स्वरुपात राबविण्यात यावी.

एका राज्यातून दुसऱ्या राज्यात/एका जिल्ह्यातून दुसऱ्या जिल्ह्यात बाधित पशुधनाची वाहतूक केल्यामुळे बाधित पशुधनापासून निरोगी पशुधनास या रोगाचा प्रादुर्भाव होण्याची दाट शक्यता असल्याने जिल्हा/राज्य सीमेवरील तपासणी नाका येथे पशुंची तपासणी करण्याच्या तसेच बाधित पशुधन राज्यात/जिल्ह्यात येणार नाहीत याबाबत तपासणी नाका प्रमुखांना सक्त सूचना देण्यात आल्या आहेत.

बाधित क्षेत्रातील बाधित पशुधनावर उपचार करणे त्याचप्रमाणे गोवर्गीय पशुधनाचे प्रतिबंधात्मक लसीकरण मोहिम स्वरुपात हाती घेवून उर्वरित गोवर्गीय पशुधनाचे लसीकरण तात्काळ पूर्ण करण्याच्या सूचना केल्या आहेत. योग्य त्या जैव सुरक्षा उपाययोजनांची अंमलबजावणी करण्यात यावी. या रोगाबाबत विविध माध्यमातून जनजागृती व माहिती पशुपालकापर्यत पोहोचविण्यात यावी.

लम्पी चर्म रोग प्रादुर्भाव याबाबत नजीकच्या पशुवैद्यकीय दवाखान्यात, पशुसंवर्धन विभाग पंचायत समिती व जिल्हास्तरावर संबंधित पशुपालकांनी इतर कोणतीही व्यक्ती, शासनेत्तर संस्था, सार्वजनिक संस्था किंवा ग्रामपंचायतीना माहिती त्वरीत देणे आवश्यक आहे. आपत्ती व्यवस्थापन कायदा 2005 अन्वये कायद्याशी सुसंगत कृती न करणाऱ्या आणि कायद्याच्या अंमलबजावणी मध्ये अडथळा निर्माण करणाऱ्या पशुपालक, व्यक्ती, संस्था प्रतिनिधी यांचे विरुध्द नियमानुसार गुन्हा दाखल करणे तसेच कारवाई प्रस्तावित करण्यासाठी त्या त्या क्षेत्रातील पशुधन विकास अधिकारी यांना प्राधिकृत करण्यात आले आहे असेही आदेशात जिल्हाधिकारी अभिजीत राऊत यांनी स्पष्ट केले आहे.

 

जयपाल वाघमारे - संपादक

Recent Posts

सनदी अधिकारी वर्षा ठाकूर-घुगे यांना मराठवाडा भूषण पुरस्कार जाहीर

नांदेड,बातमी24:-मराठवाडा समनव्य समिती पुणे,याच्या वतीने दिला जाणारा या वर्षीचा मराठवाडा भूषण पुरस्कार सनदी अधिकारी तथा…

4 days ago

सीईओ करणवाल यांच्या पुढाकाराने शिक्षकांच्या रिक्त पदांचा प्रश्न निकाली;गुणवत्तेची चिंता मिटणार

नांदेड,बातमी 24:-मागील अनेक वर्षांपासून किनवट व माहुर या दोन तालुक्यातील पेसा क्षेत्रातील रिक्त पदांचा अनुशेष…

2 weeks ago

जिल्हयात अतिवृष्टीमुळे २ लाख हेक्टरपेक्षा अधिक क्षेत्र बाधित;९३ पैकी ४५ मंडळात अतिवृष्टी

नांदेड,बातमी24 : गेल्या 48 तासांपासून नांदेड जिल्ह्यावर आभाळ कोसळले असून रविवारी जिल्ह्याच्या 93 पैकी 45…

2 weeks ago

शेतकऱ्यांनी पीक नुकसानीची तक्रार 72 तासांच्या आत करावी:- जिल्हाधिकारी राऊत

नांदेड, बातमी24:- नांदेड जिल्ह्यामध्ये मागील दोन दिवसापासून अतिवृष्टीमुळे पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झालेले आहे. अशा…

2 weeks ago

नांदेड जिल्ह्यामध्ये अतिवृष्टी; नागरिकांना सतर्कतेचे जिल्हाधिकाऱ्यांचे आवाहन

नांदेड,बातमी24 : नांदेड जिल्ह्यामध्ये गेल्या २४ तासांमध्ये पावसाने जोर धरला असून अजूनही पाऊस सुरू आहे.…

3 weeks ago

नांदेड जिल्ह्याचे खासदार वसंतराव चव्हाण यांचे निधन

नांदेड,बातमी24:-नांदेड जिल्ह्याचे नवनिर्वाचित खासदार वसंतराव चव्हाण यांचे निधन झाले, ही वार्ता दि.26 सोमवारी सकाळी धडकली.त्याच्यावर…

4 weeks ago