नांदेड

आयुष्यमान कार्ड मोहिमेत नांदेड जिल्हा मराठवाडात अव्‍वल:-डीएचओ डॉ. शिंदे यांची माहिती

नांदेड,बातमी 24:-प्रधान मंत्री जन आरोग्‍य योजना हा केंद्रशासनाचा महत्‍वाकांक्षी कार्यक्रम असून याच धर्तीवर राज्‍य शासनाने सूध्‍दा महात्‍मा ज्‍योतिबा फुले जन आरोग्‍य योजना चालू केली आहे. यामध्‍ये पात्र लाभार्थिंचे
आयुष्‍यमान कार्ड तयार करुन वितरीत करण्‍यात येते. यांमध्ये २८ जुलै २०२३ च्या शासन निर्णयानुसार पिवळी शिधापत्रिका
धारक, केशरी शिधापत्रिका धारक, अन्नपूर्णा कार्ड धारक, शुभ्र शिधापत्रिका धारक (शासकीय व निमशासकीय कर्मचारी सहित)
व इतर निकषात बसणारे सर्व लाभार्थी आहेत. या योजनेत एकूण १३५६ रोगावरील उपचाराचा खर्च योजनेच्या अंगीकृत दवाखान्यात प्रति वर्ष प्रति कुटुंब ५ लक्ष पर्यंत मर्यादित असून तो लाभार्थ्याना मोफत असणार आहे. शासनाची महत्वाकाक्षी अशी ही योजना असून, याद्वारे सामान्यांचा आरोग्यावर खर्च होऊन गरिबीच्या खाईत ढकलले जाण्यापासून बचाव होणार
आहे. जिल्हाधिकारी मा.अभिजीत राऊत, मुख्य कार्यकारी अधिकारी मा.मिनल करनवाल व जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ.बालाजी शिंदे यांच्या मार्गदर्शनात नांदेड जिल्ह्यात आयुष्यमान कार्ड काढण्याच्‍या कामात उल्‍लेखनिय प्रगती सुरू असून,राष्‍ट्रीय आरोग्‍य हमी सोसायटी व राज्‍य आरोग्‍य हमी सोसायटीव्‍दारे आज दिनांक 22 नोव्‍हेंबर 2023 रोजी जिल्‍ह्यांचा दुरदृ्ष्‍य प्रणालीव्‍दारे आढावा घेण्‍यात आला. यामध्‍ये मागील 15 दिवसांच्‍या कामामध्‍ये मराठवाडा
विभागात नांदेड जिल्‍ह्याने उत्‍कृष्‍ट काम केल्‍याबद्दल जिल्हाधिकारी मा.अभिजीत राऊत, मुख्य कार्यकारी अधिकारी मिनल करनवाल व जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. बालाजी शिंदे यांचे अभिनंदन करण्‍यात आले.

जिल्ह्यामध्ये सध्या प्रधानमंत्री जन आरोग्य योजना व महात्मा ज्योतिबा फुले जन आरोग्य या योजनेचे एकत्रित लाभार्थी संख्या जवळपास २२ लाख ८९ हजार ४४१ आहे. त्यापैकी २३% व्यक्तींचे कार्ड्स आजपर्यंत काढण्यात आलेले आहेत. या कामात आरोग्य विभागाचे सर्व कर्मचारी तळमळीने काम करत आहेत. सध्या बऱ्याच दिवसापासून राष्‍ट्रीय आरोग्‍य
अभियानाच्‍या कर्मचाऱ्यांचा राज्यव्यपी संप असून सुद्धा सीईओ मिनल करनवाल तसेच जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ बालाजी
शिंदे यांनी नांदेड मध्ये आरोग्य यंत्रणेने चांगले काम केल्याबाबत अधिकारी व कर्मचाऱ्यांचे अभिनंदन केले आहे. या कामात आरोग्‍य कर्मचा-यांसोबतच अंगणवाडी सेविका, उमेद, शिक्षक, ग्रामपंचायत कर्मचारी, रेशन दुकानदार यांनी सुद्धा मोलाचे सहकार्य केलेले आहे. आज पर्यंत एकुण 5 लक्ष 29 हजार 796 लाभार्थींचे आयुष्‍यमान कार्ड तयार करण्‍यात आलेले आहेत. जिल्‍हयामध्‍ये अजून 17 लक्ष 59 हजार 645 लाभार्थींचे आयुष्‍यमान कार्ड तयार करण्‍याचे
काम चालू आहे. मराठवाडा विभागामध्‍ये आयुष्‍यमान कार्ड काढण्‍याच्‍या कामात नांदेड पहील्‍या क्रमांकावर आहे. रेशन दुकानात येणारे लाभार्थी यांनी कार्ड काढले आहे की नाही याची खात्री करण्याचे निर्देश जिल्हाधिकारी अभिजीत राऊत यांनी दिले आहेत. मुख्‍य कार्यकारी अधिकारी यांनी जिल्‍हयातील सर्व आशा सेविका यांना ग्रामीण भागातील सर्व लाभार्थींचे
आयुष्‍यमान कार्ड काढण्‍याचे आवाहन केलेले आहे.

जिल्‍हयामध्‍ये एकुण 1326 आशांचे लॉगईन आय.डी. तयार झालेले असून, त्‍यांच्‍याव्‍दारे कार्ड तयार केल्‍यास आशांना प्रती लाभार्थी 05 रुपये मिळणार असल्‍याचे सूध्‍दा मुख्‍य कार्यकारी
अधिकारी यांनी सांगितले.तसेच प्रत्‍येक ग्राम पंचायतीमध्‍ये सी.एस.सी.केंद्राव्‍दारे आयुष्‍यमान कार्ड काढण्‍याची सूविधा उपलब्‍ध असून, सर्व केंद्रचालक यांनी तत्‍परतेने वेळेत सर्व ग्रामीण भागातील लाभा‍‍‍र्थींना आयुष्‍यमान कार्ड तयार करुन द्यावेत असे आवाहन मीनल करनवाल यांनी केले.

जयपाल वाघमारे - संपादक

Recent Posts

आंबेडकरी चळवळीच लोक नेतृत्व असलेल्या सुरेश गायकवाड यांना काँग्रेसने डावलेले;वाळूमाफियाला उमेदवारी

नांदेड,बातमी24:-लोकसभा निवडणुकीत दलित-मुस्लिम मतांवर विजयी साकारणाऱ्या काँग्रेसने यावेळी तिकीट विक्रीचे दुकान चालविले असून अनेक ठिकाणी…

4 weeks ago

सनदी अधिकारी वर्षा ठाकूर-घुगे यांना मराठवाडा भूषण पुरस्कार जाहीर

नांदेड,बातमी24:-मराठवाडा समनव्य समिती पुणे,याच्या वतीने दिला जाणारा या वर्षीचा मराठवाडा भूषण पुरस्कार सनदी अधिकारी तथा…

2 months ago

सीईओ करणवाल यांच्या पुढाकाराने शिक्षकांच्या रिक्त पदांचा प्रश्न निकाली;गुणवत्तेची चिंता मिटणार

नांदेड,बातमी 24:-मागील अनेक वर्षांपासून किनवट व माहुर या दोन तालुक्यातील पेसा क्षेत्रातील रिक्त पदांचा अनुशेष…

3 months ago

जिल्हयात अतिवृष्टीमुळे २ लाख हेक्टरपेक्षा अधिक क्षेत्र बाधित;९३ पैकी ४५ मंडळात अतिवृष्टी

नांदेड,बातमी24 : गेल्या 48 तासांपासून नांदेड जिल्ह्यावर आभाळ कोसळले असून रविवारी जिल्ह्याच्या 93 पैकी 45…

3 months ago

शेतकऱ्यांनी पीक नुकसानीची तक्रार 72 तासांच्या आत करावी:- जिल्हाधिकारी राऊत

नांदेड, बातमी24:- नांदेड जिल्ह्यामध्ये मागील दोन दिवसापासून अतिवृष्टीमुळे पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झालेले आहे. अशा…

3 months ago

नांदेड जिल्ह्यामध्ये अतिवृष्टी; नागरिकांना सतर्कतेचे जिल्हाधिकाऱ्यांचे आवाहन

नांदेड,बातमी24 : नांदेड जिल्ह्यामध्ये गेल्या २४ तासांमध्ये पावसाने जोर धरला असून अजूनही पाऊस सुरू आहे.…

3 months ago