नांदेड, बातमी24ः दीड महिन्याच्या विलंबाने दहावीचा निकाल जाहीर एसएससी बोर्डाने जाहीर केला आहे. या परिक्षेत लातूर विभागात नांदेड जिल्ह्याची घसरण झाली आहे. जिल्ह्याचा निकाला 89.53 टक्के इतका लागला. सदरचा निकाल विभागातील इतर जिल्ह्याच्या तुलनेत सर्वात कमी आहे. मात्र प्रतीवर्षांप्रमाणे यंदाही निकाल मुलींच मुलांपेक्षा अधिक बाजी मारली आहे.
नांदेड जिल्ह्यातील 689 शाळांमधील 46 हजार 222 विद्यार्थ्यांनी परीक्षेसाठी नोंदणी केली होती. यामध्ये 24 हजार 595 मुले तर 21 हजार 627 मुलींचा समावेश होता. यात प्रत्यक्षात 24 हजार 263 मुले व 21 हजार 424 मुलींनी परीक्षेत सहभाग घेतला. याम्ये 20 हजार 982 मुले पास झाले. तर 3 हजार 281 मुले नापास झाली. मुलींमध्ये 19 हजार 921 मुली पास झाल्या आहेत. तर 1 हजार 503 मुली नापास झाल्या. मुलींपेक्षा मुलांचे नापास होण्याचे प्रमाण सर्वाधिक आहे. मुलांच्या पास होण्याचे प्रमाण 86. 48 टक्के तर मुलींचे 92.99 एवढे आहे.
—–
विभागातील जिल्हावार निकाल
उस्मानाबाद जिल्ह्याचा निकाल 94.25 टक्के
लातूर जिल्ह्याचा निकाल 96.51
नांदेड जिल्ह्याचा निकाल 89.53
नांदेड,बातमी24:-लोकसभा निवडणुकीत दलित-मुस्लिम मतांवर विजयी साकारणाऱ्या काँग्रेसने यावेळी तिकीट विक्रीचे दुकान चालविले असून अनेक ठिकाणी…
नांदेड,बातमी24:-मराठवाडा समनव्य समिती पुणे,याच्या वतीने दिला जाणारा या वर्षीचा मराठवाडा भूषण पुरस्कार सनदी अधिकारी तथा…
नांदेड,बातमी 24:-मागील अनेक वर्षांपासून किनवट व माहुर या दोन तालुक्यातील पेसा क्षेत्रातील रिक्त पदांचा अनुशेष…
नांदेड,बातमी24 : गेल्या 48 तासांपासून नांदेड जिल्ह्यावर आभाळ कोसळले असून रविवारी जिल्ह्याच्या 93 पैकी 45…
नांदेड, बातमी24:- नांदेड जिल्ह्यामध्ये मागील दोन दिवसापासून अतिवृष्टीमुळे पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झालेले आहे. अशा…
नांदेड,बातमी24 : नांदेड जिल्ह्यामध्ये गेल्या २४ तासांमध्ये पावसाने जोर धरला असून अजूनही पाऊस सुरू आहे.…