नांदेड

नांदेड जिल्हाधिकारी राऊत यांच्यासाठी नांदेड ठरली गुड न्यूज;राऊत कुटूंबात कन्येचे आगमन

नांदेड,बातमी24:आपल्या शांत,संयमी आणि मितभाषी स्वभावाने ज्याची अल्पवधीत जिल्ह्याला परिचय झाला असे नांदेड जिल्हाधिकारी अभिजित राऊत यांच्यासाठी ही नांदेड येथील कारकीर्द ही आयुष्यभर स्मरणीय ठरणार आहे,त्याचे कारण ही तसेच आहे.आज राऊत दांपत्यास कन्यारत्न प्राप्त झाले.कुटूंबातील पहिली बेटीच्या जन्माचे स्वागत ही आनंदाची पर्वणी ठरली आहे.विशेषतः या कन्येचा जन्म हा नांदेड येथील शाम नगर शासकीय महिला व बाल रुग्णालयात झाला. तत्कालीन जिल्हाधिकारी डॉ.विपीन इटनकर यांच्या सुद्धा कन्यारत्नेचा जन्म हा याच रुग्णालयात झाला होता.

सहा सहा महिन्यांपूर्वी जिल्हाधिकारी म्हणून जळगाव येथून आलेल्या अभिजित राऊत हे आपल्या टू द पॉइंट अशी कामाची ओळख आहे.कमी बोलणे आणि काम प्रमाणिकपणे करणे हा त्यांचा सेवा स्वभाव आहे. त्यांच्या कुटूंबातील पहिल्या आपत्याचा जन्म ही नांदेडमध्ये बुधवार दि.4 रोजी सकाळी सहा वाजता झाला असून आई व बाळाची तबियत ठणठणीत आहे. कन्येचे वजन ही साडे तीन किलो भरले आहे.
डॉ.इटनकर दांपत्यास दोन वर्षापूर्वी नांदेड येथेच कन्यारत्न जन्मास झाली होती.विशेषतः त्यांच्या ही पत्नी डॉ.शालिनी इटनकर यांची प्रसूती ही शामनगर येथील शासकीय रुग्णालयात झाली होती.शासकीय रुग्णालयात पत्नीची प्रसूती घडवून आणल्याबद्दल त्यावेळी डॉ.इटनकर दांपत्याची व डॉ.विपीन इटनकर यांचे सर्वत्र अभिनंदन व कौतुक ठरले होते. सलग दोन आजी माजी जिल्हाधिकारी यांना  त्याच शासकीय रुग्णालयात कन्यारत्न जन्माचा चांगला योग घडला आहे.

हाच कित्ता जिल्हाधिकारी अभिजित राऊत यांनी त्यांच्या पत्नीची प्रसूती शासकीय रुग्णालयात करवून घेत,शासकीय रुग्णालयाबदल सामान्य जनतेमध्ये एक चांगला संदेश दिला आहे.निरोप समारंभाच्या भाषणात बोलताना डॉ.इटनकर म्हणाले होते,की माझ्या मुलीच्या जन्मामुळे या नांदेडशी आयुष्यभराची नाळ आणि आठवण जुळली आहे.त्याच प्रमाणे डॉ. इटनकर यांच्याप्रमाणे अभिजित राऊत यांनी सुद्धा नांदेड येथे कन्यारत्न झाल्याने नांदेडशी भावनिक नाते जोडले जाणार आहे.

जयपाल वाघमारे - संपादक

Recent Posts

आंबेडकरी चळवळीच लोक नेतृत्व असलेल्या सुरेश गायकवाड यांना काँग्रेसने डावलेले;वाळूमाफियाला उमेदवारी

नांदेड,बातमी24:-लोकसभा निवडणुकीत दलित-मुस्लिम मतांवर विजयी साकारणाऱ्या काँग्रेसने यावेळी तिकीट विक्रीचे दुकान चालविले असून अनेक ठिकाणी…

4 weeks ago

सनदी अधिकारी वर्षा ठाकूर-घुगे यांना मराठवाडा भूषण पुरस्कार जाहीर

नांदेड,बातमी24:-मराठवाडा समनव्य समिती पुणे,याच्या वतीने दिला जाणारा या वर्षीचा मराठवाडा भूषण पुरस्कार सनदी अधिकारी तथा…

2 months ago

सीईओ करणवाल यांच्या पुढाकाराने शिक्षकांच्या रिक्त पदांचा प्रश्न निकाली;गुणवत्तेची चिंता मिटणार

नांदेड,बातमी 24:-मागील अनेक वर्षांपासून किनवट व माहुर या दोन तालुक्यातील पेसा क्षेत्रातील रिक्त पदांचा अनुशेष…

3 months ago

जिल्हयात अतिवृष्टीमुळे २ लाख हेक्टरपेक्षा अधिक क्षेत्र बाधित;९३ पैकी ४५ मंडळात अतिवृष्टी

नांदेड,बातमी24 : गेल्या 48 तासांपासून नांदेड जिल्ह्यावर आभाळ कोसळले असून रविवारी जिल्ह्याच्या 93 पैकी 45…

3 months ago

शेतकऱ्यांनी पीक नुकसानीची तक्रार 72 तासांच्या आत करावी:- जिल्हाधिकारी राऊत

नांदेड, बातमी24:- नांदेड जिल्ह्यामध्ये मागील दोन दिवसापासून अतिवृष्टीमुळे पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झालेले आहे. अशा…

3 months ago

नांदेड जिल्ह्यामध्ये अतिवृष्टी; नागरिकांना सतर्कतेचे जिल्हाधिकाऱ्यांचे आवाहन

नांदेड,बातमी24 : नांदेड जिल्ह्यामध्ये गेल्या २४ तासांमध्ये पावसाने जोर धरला असून अजूनही पाऊस सुरू आहे.…

3 months ago