नांदेड : बातमी24:-महानगरपालिकेच्या स्थापनेला पंचवीस वर्षे झाल्याबद्दल महानगरपालिकेचा रौप्य महोत्सवी सोहळा आयोजित करण्यात आला होता .रौप्यमहोत्सवी वर्षानिमित्त महानगरपालिकेच्या वतीने आयोजित करण्यात आलेल्या सांस्कृतिक कार्यक्रमाच्या पर्वनिने नांदेडकर सुखावले आहेत. हास्य कवि सम्मेलन आणि आदर्श शिंदे यांच्या भीम गीतांच्या कार्यक्रमांनी वातावरणात नवचैतन्य निर्माण केले असून नागरिकांनी कोरणा काळातील निराशा झटकून हास्य आणि वीर रसाचा आनंद घेतला.
नांदेड वाघाळा शहर महानगरपालिकेच्या स्थापनेला पंचवीस वर्षे झाल्याबद्दल पालकमंत्री अशोकराव चव्हाण यांच्या नेतृत्वाखाली झालेल्या कार्यक्रमास खा. हेमंत पाटील , माजी मंत्री डी पी सावंत , विधान परिषद गट नेते आमदार अमरनाथ राजूरकर ,आमदार माधवराव पाटील जळगावकर, आमदार जितेश अंतपुरकर, महापौर सौ जयश्री निलेश पावडे , माजी आमदार हणमंतराव पाटील बेटमोगरेकर, जिल्हाध्यक्ष गोविंदराव पाटील नागेलीकर, माजी आमदार ओमप्रकाश पोकर्णा ,मनपाचे स्थायी समिती सभापती किशोर स्वामी ,गटनेते महेश कनकदंडे, सभापती अपर्णा नेरलकर, उपमहापौर अ. गफार अ.सतार यांच्यासह महानगरपालिकेचे सर्व पदाधिकारी लोकप्रतिनिधी यांची प्रमुख उपस्थिती होती. दिनांक 29 , 30 एप्रिल रोजी आणि 01 मे असा तीन दिवस रौप्य महोत्सव सोहळा आयोजित करण्यात आला होता .
29 तारखेला रौप्य महोत्सवी सोहळ्याचे उद्घाटन आणि डॉक्टर शंकरराव चव्हाण जीवनगौरव पुरस्काराचे वितरण पालकमंत्री यांच्या हस्ते करण्यात आले. तर त्याच दिवशी चला हवा येऊ द्या या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.
दुसऱ्या दिवशी देशातील विविध नामांकित हास्य कवींच्या हास्य कवी संमेलनाचे आयोजन करण्यात आले होते . हास्य कविसंमेलनाला नांदेडकरानी प्रचंड प्रतिसाद देत आनंद लुटला तर अनेक कवींच्या बहारदार सादरीकरणाने त्यांना खिळवून ठेवले. दिनांक 1 जानेवारी रोजी महाराष्ट्रातील सुप्रसिद्ध सिने गायक तथा आंबेडकरी गाण्यांचा स्वरताज आदर्श शिंदे यांचा भीम गीतांचा कार्यक्रम मार्केट कमिटी च्या मैदानावर घेण्यात आला .पालकमंत्री अशोकराव चव्हाण यांच्या हस्ते या कार्यक्रमाचे उद्घाटन करण्यात आले .त्यानंतर आदर्श शिंदे यांनी सादर केलेल्या एकाहून एक सरस गाण्यांनी लाखोंचा जनसमुदाय आनंद सागरात बुडाला . सायंकाळी सुरू झालेल्या या कार्यक्रमाने रात्री दहा वाजेपर्यंत रसिकांना अक्षरशः खिळवून ठेवले तर आदर्श शिंदे यांच्या स्वराच्या तालावर उपस्थितांनी ठेका धरला होता .महानगरपालिकेच्या वतीने आयोजित करण्यात आलेल्या रौप्य महोत्सवाच्या तीनदिवसीय कार्यक्रमाने नांदेडकरांनी कोरोनाच्या नैराश्यातून बाहेर पडून आनंदाचा आणि विरसाचा आनंद घेतला
नांदेड,बातमी24:-लोकसभा निवडणुकीत दलित-मुस्लिम मतांवर विजयी साकारणाऱ्या काँग्रेसने यावेळी तिकीट विक्रीचे दुकान चालविले असून अनेक ठिकाणी…
नांदेड,बातमी24:-मराठवाडा समनव्य समिती पुणे,याच्या वतीने दिला जाणारा या वर्षीचा मराठवाडा भूषण पुरस्कार सनदी अधिकारी तथा…
नांदेड,बातमी 24:-मागील अनेक वर्षांपासून किनवट व माहुर या दोन तालुक्यातील पेसा क्षेत्रातील रिक्त पदांचा अनुशेष…
नांदेड,बातमी24 : गेल्या 48 तासांपासून नांदेड जिल्ह्यावर आभाळ कोसळले असून रविवारी जिल्ह्याच्या 93 पैकी 45…
नांदेड, बातमी24:- नांदेड जिल्ह्यामध्ये मागील दोन दिवसापासून अतिवृष्टीमुळे पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झालेले आहे. अशा…
नांदेड,बातमी24 : नांदेड जिल्ह्यामध्ये गेल्या २४ तासांमध्ये पावसाने जोर धरला असून अजूनही पाऊस सुरू आहे.…