नांदेड

राष्‍ट्रीय लघुपट निर्मिती स्पर्धा; स्‍पर्धकांनी सहभाग घ्‍यावा- सीईओ ठाकूर

 

नांदेड,बातमी24:- ग्रामीण भागात शौचालयाच्या नियमित वापराबरोबर सांडपाणी आणि घनकचरा व्यवस्थापन कार्यक्रमाची प्रभावी अंमलबजावणी करण्यासाठी तसेच स्वातंत्र्यदिनाच्या अमृत महोत्सवी वर्षानिमित्त केंद्र शासनाच्या जलशक्ती मंत्रालयाच्या वतीने स्वच्छता लघुपटांचा अमृतमहोत्सव या लघुपट निर्मिती स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे. तरी यात मोठ्या प्रमाणात स्पर्धकांनी सहभाग घ्यावा असे आवाहन जिल्‍हा परिषदेच्‍या मुख्य कार्यकारी अधिकारी वर्षा ठाकूर-घुगे यांनी केले आहे.

या स्पर्धेत दोन वेगवेगळ्या भागातील विषयात लघुपटाची निर्मिती करून स्पर्धकाने आपली वैध व सक्रिय ईमेल आयडीसह हा लघुपट युट्युब वर अपलोड करावा. अपलोड केलेली लिंक स्पर्धकाने https:www.mygov.in/ या संकेत स्थळावर स्पर्धकांनी अर्जासह दिनांक 20 जुलै 2021 पर्यंत सादर करणे आवश्यक आहे. स्पर्धेच्या अधिक माहितीसाठी स्पर्धकांनी https://innovateindia.mygov.in/sbmg-innovation-challenge/ या लिंकवर माहिती घ्यावी. भाग 1 मध्‍ये हागणदारीमुक्त अधिकचे लघुपट निर्मितीचे विषय याप्रमाणे जैव-विघटनशील, गोबर्धन, प्लास्टिक कचरा व्यवस्थापन, सांडपाणी व्यवस्थापन, मैला गाळ व्यवस्थापन, वर्तणूक बदल हे विषय असून यात प्रथम पारितोषिक 1 लाख 60 हजार रुपये, व्दितीय 60 हजार रुपये, तर तृतीय पारितोषिक 30 हजार रुपये असे असणार आहे.

भाग दोनमध्ये भौगोलिक परिस्थिती या विषयावर लघुपट निर्मिती करावयाची आहे. यासाठी विषय याप्रमाणे- वाळवंट क्षेत्र, डोंगराळ प्रदेश, सागरी किनारपट्टी लगतचा प्रदेश, मैदानी भाग, पूरप्रवण क्षेत्र असे आहेत. यात प्रथम पारितोषिक 2 लाख रुपये, व्दितीय पारितोषिक 1 लाख 20 हजार रुपये तर तृतीय पारितोषिक 80 हजार रुपये असे असणार आहे. प्रत्येक क्षेत्राकरिता प्रथम व्दितीय व तृतीय पुरस्कार देण्यात येणार आहेत. सहभागासाठी मार्गदर्शक सूचना केंद्र व राज्य शासनाच्‍या पाणी व स्वच्छता विभागातील कर्मचारी सदस्य आणि त्यांचे नातेवाईक वगळता 10 वर्षापेक्षा जास्त वयाच्या सर्व भारतीय नागरिकांसाठी ही स्पर्धा खुली आहे. संस्थात्मक श्रेणीत ग्रामपंचायती, समुदाय आधारित संस्‍था, स्वयंसेवी संस्था, बचत गट देखील या स्‍पर्धेत सहभागी घेऊ शकतात. लघुपट कालावधी कमीत कमी 1 ते 5 मिनिट असावा. केवळ ग्रामीण भागातील वातावरण निर्मिती केलेली लघुपट या स्पर्धेसाठी स्वीकारले जातील. स्पर्धेत सहभाग घेण्यासाठी सर्व स्पर्धकांनी संकेतस्थळावरील नियम व अटींचे अधीन राहून आवेदन अर्ज सादर करावेत. सर्व मान्‍यताप्राप्‍त भारतीय भाषा/ बोलींमधील लघुपट स्‍पर्धेत पात्र असतील. सदर लघुपट निर्मिती स्पर्धेमध्ये जिल्ह्यातील जास्तीत जास्त नागरिकांनी सहभाग घ्‍यावा, असे आवाहन जिल्हा परिषदेच्‍या मुख्य कार्यकारी अधिकारी वर्षा ठाकूर-घुगे आणि पाणी व स्‍वच्‍छता मिशन कक्षाचे उपमुख्य कार्यकारी अधिकारी व्‍ही. आर. पाटील यांनी केले आहे.

जयपाल वाघमारे - संपादक

Recent Posts

आंबेडकरी चळवळीच लोक नेतृत्व असलेल्या सुरेश गायकवाड यांना काँग्रेसने डावलेले;वाळूमाफियाला उमेदवारी

नांदेड,बातमी24:-लोकसभा निवडणुकीत दलित-मुस्लिम मतांवर विजयी साकारणाऱ्या काँग्रेसने यावेळी तिकीट विक्रीचे दुकान चालविले असून अनेक ठिकाणी…

4 weeks ago

सनदी अधिकारी वर्षा ठाकूर-घुगे यांना मराठवाडा भूषण पुरस्कार जाहीर

नांदेड,बातमी24:-मराठवाडा समनव्य समिती पुणे,याच्या वतीने दिला जाणारा या वर्षीचा मराठवाडा भूषण पुरस्कार सनदी अधिकारी तथा…

2 months ago

सीईओ करणवाल यांच्या पुढाकाराने शिक्षकांच्या रिक्त पदांचा प्रश्न निकाली;गुणवत्तेची चिंता मिटणार

नांदेड,बातमी 24:-मागील अनेक वर्षांपासून किनवट व माहुर या दोन तालुक्यातील पेसा क्षेत्रातील रिक्त पदांचा अनुशेष…

3 months ago

जिल्हयात अतिवृष्टीमुळे २ लाख हेक्टरपेक्षा अधिक क्षेत्र बाधित;९३ पैकी ४५ मंडळात अतिवृष्टी

नांदेड,बातमी24 : गेल्या 48 तासांपासून नांदेड जिल्ह्यावर आभाळ कोसळले असून रविवारी जिल्ह्याच्या 93 पैकी 45…

3 months ago

शेतकऱ्यांनी पीक नुकसानीची तक्रार 72 तासांच्या आत करावी:- जिल्हाधिकारी राऊत

नांदेड, बातमी24:- नांदेड जिल्ह्यामध्ये मागील दोन दिवसापासून अतिवृष्टीमुळे पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झालेले आहे. अशा…

3 months ago

नांदेड जिल्ह्यामध्ये अतिवृष्टी; नागरिकांना सतर्कतेचे जिल्हाधिकाऱ्यांचे आवाहन

नांदेड,बातमी24 : नांदेड जिल्ह्यामध्ये गेल्या २४ तासांमध्ये पावसाने जोर धरला असून अजूनही पाऊस सुरू आहे.…

3 months ago