नांदेड

शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाचे नवे अधिष्ठाता रुजू

 

नांदेड,बातमी24: डॉ.शंकरराव चव्हाण शासकीय वैद्यकीय महाविद्यालय अधिष्ठाता डॉ.चंद्रकांत मस्के यांची अचानक बदली करण्यात आली. या रिक्त पदावर स्वामी रामानंद तीर्थ वैद्यकीय महाविद्यालयाचे अधिष्ठाता डॉ.सुधीर देशमुख यांनी अतिरिक्त पदभार स्वीकारला.

सन 2017 साली नांदेड येथील डॉ.शंकरराव चव्हाण शासकीय वैद्यकीय महाविद्यालय अधिष्ठाता डॉ.चंद्रकांत मस्के यांनी पदभार स्वीकारला होता. मात्र त्यांच्यावर मोठी नाराजी होती.बऱ्याच लोकप्रतिनिधीकडून त्यांच्याविषयी मत नकारात्मक होते.तसेच शासनाने नांदेड येथे कोरोनाच्या मृत्यूचा वाढता आकडा याबद्दल नाराजी दर्शविली होती.सदरचा ठपका त्यांच्यावर शासनाने ठेवत डॉ.चंद्रकात मस्के यांची बदली कोल्हापूर येथे झाली.

त्यांच्या रिक्त जागेवर नांदेड येथील अतिरिक्त पदभार डॉ.सुधीर देशमुख यांच्याकडे शासनाने दिला,असून ते सोमवार दि.27 जुलै रोजी दुपारी रुजू झाले. पदभार स्वीकारल्याबद्दल आधार हॉस्पिटलचे प्रमुख डॉ.संजय कदम यांनी डॉ.देशमुख यांचे पुष्पहार देऊन स्वागत केले.

जयपाल वाघमारे - संपादक

Recent Posts

आंबेडकरी चळवळीच लोक नेतृत्व असलेल्या सुरेश गायकवाड यांना काँग्रेसने डावलेले;वाळूमाफियाला उमेदवारी

नांदेड,बातमी24:-लोकसभा निवडणुकीत दलित-मुस्लिम मतांवर विजयी साकारणाऱ्या काँग्रेसने यावेळी तिकीट विक्रीचे दुकान चालविले असून अनेक ठिकाणी…

4 weeks ago

सनदी अधिकारी वर्षा ठाकूर-घुगे यांना मराठवाडा भूषण पुरस्कार जाहीर

नांदेड,बातमी24:-मराठवाडा समनव्य समिती पुणे,याच्या वतीने दिला जाणारा या वर्षीचा मराठवाडा भूषण पुरस्कार सनदी अधिकारी तथा…

2 months ago

सीईओ करणवाल यांच्या पुढाकाराने शिक्षकांच्या रिक्त पदांचा प्रश्न निकाली;गुणवत्तेची चिंता मिटणार

नांदेड,बातमी 24:-मागील अनेक वर्षांपासून किनवट व माहुर या दोन तालुक्यातील पेसा क्षेत्रातील रिक्त पदांचा अनुशेष…

3 months ago

जिल्हयात अतिवृष्टीमुळे २ लाख हेक्टरपेक्षा अधिक क्षेत्र बाधित;९३ पैकी ४५ मंडळात अतिवृष्टी

नांदेड,बातमी24 : गेल्या 48 तासांपासून नांदेड जिल्ह्यावर आभाळ कोसळले असून रविवारी जिल्ह्याच्या 93 पैकी 45…

3 months ago

शेतकऱ्यांनी पीक नुकसानीची तक्रार 72 तासांच्या आत करावी:- जिल्हाधिकारी राऊत

नांदेड, बातमी24:- नांदेड जिल्ह्यामध्ये मागील दोन दिवसापासून अतिवृष्टीमुळे पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झालेले आहे. अशा…

3 months ago

नांदेड जिल्ह्यामध्ये अतिवृष्टी; नागरिकांना सतर्कतेचे जिल्हाधिकाऱ्यांचे आवाहन

नांदेड,बातमी24 : नांदेड जिल्ह्यामध्ये गेल्या २४ तासांमध्ये पावसाने जोर धरला असून अजूनही पाऊस सुरू आहे.…

3 months ago