नांदेड,बातमी24:- नांदेड जिल्ह्यात वाढ झाली,असून आज 138 नवे कोरोनाचे रुग्ण सापडले आहेत. 84 जणांना रुग्णालयातून सुट्टी देण्यात आली आहे.तर मागच्या 24 तासात 4 जणांचा कोरोनामुळे मृत्यू झाला.
मंगळवारी 802 अहवालापैकी 627 अहवाल हे निगेटिव्ह आले,तर 138 जणांचा स्वब कोरोना पॉझिटिव्ह आला आहे.यात आरटीपीसीर चाचणीत 46 तर अटीजनमध्ये 92 असे 138 नवे रुग्ण असून आतापर्यंत 4 हजार 325 झाले आहेत.
सर्वाधिक रुग्ण हे मुखेड-40 त्यानंतर नांदेड शहरात 37 रुग्ण सापडले,त्यापाठोपाठ उमरी-10 रुग्ण आढळून आले.आजमितीस कोरोना मुक्त झालेल्या रुग्णाची संख्या 2 हजार 561 झाली आहे. उपचार घेत असलेले रुग्णसंख्या 1 हजार 580 असून यात 182 रुग्णांची प्रकृती गंभीर आहे.
———-
चार जणांचा कोरोनामुळे मृत्यू
मागच्या 24 तासात चार जणांचा मृत्यू झाला आहे. यात देगलूर तालुक्यातील हणेगाव येथील 55 वर्षीय पुरुषाचा दि.17 रोजी मृत्यू झाला.कंधार तालुक्यातील नवघरवाडी येथील 68 वर्षीय पुरुषाचा दि.18 रोजी,नांदेड येथील 62 वर्षीय पुरुषाचा दि.18 रोजी तर नायगाव तालुक्यातील कहाला येथील 65 वर्षीय पुरुषाचा 18 रोजी मृत्यू झाला.आतापर्यंत कोरोनामुळे मृत्युमुखी पावलेल्या रुग्णांची संख्या 153 झाली आहे.
नांदेड,बातमी24:-लोकसभा निवडणुकीत दलित-मुस्लिम मतांवर विजयी साकारणाऱ्या काँग्रेसने यावेळी तिकीट विक्रीचे दुकान चालविले असून अनेक ठिकाणी…
नांदेड,बातमी24:-मराठवाडा समनव्य समिती पुणे,याच्या वतीने दिला जाणारा या वर्षीचा मराठवाडा भूषण पुरस्कार सनदी अधिकारी तथा…
नांदेड,बातमी 24:-मागील अनेक वर्षांपासून किनवट व माहुर या दोन तालुक्यातील पेसा क्षेत्रातील रिक्त पदांचा अनुशेष…
नांदेड,बातमी24 : गेल्या 48 तासांपासून नांदेड जिल्ह्यावर आभाळ कोसळले असून रविवारी जिल्ह्याच्या 93 पैकी 45…
नांदेड, बातमी24:- नांदेड जिल्ह्यामध्ये मागील दोन दिवसापासून अतिवृष्टीमुळे पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झालेले आहे. अशा…
नांदेड,बातमी24 : नांदेड जिल्ह्यामध्ये गेल्या २४ तासांमध्ये पावसाने जोर धरला असून अजूनही पाऊस सुरू आहे.…