नांदेड,बातमी:-कोविड-19 अंतर्गत लसीकरण अभियान अधिक गतिमान करण्यासाठी जिल्हाधिकारी डॉ.विपीन इटनकर व जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकारी वर्षा ठाकूर यांच्या मार्गदर्शनाखाली हर घर दस्तक अभियानाच्या माध्यमातून चला गावाकडे जाऊ सर्वांचे लसीकरण करून घेऊ ही मोहीम जिल्हाभर दि. 24 नोव्हेंबर रोजी राबविले जाणार आहे,यामध्ये जिल्हाभरातील आपल्या-आपल्या गावातील अधिकारी व कर्मचारी स्वतःच्या गाव पातळीवर जाऊन लसीकरणासाठी पुढाकार घेणार असल्याची माहिती जिल्हाधिकारी डॉ.विपीन इटनकर यांनी दिली.
कोरोनाच्या महामारीला रोखण्यासाठी लसीकरण हा त्यावरील रामबाण उपाय असून लसीकरण करून घेतलेल्या नागरिकांना कोरोनाची लागण होण्याची शक्यता कमी असते,त्यामुळे केंद्र व राज्य सरकारच्या संयुक्त विद्यमाने लसीकरण अभियान देशपातळीवर गतिमान केले जात आहे.काही भागात अद्याप लसीकरण अल्प प्रतिसाद मिळत आहे. परिणामी लसीकरणाचा टक्का मंदावला आहे.
ग्रामीण भागातील ज्या नागरिकांनी स्वतःचे लसीकरण घेतले नाही,अशा नागरिकांचे लसीकरण करून घेण्यासाठी त्या-त्या गावातील अधिकारी व कर्मचारी हे पुढाकार घेणार असल्याचे डॉ.विपीन इटनकर यांनी सांगितले.
दि.24 रोजी सकाळी नऊ ते दहा वाजेपर्यंत नागरिकांचे प्रबोधन करणे,तसेच सायंकाळी पाच वाजेपर्यंत नागरिकांचे लसीकरण करून घेतले जाणार आहे.यासाठी जिल्ह्यातील अधिकारी- कर्मचाऱ्यांना दि.24 रोजी आप आपल्या गावी जाऊन परिश्रम घावे लागणार आहे,तसेच केलेल्या कामकाजाचा अहवाल ही प्रशासनाला द्यावा लागणार असल्याचे सांगण्यात येणार आहे.
यापूर्वी जिल्हाधिकारी डॉ.इटनकर यांनी लसीलरणाचा टक्का वाढला पाहिजे, यासाठी मिशन कवचकुंडल, असे प्रयोग करून लसीकरण करून घेत या मोहिमेला गती दिली आहे.
नांदेड,बातमी24:-लोकसभा निवडणुकीत दलित-मुस्लिम मतांवर विजयी साकारणाऱ्या काँग्रेसने यावेळी तिकीट विक्रीचे दुकान चालविले असून अनेक ठिकाणी…
नांदेड,बातमी24:-मराठवाडा समनव्य समिती पुणे,याच्या वतीने दिला जाणारा या वर्षीचा मराठवाडा भूषण पुरस्कार सनदी अधिकारी तथा…
नांदेड,बातमी 24:-मागील अनेक वर्षांपासून किनवट व माहुर या दोन तालुक्यातील पेसा क्षेत्रातील रिक्त पदांचा अनुशेष…
नांदेड,बातमी24 : गेल्या 48 तासांपासून नांदेड जिल्ह्यावर आभाळ कोसळले असून रविवारी जिल्ह्याच्या 93 पैकी 45…
नांदेड, बातमी24:- नांदेड जिल्ह्यामध्ये मागील दोन दिवसापासून अतिवृष्टीमुळे पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झालेले आहे. अशा…
नांदेड,बातमी24 : नांदेड जिल्ह्यामध्ये गेल्या २४ तासांमध्ये पावसाने जोर धरला असून अजूनही पाऊस सुरू आहे.…