नांदेड

माळेगाव येथे केवळ नैमित्तिक पूजेला मुभा; संभाव्य धोका विचारात घेता प्रशासनाचा निर्णय

नांदेड,बातमी24:- कोरोना पाठोपाठ ओमायक्रॉन संसर्गाच्या धोक्यापासून जिल्ह्यातील नागरिकांच्या हिताला प्राधान्य देणे हे अधिक अत्यावश्यक आहे. ओमायक्रॉन पाठोपाठ जनावरांमध्येही लाळखुरकत सारखे सदृश्य आजार मोठ्या प्रमाणात दिसून येत आहेत. याबाबत जिल्हा परिषद, आरोग्य विभाग, उपायुक्त पशुसंवर्धन व पोलीस विभाग यांनी सादर केलेल्या सर्व बाबींचा साकल्याने विचार करण्यात आला. जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणाने याबाबत अधिक विचार करुन माळेगाव येथील धार्मिक ठिकाणी अटी व शर्तीच्या अधीन केवळ धार्मिक, नैमित्तिक पूजा-अर्चा इत्यादी विधींना विहीत केलेल्या व्यक्तींच्या संख्येच्या मर्यादेतच पार पाडण्यास मुभा राहील. परंतु इतर कार्यक्रमांना अनुमती नसेल. असे सर्वांनुमते ठरल्याची माहिती निवासी उपजिल्हाधिकारी प्रदिप कुलकर्णी यांनी प्रसिध्दी पत्रकान्वये दिली आहे.

 

राज्यामध्ये विविध ठिकाणी मोठ्या प्रमाणात जनावरांमध्ये लाळ्याखुरकूत रोगाची साथ सुरु आहे. त्यावर प्रतिबंध म्हणून शासनामार्फत व केंद्रसरकारद्वारे सदर रोग नियंत्रण कार्यक्रम 15 जानेवारी पर्यंत चालणार आहे. या सर्व बाबींचा विचार करुन हा निर्णय घेण्यात आला आहे. या यात्रेत लाखो यात्रेकरु दरवर्षी सहभागी होतात. एवढी मोठी संख्या जर विविध ठिकाणाहून जिल्ह्यात येत असेल तर कोविडच्या अनुषंगाने सुरक्षा मानकानुसार दोन व्यक्तींमध्ये अंतर व इतर काळजी शक्य होणार नाही. यात कोविड अनुरुप वर्तनाचे पालन होणे शक्य होणार नाही.

याचबरोबर नांदेड जिल्ह्यात सद्यस्थितीत दोन्ही डोस पुर्ण केलेल्या नागरिकांची संख्या 32 टक्के आहे. नांदेड जिल्ह्याचा लोकसंख्येच्या प्रमाणात पहिला व दुसरा डोस मिळून कोविड लसीकरणाची सरासरी 67 टक्के झाले आहे. हे प्रमाण संसर्ग रोखण्यासाठी संपुर्णपणे सुरक्षित नाही. लसीकरणाची असलेली टक्केवारी, व इतर आरोग्याची वस्तूस्थिती लक्षात घेऊन या स्थितीत कोरोना आजाराचा प्रसार व उद्रेक होण्याची शक्यता नाकारता येत नाही. सर्व बाबींचा साकल्याने विचार करुन जिल्हा प्रशासनाने हा निर्णय घेतला.

जयपाल वाघमारे - संपादक

Recent Posts

सनदी अधिकारी वर्षा ठाकूर-घुगे यांना मराठवाडा भूषण पुरस्कार जाहीर

नांदेड,बातमी24:-मराठवाडा समनव्य समिती पुणे,याच्या वतीने दिला जाणारा या वर्षीचा मराठवाडा भूषण पुरस्कार सनदी अधिकारी तथा…

5 days ago

सीईओ करणवाल यांच्या पुढाकाराने शिक्षकांच्या रिक्त पदांचा प्रश्न निकाली;गुणवत्तेची चिंता मिटणार

नांदेड,बातमी 24:-मागील अनेक वर्षांपासून किनवट व माहुर या दोन तालुक्यातील पेसा क्षेत्रातील रिक्त पदांचा अनुशेष…

2 weeks ago

जिल्हयात अतिवृष्टीमुळे २ लाख हेक्टरपेक्षा अधिक क्षेत्र बाधित;९३ पैकी ४५ मंडळात अतिवृष्टी

नांदेड,बातमी24 : गेल्या 48 तासांपासून नांदेड जिल्ह्यावर आभाळ कोसळले असून रविवारी जिल्ह्याच्या 93 पैकी 45…

2 weeks ago

शेतकऱ्यांनी पीक नुकसानीची तक्रार 72 तासांच्या आत करावी:- जिल्हाधिकारी राऊत

नांदेड, बातमी24:- नांदेड जिल्ह्यामध्ये मागील दोन दिवसापासून अतिवृष्टीमुळे पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झालेले आहे. अशा…

2 weeks ago

नांदेड जिल्ह्यामध्ये अतिवृष्टी; नागरिकांना सतर्कतेचे जिल्हाधिकाऱ्यांचे आवाहन

नांदेड,बातमी24 : नांदेड जिल्ह्यामध्ये गेल्या २४ तासांमध्ये पावसाने जोर धरला असून अजूनही पाऊस सुरू आहे.…

3 weeks ago

नांदेड जिल्ह्याचे खासदार वसंतराव चव्हाण यांचे निधन

नांदेड,बातमी24:-नांदेड जिल्ह्याचे नवनिर्वाचित खासदार वसंतराव चव्हाण यांचे निधन झाले, ही वार्ता दि.26 सोमवारी सकाळी धडकली.त्याच्यावर…

4 weeks ago