नांदेड

पंचायत राज समिती अध्यक्षांनी आरोग्य विभागाच्या कार्यावर व्यक्त केले समाधान

 

नांदेड, बातमी24:- जिल्ह्याच्या दौऱ्याचा पत्रकारांशी अनौपचारिक संवाद साधताना एका प्रश्नावर बोलताना आरोग्य विभागाचे कार्य समाधान कारक असल्याचे सांगत, या विभागामार्फत चालविल्या जाणाऱ्या प्राथमिक आरोग्य केंद्र व उपकेंद्रा अंतर्गत ग्रामीण भागातील रुग्णांना मिळणाऱ्या सुविधा पाहून आनंद वाटल्याची भावना पंचायत राज समिती अध्यक्ष डॉ.संजय रायमूलकर यांनी व्यक्त केली.

तीन दिवसांच्या दोऱ्यावर आलेल्या पंचायत राज समितीने ग्रामीण भागातील विविध संस्थांची पाहणी आमदारांच्या शिष्टमंडळाने काल केली होती.

पत्रकारांशी बोलताना संजय रायमूलकर म्हणाले,की ज्या भागातील प्राथमिक आरोग्य केंद्रास भेटी दिल्या असता, आरोग्याबाबत ज्या भौतिक सुविधा निर्माण केल्या गेल्या आहेत,त्यातून रुग्णांना लाभ मिळत आहे. जे काही प्राथमिक आरोग्य केंद्र अद्यावत तयार केले गेले,तसे रुग्णालय जिल्ह्यात सर्वत्र उभारले जाणे आवश्यक असल्याचे मत डॉ.रायमूलकर यांनी व्यक्त केले.

आरोग्य विभागाच्या विविध प्राथमिक आरोग्य केंद्र अंतर्गत एक्सरे मशीन, रक्त तपासणी प्रयोग शाळा,शस्त्रक्रिया विभाग याची कामे अद्यावत झाली आहेत.ही कामे पंचायत राज समितीच्या निर्देशनास आली.त्यामुळे पंचायत राज समिती अध्यक्ष डॉ.संजय रायमूलकर यांनी आरोग्य विभागाचे भरभरून कौतुक केले.इतर सर्व विभागाच्या तुलनेत या विभागाबदल सकारात्मक दृष्टीकोन दाखविल्याचे दिसून आले.

जयपाल वाघमारे - संपादक

Recent Posts

सनदी अधिकारी वर्षा ठाकूर-घुगे यांना मराठवाडा भूषण पुरस्कार जाहीर

नांदेड,बातमी24:-मराठवाडा समनव्य समिती पुणे,याच्या वतीने दिला जाणारा या वर्षीचा मराठवाडा भूषण पुरस्कार सनदी अधिकारी तथा…

5 days ago

सीईओ करणवाल यांच्या पुढाकाराने शिक्षकांच्या रिक्त पदांचा प्रश्न निकाली;गुणवत्तेची चिंता मिटणार

नांदेड,बातमी 24:-मागील अनेक वर्षांपासून किनवट व माहुर या दोन तालुक्यातील पेसा क्षेत्रातील रिक्त पदांचा अनुशेष…

2 weeks ago

जिल्हयात अतिवृष्टीमुळे २ लाख हेक्टरपेक्षा अधिक क्षेत्र बाधित;९३ पैकी ४५ मंडळात अतिवृष्टी

नांदेड,बातमी24 : गेल्या 48 तासांपासून नांदेड जिल्ह्यावर आभाळ कोसळले असून रविवारी जिल्ह्याच्या 93 पैकी 45…

2 weeks ago

शेतकऱ्यांनी पीक नुकसानीची तक्रार 72 तासांच्या आत करावी:- जिल्हाधिकारी राऊत

नांदेड, बातमी24:- नांदेड जिल्ह्यामध्ये मागील दोन दिवसापासून अतिवृष्टीमुळे पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झालेले आहे. अशा…

2 weeks ago

नांदेड जिल्ह्यामध्ये अतिवृष्टी; नागरिकांना सतर्कतेचे जिल्हाधिकाऱ्यांचे आवाहन

नांदेड,बातमी24 : नांदेड जिल्ह्यामध्ये गेल्या २४ तासांमध्ये पावसाने जोर धरला असून अजूनही पाऊस सुरू आहे.…

3 weeks ago

नांदेड जिल्ह्याचे खासदार वसंतराव चव्हाण यांचे निधन

नांदेड,बातमी24:-नांदेड जिल्ह्याचे नवनिर्वाचित खासदार वसंतराव चव्हाण यांचे निधन झाले, ही वार्ता दि.26 सोमवारी सकाळी धडकली.त्याच्यावर…

4 weeks ago