Categories: नांदेड

जिल्ह्यातील लॉकडाऊनच्या चर्चेला विराम

नांदेड, बातमी24ः- नांदेड जिल्ह्यात वाढत असलेल्या कोरोनाच्या रुग्णांची संख्या चिंता वाढविणारी आहे. कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी जिल्ह्यात दि. 9 जुलैपासून दि. 18 जुलैपर्यंत लॉकडाऊन होणार असल्याची जोरदार चर्चा सोमवार दि. 6 जुलै रोजी रात्री नऊ वाजेनंतर झाली होती. जिल्हाधिकारी डॉ. विपीन इटनकर यांनी लॉकडाऊनच्या चर्चांना विराम दिला आहे.

कोरोनाच्या रुग्णांची वाढती संख्या पाहता याबाबत पालकमंत्री अशोक चव्हाण व जिल्हाधिकारी डॉ.विपीन इटनकर यांच्यात एकमत झाल्याचे बोलले जात होते. यावरून जिल्ह्यात लॉकडाऊन लागणार असल्याची जोरदार चर्चा सोशल मिडियावर होत असातना जिल्हाधिकार्‍यांकडून या संदर्भात कोणत्याही प्रकारचा निर्णय झाला नसल्याचे कळविले.

नांदेड जिल्ह्यात कोरोनाच्या रुग्णांची संख्या झपाटयाने वाढत आहे. पूर्वी नांदेड शहरापुरती कोरोनाच्या रुग्णांची संख्या होती. मात्र मागच्या काही दिवसांमध्ये कोरोनाचे रुग्ण हे ग्रामीण भागात ही वाढत आहे. टाळेबंदीमध्ये शिथिलता देण्यात आल्याने लोक बिनधास्तपणे फि रत आहेत. अनेकांकडून शाररीक अंतर ही पाळले जात नाही. बाजार व रस्त्यावर गर्दी वाढत चालली आहे.त्यामुळे जिल्ह्यातील कोरोनाच्या रुग्णांची संख्येत दिवसेंदिव वाढ होत आहे.

आजघडिला नांदेड जिल्ह्यात कोरोनाच्या रुग्णांची संख्या 447 झाली आहे. तर आतापर्यंत कोरोनातून 334 रुग्ण बरे झाले आहेत. औरंगाबादनंतर सर्वाधिक कोरोनाच्या रुग्णांचा मृत्यू नांदेड जिल्ह्यात झाला, असून त्याची संख्या 20 वर गेली आहे. या सगळया पार्श्वभूमिचा विचार करता, नांदेड जिल्ह्यातील कोरोनाच्या रुग्णांची संख्या नियंत्रणात आणणे महत्वाचे आहे. यासाठी प्रशासनावर लॉकडाऊनचा निर्णय घेण्याबाबत जनतेमधून दबाव वाढत आहे.

सोमवार दि.6 जुलै रोजी पालकमंत्री तथा सार्वजनिक बांधकाममंत्री अशोक चव्हाण यांनी कोरोनाच्या संदर्भान अधिकार्‍यांसोबत आढावा बैठक घेतली. या बैठकीत लॉकडाऊन बाबत चर्चा झाल्याचे सांगण्यात आले. यातूनच दि.9 जुलै ते 18 जुलै असे नऊ दिवसांचे लॉकडाऊन लागणार अशी चर्चा सुरु झाली होती. अशा चर्चांना डॉ. इटनकर यांनी विराम दिला आहे.
——
जिल्ह्यातील सर्व परिस्थितीचा प्रातिनिधीक स्वरुपात समाजातील सर्व घटकांचा विचार करून आवश्यकता भासल्यास निर्णय घेतला जाईल.
डॉ. विपीन इटनकर ः जिल्हाधिकारी नांदेड.

जयपाल वाघमारे - संपादक

Recent Posts

सनदी अधिकारी वर्षा ठाकूर-घुगे यांना मराठवाडा भूषण पुरस्कार जाहीर

नांदेड,बातमी24:-मराठवाडा समनव्य समिती पुणे,याच्या वतीने दिला जाणारा या वर्षीचा मराठवाडा भूषण पुरस्कार सनदी अधिकारी तथा…

5 days ago

सीईओ करणवाल यांच्या पुढाकाराने शिक्षकांच्या रिक्त पदांचा प्रश्न निकाली;गुणवत्तेची चिंता मिटणार

नांदेड,बातमी 24:-मागील अनेक वर्षांपासून किनवट व माहुर या दोन तालुक्यातील पेसा क्षेत्रातील रिक्त पदांचा अनुशेष…

2 weeks ago

जिल्हयात अतिवृष्टीमुळे २ लाख हेक्टरपेक्षा अधिक क्षेत्र बाधित;९३ पैकी ४५ मंडळात अतिवृष्टी

नांदेड,बातमी24 : गेल्या 48 तासांपासून नांदेड जिल्ह्यावर आभाळ कोसळले असून रविवारी जिल्ह्याच्या 93 पैकी 45…

2 weeks ago

शेतकऱ्यांनी पीक नुकसानीची तक्रार 72 तासांच्या आत करावी:- जिल्हाधिकारी राऊत

नांदेड, बातमी24:- नांदेड जिल्ह्यामध्ये मागील दोन दिवसापासून अतिवृष्टीमुळे पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झालेले आहे. अशा…

3 weeks ago

नांदेड जिल्ह्यामध्ये अतिवृष्टी; नागरिकांना सतर्कतेचे जिल्हाधिकाऱ्यांचे आवाहन

नांदेड,बातमी24 : नांदेड जिल्ह्यामध्ये गेल्या २४ तासांमध्ये पावसाने जोर धरला असून अजूनही पाऊस सुरू आहे.…

3 weeks ago

नांदेड जिल्ह्याचे खासदार वसंतराव चव्हाण यांचे निधन

नांदेड,बातमी24:-नांदेड जिल्ह्याचे नवनिर्वाचित खासदार वसंतराव चव्हाण यांचे निधन झाले, ही वार्ता दि.26 सोमवारी सकाळी धडकली.त्याच्यावर…

4 weeks ago