नांदेड, बातमी24ः- कोरोनाच्या बाबतीत बाहेर काळजीचे पाठ गाणार्या प्रशासनाचे आतील भेसुर वास्तव बाहेर काढण्याचे काम दुसर्य-तिसर्या कुणी नव्हे तर चक्क कोरोना पॉझिटीव्ह रुग्णाने केले आहे. रुग्णांचे होणारी हेळसांड दाखविणारा व्हिडिओ या रुग्णांने बनवून सोशल मिडियावर प्रदर्शित करत प्रशासनाच्या कोविड केअर सेंटरची पोलखोल केली. शिवाया व्हिडिओच्या माध्यमातून प्रशासनास चपराक ही लगावली आहे. हा व्हिडिओ पाहून सामान्य माणसामधून प्रशासनाबद्दल चिड निर्माण होत आहे. कोरोनाच्या आडून प्रशासन शासकीय निधीची लुट करत असल्याचा आरोप ही सामान्यांमधून होत आहे.
देगलूर येथील कोविड केअर सेंटर आयटीआय येथे करण्यात आले आहे. काही दिवसांमध्ये कोरोनाच्या रुग्णांची भर या तालुक्यात पडली, असून रुग्णांना उपचारासाठी येथील केअर सेंटर येथे भरती केले आहे. या केअरमध्ये उपचार घेणार्या एका रुग्णाने प्रशासनाच्या कोविड केअर सेंटरची आतील भौतिक सुविधांची पोलखोल करणारा व्हिडिओ बनविला आहे. येथे झोपण्यासाठी कॉट नाहीत. चार दिवसांपासून सुद्धा दिलेले नाही.जेवन बाहेर फे कुन जातात. औषधी तर आम्हाला दिलेलीच नाही.
प्रतिकार शक्तीवर निट व्हाल, नियमित चेकअप झालेले नाही.आवाज दिला तरी कुणीही ऐकायला तयार नसत.जेवनाची परिस्थिती सगळयात वाईट असून सकाळचा नाष्टा लहान लेकरांना सुद्धा पुरणार नाही, इतका असतो.बाथरुची परिस्थिती तर सर्वात वाईट आहे. बाथरुमध्ये पाणी सुद्धा नाही. त्या तरुणाच्या व्हिडिओवरून सगळा सावळा गोंधळ समोर आला आहे.
——
कोरोडो रुपयांचा निधी जातोय कुठे ?
ज्या शासनाने कोरोनाचा संसर्ग रोखण्यासाठी प्रत्येक जिल्ह्यासाठी कोरोडो रुपयांचा निधी देऊ केला आहे. त्यातून प्रत्येक तालुक्यात ही निधी वितरीत झालेला असताना या निधीची दुरुपयोग होतोय, की काय असा प्रश्न त्या युवकाच्या व्हिडिओवरून दिसून येत आहे. शासनातील अधिकारी उपाययोजना वरवरच्या दाखवून पैसा हडप करतात अशी शंका निर्माण व्हायला वाव मिळत आहे. जिल्हाधिकारी डॉ. विपीन इटनकर यांनी हे दखल घेणार काय असा प्रश्न निर्माण होत आहे.
नांदेड,बातमी24:-लोकसभा निवडणुकीत दलित-मुस्लिम मतांवर विजयी साकारणाऱ्या काँग्रेसने यावेळी तिकीट विक्रीचे दुकान चालविले असून अनेक ठिकाणी…
नांदेड,बातमी24:-मराठवाडा समनव्य समिती पुणे,याच्या वतीने दिला जाणारा या वर्षीचा मराठवाडा भूषण पुरस्कार सनदी अधिकारी तथा…
नांदेड,बातमी 24:-मागील अनेक वर्षांपासून किनवट व माहुर या दोन तालुक्यातील पेसा क्षेत्रातील रिक्त पदांचा अनुशेष…
नांदेड,बातमी24 : गेल्या 48 तासांपासून नांदेड जिल्ह्यावर आभाळ कोसळले असून रविवारी जिल्ह्याच्या 93 पैकी 45…
नांदेड, बातमी24:- नांदेड जिल्ह्यामध्ये मागील दोन दिवसापासून अतिवृष्टीमुळे पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झालेले आहे. अशा…
नांदेड,बातमी24 : नांदेड जिल्ह्यामध्ये गेल्या २४ तासांमध्ये पावसाने जोर धरला असून अजूनही पाऊस सुरू आहे.…