Categories: नांदेड

महापौरांनी केलेली मागणी पाहता लॉकडाऊन लागण्याची शक्यता

नांदेड, बातमी24ः- नांदेड जिल्ह्यात कोरोनाच्या रुग्णांचा आकडा थांबण्याचे नाव घेत नाही. दिवसांगणिक रुग्ण संख्या वाढत आहेश या पार्श्वभूमिमवर नांदेड-वाघाळा महानगर पालिकेच्या महापौर दीक्षा धबाले यांनी दि. 15 जुलैनंतर लॉकडाऊन करण्याच्या मागणीचे पत्र दिले आहे. सदरची मागणी पाहता जिल्ह्यात लॉकडाऊन लागणार जवळपास निश्चित मानले जात आहे.

कोरोनाच्या रुग्णांची वाढती संख्या पाहता इतर जिल्ह्याप्रमाणे लॉकडाऊन लावण्याची मागणी जोर धरू लागली आहे. दोन दिवसांपूर्वी पालकमंत्री अशोक चव्हाण यांनी अधिकार्‍यांच्या घेतलेल्या बैठकीत तशी चर्चा झाली होती. यास अशोक चव्हाण यांचा हिरवाकंदील आहे.दरम्यानच्या काळात व्यापार्‍यांशी सुद्धा संवाद जिल्हाधिकार्‍यांनी साधला आहे. मात्र व्यापार्‍यांकडून विरोध दर्शविण्यात आला होता.

लॉकडाऊन न करता नियम कडक करण्याच्या आदेश देण्यात आले आहे. या सगळया घडामोडीनंतर महापौर दीक्षा धबाले यांनी लॉकडाऊन लावण्यासंबंधी केलेली मागणी पाहता, सदरची प्रशासनास गांभीर्याने घ्यावी लागणार आहे. महापौरांनी केलेल्या सूचनांचे पालन प्रशासनास करावे लागते. तसे ही पाहता कोरेानाची परिस्थिती चिघळत आहे. त्यामुळे दीक्षा धबाले यांनी पत्र देऊन लॉकडाऊनसंबंधी केलेल्या सूचनांचा विचार करता 15 जुलैनंतर लॉकडाऊन लागू शकते, अशी शक्यता अधिकारी-कर्मचार्‍यांमधून व्यक्त होत.

जयपाल वाघमारे - संपादक

Recent Posts

आंबेडकरी चळवळीच लोक नेतृत्व असलेल्या सुरेश गायकवाड यांना काँग्रेसने डावलेले;वाळूमाफियाला उमेदवारी

नांदेड,बातमी24:-लोकसभा निवडणुकीत दलित-मुस्लिम मतांवर विजयी साकारणाऱ्या काँग्रेसने यावेळी तिकीट विक्रीचे दुकान चालविले असून अनेक ठिकाणी…

4 weeks ago

सनदी अधिकारी वर्षा ठाकूर-घुगे यांना मराठवाडा भूषण पुरस्कार जाहीर

नांदेड,बातमी24:-मराठवाडा समनव्य समिती पुणे,याच्या वतीने दिला जाणारा या वर्षीचा मराठवाडा भूषण पुरस्कार सनदी अधिकारी तथा…

2 months ago

सीईओ करणवाल यांच्या पुढाकाराने शिक्षकांच्या रिक्त पदांचा प्रश्न निकाली;गुणवत्तेची चिंता मिटणार

नांदेड,बातमी 24:-मागील अनेक वर्षांपासून किनवट व माहुर या दोन तालुक्यातील पेसा क्षेत्रातील रिक्त पदांचा अनुशेष…

3 months ago

जिल्हयात अतिवृष्टीमुळे २ लाख हेक्टरपेक्षा अधिक क्षेत्र बाधित;९३ पैकी ४५ मंडळात अतिवृष्टी

नांदेड,बातमी24 : गेल्या 48 तासांपासून नांदेड जिल्ह्यावर आभाळ कोसळले असून रविवारी जिल्ह्याच्या 93 पैकी 45…

3 months ago

शेतकऱ्यांनी पीक नुकसानीची तक्रार 72 तासांच्या आत करावी:- जिल्हाधिकारी राऊत

नांदेड, बातमी24:- नांदेड जिल्ह्यामध्ये मागील दोन दिवसापासून अतिवृष्टीमुळे पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झालेले आहे. अशा…

3 months ago

नांदेड जिल्ह्यामध्ये अतिवृष्टी; नागरिकांना सतर्कतेचे जिल्हाधिकाऱ्यांचे आवाहन

नांदेड,बातमी24 : नांदेड जिल्ह्यामध्ये गेल्या २४ तासांमध्ये पावसाने जोर धरला असून अजूनही पाऊस सुरू आहे.…

3 months ago