नांदेड, बातमी24ः भाजपाचे खासदार प्रताप पाटील चिखलीकर यांचे चिरंजीव प्रवीण पाटील चिखलीकर यांचा अहवाल नुकताच कोरोना पॉझिटीव्ह आला होता. त्यांची प्रकृतीस्थिर असली, तरी पुढील उपचारासाठी मुंबई किंवा औरंगाबाद येथे हलविण्यात येणार आहे. तसेच प्रवीण पाटील चिखलीकर यांच्यानंतर त्यांच्या कुटुंबियातील सदस्यांची चाचणी घेण्यात आली.यात सर्वांचे अहवाल निगेटीव्ह आले असल्याचे त्यांच्या निकटवृत्तीयांकडून सांगण्यात आले.
जिल्हापरिषद सदस्य प्रवीण पाटील चिखलीकर हे मुंबई येथे गेले होते. रविवारी नांदेड येथे परतल्यानंतर सायंकाळी त्यांनी अॅटीजन किटव्दारे चाचणी केली, असता त्यात त्यांचा अहवाल कोेरोना पॉझिटीव्ह आला होता. आजमितीस त्यांच्यावर पावडेवाडी नाका भागातील आशा नामक एका खासगी रुग्णालयात उपचार सुरु आहेत. डॉक्टरांच्या सल्याने प्रवीण पाटील चिखलीकर यांना मुंबई किंवा औरंगाबाद येथे उपचारासाठी पाठविण्यात येणार असल्याचे निकटवर्तींयाकडून सांगण्यात आले.
नांदेड,बातमी24:-लोकसभा निवडणुकीत दलित-मुस्लिम मतांवर विजयी साकारणाऱ्या काँग्रेसने यावेळी तिकीट विक्रीचे दुकान चालविले असून अनेक ठिकाणी…
नांदेड,बातमी24:-मराठवाडा समनव्य समिती पुणे,याच्या वतीने दिला जाणारा या वर्षीचा मराठवाडा भूषण पुरस्कार सनदी अधिकारी तथा…
नांदेड,बातमी 24:-मागील अनेक वर्षांपासून किनवट व माहुर या दोन तालुक्यातील पेसा क्षेत्रातील रिक्त पदांचा अनुशेष…
नांदेड,बातमी24 : गेल्या 48 तासांपासून नांदेड जिल्ह्यावर आभाळ कोसळले असून रविवारी जिल्ह्याच्या 93 पैकी 45…
नांदेड, बातमी24:- नांदेड जिल्ह्यामध्ये मागील दोन दिवसापासून अतिवृष्टीमुळे पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झालेले आहे. अशा…
नांदेड,बातमी24 : नांदेड जिल्ह्यामध्ये गेल्या २४ तासांमध्ये पावसाने जोर धरला असून अजूनही पाऊस सुरू आहे.…