नांदेड,बातमी24:- लोकसभा निवडणुकीत वंचीत बहुजन आघाडीकडून पावणेदोन लाख मते घेणारे प्रा.यशपाल भिंगे यांच्या नावाची राज्यपाल नियुक्त आमदारकीची राष्ट्रवादीने अंतिम बारा जणांच्या यादीत शिफारस केली आहे. त्यामुळे खलबते सुरू होते. मागच्या आठवड्यात झालेल्या मंत्रीमंडळाच्या झालेल्या बैठकीत मजुरी देण्यात आली होती.त्यानुसार राष्ट्रवादीने एकनाथ खडसे, राजू शेट्टी,आनंद शिंदे,प्रा.यशपाल भिंगे,
काँग्रेसकडून रजनी पाटील, सचिन सावंत,मुझफर हुसेन, अनिरुद्ध बनकर,तर शिवसेनेकडून उर्मिला मातोंडकर,नितीन बानगुडे,चंद्रकात बनकर व विजय करदकर यांची नावे पाठविली आहेत.या सर्व नावावर राज्यपाल यांच्याकडून मंजुरीची औपचारिकता बाकी राहिली आहे.
——–
प्रा.भिंगे यांच्या रूपाने नांदेडला मिळाले अजून एक आमदार
प्रा.यशपाल भिंगे यांच्या रूपाने नांदेडला विधान परिषद एक आमदार मिळाले आहेत. विचारवंत,साहित्यिक व चांगले वक्ते अशी प्रा. भिंगे यांची प्रतिमा आहे.यापूर्वी नांदेडमध्ये विधान परिषदेवर कॉंग्रेसकडून अमर राजूरकर, भाजप राम पाटील रातोळीकर यांच्या नंतर आता प्रा.यशपाल भिंगे यांचा नंबर लागला आहे.
नांदेड,बातमी24:-लोकसभा निवडणुकीत दलित-मुस्लिम मतांवर विजयी साकारणाऱ्या काँग्रेसने यावेळी तिकीट विक्रीचे दुकान चालविले असून अनेक ठिकाणी…
नांदेड,बातमी24:-मराठवाडा समनव्य समिती पुणे,याच्या वतीने दिला जाणारा या वर्षीचा मराठवाडा भूषण पुरस्कार सनदी अधिकारी तथा…
नांदेड,बातमी 24:-मागील अनेक वर्षांपासून किनवट व माहुर या दोन तालुक्यातील पेसा क्षेत्रातील रिक्त पदांचा अनुशेष…
नांदेड,बातमी24 : गेल्या 48 तासांपासून नांदेड जिल्ह्यावर आभाळ कोसळले असून रविवारी जिल्ह्याच्या 93 पैकी 45…
नांदेड, बातमी24:- नांदेड जिल्ह्यामध्ये मागील दोन दिवसापासून अतिवृष्टीमुळे पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झालेले आहे. अशा…
नांदेड,बातमी24 : नांदेड जिल्ह्यामध्ये गेल्या २४ तासांमध्ये पावसाने जोर धरला असून अजूनही पाऊस सुरू आहे.…