नादेड, बातमी24ः- किनवट तालुक्यातील इसापुर पोलिस ठाण्याच्या सहाय्यक फ ौजदारास सहा हजार रुपये लाचेची मागणी केल्याप्रकरणी गुन्हा नोंद करण्यात आला आहे.परंतु या प्रकरणी आरोपी असलेला सहाय्यक फ ौजदार मात्र फ रार झाला, असून त्याचा पोलिस शोध घेत आहेत.
एका गुन्हयाच्या तपासात मदत करण्यासाठी तक्रारदाराकडून 20 हजार रुपयांची मागणी किनवट तालुक्यातील इस्लापुर पोलिस ठाण्याचे सहाय्यक फ ौजदार केशव मंगु जाधव यांनी केली होती. तडजोडी अंती तक्रारदाराकडून सहा हजार रुपये मिळविण्याचा प्रयत्न आरोपी जाधव यांनी केला. सबब गुन्ह्यातील आरोपी फ रार झाला, असून त्याच्याविरुद्ध इस्लापुर पोलिस ठाण्यात गुन्हा नोंद करण्यात आला आहे.
या प्रकरणाचा तपास पोलिस निरीक्षक शेषराव नितनवरे हे करत आहेत.ही कारवाई लाचलुचत प्रतिबंधक विभागाचे पोलिस अधीक्षक कल्पना बोराळकर, अप्पर पोलिस अधीक्षक अर्चना पाटील, पोलिस उपअधीक्षक विजय डोंगरे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस निरीक्षक शेषराव नितनवरे, हणमंत बोराळकर, गणेश केजकर,सचिन गायकवाड, गणेश तालकोकुलवार, मारोती सोनटक्के यांच्या पथकाने केली.
नांदेड,बातमी24:-लोकसभा निवडणुकीत दलित-मुस्लिम मतांवर विजयी साकारणाऱ्या काँग्रेसने यावेळी तिकीट विक्रीचे दुकान चालविले असून अनेक ठिकाणी…
नांदेड,बातमी24:-मराठवाडा समनव्य समिती पुणे,याच्या वतीने दिला जाणारा या वर्षीचा मराठवाडा भूषण पुरस्कार सनदी अधिकारी तथा…
नांदेड,बातमी 24:-मागील अनेक वर्षांपासून किनवट व माहुर या दोन तालुक्यातील पेसा क्षेत्रातील रिक्त पदांचा अनुशेष…
नांदेड,बातमी24 : गेल्या 48 तासांपासून नांदेड जिल्ह्यावर आभाळ कोसळले असून रविवारी जिल्ह्याच्या 93 पैकी 45…
नांदेड, बातमी24:- नांदेड जिल्ह्यामध्ये मागील दोन दिवसापासून अतिवृष्टीमुळे पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झालेले आहे. अशा…
नांदेड,बातमी24 : नांदेड जिल्ह्यामध्ये गेल्या २४ तासांमध्ये पावसाने जोर धरला असून अजूनही पाऊस सुरू आहे.…