नांदेड

कोरोनाच्या रुग्ण संख्येत घट; चौविस तासात 2 जणांचा मृत्यू

नांदेड, बातमी24ः मागच्या चौविस तासांमध्ये कोरोनाच्या दोन रुग्णांचा मृत्यू झाला तर नव्याने 114 कोरोना पॉझिटीव्ह आले आहेत. बर्‍याच दिवसानंतर कोरोनाच्या रुग्णांची संख्या घटल्याचे बघायला मिळाले.

शनिवार दि.8 ऑगस्ट रोजी 456 नमूने तपासण्यात आले. यात 293 जणांचा अहवाल निगेटीव्ह तर 114 जणांचा अहवाल कोरोना पॉझिटीव्ह आला आहे.आरटी-पीसीआर चाचणीत 92 तर अंटीजन किटव्दारे करण्यात आलेल्या अहवालात 22 जणांचा समावेश आहे. जिल्ह्यातील कोरोनोच्या रुग्णांची संख्या 3 हजार 156 इतकी झाली आहे. तसेच शनिवारी 92 जणांची कोरोनामधून सुटका झाली. आतापर्यंत 1 हजार 415 जण कोरोनाच्या संसर्गातून बरे झाले आहेत.

कालच्या तारखेत सिडको भागातील 72 वर्षीय महिलेचा तसेच अर्धाप्ाुर तालुक्यातील कासारखेडा येथील 72 वर्षीय पुरुषाचा विष्णुपुरी येथील शासकीय रुग्णालयात मृत्यू झाला. 116 जणांनी कोरोनाच्या संसर्गामुळे जीव सोडल्याची नोंद आहे. आजघडिला 1 हजार 608 जणांवर उपचा सुरु असले, तरी यातील 85 जणांची प्रकृती गंभीर असल्याचे प्रशासनाच्या वतीने कळविण्यात आले आहे.
——-
तालुकानिहाय रुग्ण संख्या
नांदेड मनपा क्षेत्र-28, अर्धापुर-2, बिलोली-1, भोकर-4, कंधार-1, नायगाव-1,लोहा-1, हिंगोली-1, यवतमाळ-1, नांदेड ग्रामीण-2, देगलूर-14, हदगाव-8, किनवट-1, मुखेड-22, उमरी-1, परभणी-3, लातूर-1 असे 92 हे आरटी-पीसीआर चाचणीत कोरोनो पॉझिटीव्ह आले.
——–
अंटीजन चाचणीचा अहवाल
नांदेड मनपा क्षेत्र-2, अर्धापुर-4, बिलोली-3, धर्माबाद-1, देगलूर-3, किनवट-2, नायगाव-4, माहूर-3 असे 22 जणांचा समावेश आहे.

जयपाल वाघमारे - संपादक

Recent Posts

सनदी अधिकारी वर्षा ठाकूर-घुगे यांना मराठवाडा भूषण पुरस्कार जाहीर

नांदेड,बातमी24:-मराठवाडा समनव्य समिती पुणे,याच्या वतीने दिला जाणारा या वर्षीचा मराठवाडा भूषण पुरस्कार सनदी अधिकारी तथा…

5 days ago

सीईओ करणवाल यांच्या पुढाकाराने शिक्षकांच्या रिक्त पदांचा प्रश्न निकाली;गुणवत्तेची चिंता मिटणार

नांदेड,बातमी 24:-मागील अनेक वर्षांपासून किनवट व माहुर या दोन तालुक्यातील पेसा क्षेत्रातील रिक्त पदांचा अनुशेष…

2 weeks ago

जिल्हयात अतिवृष्टीमुळे २ लाख हेक्टरपेक्षा अधिक क्षेत्र बाधित;९३ पैकी ४५ मंडळात अतिवृष्टी

नांदेड,बातमी24 : गेल्या 48 तासांपासून नांदेड जिल्ह्यावर आभाळ कोसळले असून रविवारी जिल्ह्याच्या 93 पैकी 45…

3 weeks ago

शेतकऱ्यांनी पीक नुकसानीची तक्रार 72 तासांच्या आत करावी:- जिल्हाधिकारी राऊत

नांदेड, बातमी24:- नांदेड जिल्ह्यामध्ये मागील दोन दिवसापासून अतिवृष्टीमुळे पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झालेले आहे. अशा…

3 weeks ago

नांदेड जिल्ह्यामध्ये अतिवृष्टी; नागरिकांना सतर्कतेचे जिल्हाधिकाऱ्यांचे आवाहन

नांदेड,बातमी24 : नांदेड जिल्ह्यामध्ये गेल्या २४ तासांमध्ये पावसाने जोर धरला असून अजूनही पाऊस सुरू आहे.…

3 weeks ago

नांदेड जिल्ह्याचे खासदार वसंतराव चव्हाण यांचे निधन

नांदेड,बातमी24:-नांदेड जिल्ह्याचे नवनिर्वाचित खासदार वसंतराव चव्हाण यांचे निधन झाले, ही वार्ता दि.26 सोमवारी सकाळी धडकली.त्याच्यावर…

4 weeks ago