नांदेड,बातमी24ः कोरोनाचा वाढता संसर्ग रोखण्यसाठी अंटीजेन टेस्ट किटद्वारे व्यापक प्रमाणात कोरोनाची चाचणी अभियान राबविले जात आहे. नगरसेवक प्रशांत तिडके यांनी प्रभाग क्रमांक 9 मधील पाच भागात अंटीजन टेस्ट किटद्वारे तपासणी अभियान राबविले. या अभियानाला चांगला प्रतिसाद मिळाला.
कोरोनाच्या टाळेबंदीच्या काळात नगरसेवक प्रशांत तिकडे यांनी प्रभागातील गोरगरिब जनतेची भूक भागविण्याचा प्रयत्न केला. घरपोच राशन व जेवनाचे सोय करून दिली होती. आता कोरोनाचा संसर्ग प्रभागात होऊ नये, यासाठी ते परिश्रम घेत आहेत. यासाठी कोरोना टेस्टिंग शिबिर राबविण्यात पुढाकार घेत आहेत.जिल्हाधिकारी डॉ.विपीन इटनकर, महापालिका आयुक्त डॉ. सुनील लहाने यांच्या सहकार्याने प्रभाग क्रमांक 9 मधील पाच भागात बुधवार दि. 5 ऑगस्ट रोजी हे अभियान राबविण्यात आले.
कोरोनाला घाबरू नये – नगरसेवक तिडके
नागरिकांनी कोरोनाची लक्षणे दिसल्यास तत्काळ रुग्णालयात दाखल व्हावे, जेणेकरुन मृत्यूचे प्रमाण रोखता येईल. नागरिकांनी कोरोनाला घाबरू नये, काळजी घ्यावी आणि तपासणीसाठी पुढे यावे, असे आवाहन प्रशांत तिडके यांनी केले.
नांदेड,बातमी24:-लोकसभा निवडणुकीत दलित-मुस्लिम मतांवर विजयी साकारणाऱ्या काँग्रेसने यावेळी तिकीट विक्रीचे दुकान चालविले असून अनेक ठिकाणी…
नांदेड,बातमी24:-मराठवाडा समनव्य समिती पुणे,याच्या वतीने दिला जाणारा या वर्षीचा मराठवाडा भूषण पुरस्कार सनदी अधिकारी तथा…
नांदेड,बातमी 24:-मागील अनेक वर्षांपासून किनवट व माहुर या दोन तालुक्यातील पेसा क्षेत्रातील रिक्त पदांचा अनुशेष…
नांदेड,बातमी24 : गेल्या 48 तासांपासून नांदेड जिल्ह्यावर आभाळ कोसळले असून रविवारी जिल्ह्याच्या 93 पैकी 45…
नांदेड, बातमी24:- नांदेड जिल्ह्यामध्ये मागील दोन दिवसापासून अतिवृष्टीमुळे पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झालेले आहे. अशा…
नांदेड,बातमी24 : नांदेड जिल्ह्यामध्ये गेल्या २४ तासांमध्ये पावसाने जोर धरला असून अजूनही पाऊस सुरू आहे.…