नांदेड, बातमी24ः सिंधी समाजाचे इष्टदेव वरूण देवता श्री भगवान झुलेलाल यांचे चालियो साहेब हा सण नुकतीच संपन्न झाला याचा लियो साहेब मध्ये हे चाळीस दिवसाचा कळक उपवास असतो. यानिमित्त सप्तरंग सेवाभावी संस्था नांदेड व विश्व सिंधी सेवा संगम महाराष्ट्र ब्रांच यांनी मिळून ऑनलाइन सिंधी भजन स्पर्धा आयोजित केली होती. या राष्ट्रीय सिंधी भजन स्पर्धेमध्ये हे विविध प्रांतातील सिंधी समाज बांधवांनी सहभाग नोंदविला होता, अशी माहिती आयोजक डॉ. भरत जेठवाणी यांनी दिली.
यामध्ये सिंधी भाषेमध्ये भजन गाऊन आपला व्हिडीओ ऑनलाइन पाठवायचा होता. यात तीन गटांमध्ये स्पर्धा आयोजित करण्यात आली होती. लहान गट, युवा गट व मोठा गट या उत्कृष्ट अश्या प्रतिसादामध्ये 50 लोकांनी नोंदणी करून आपले व्हिडिओ ऑनलाईन पाठवून अगदी वयाच्या सात वर्षाच्या मुली पासून तर 75 वर्षाच्या वृद्धांपर्यंत या स्पर्धेमध्ये सहभाग नोंदवला होता. नुकतीच या स्पर्धेचे निकाल जाहीर करण्यात आले. त्यामध्ये हे लहान गटामध्ये विवेक तलरेजा इंदौर प्रथम तर द्वितीय आधी पुर गुजरात मधील कोमल मंगभवानी यांनी पारितोषिक पटकावलं. युवा गटांमध्ये यूपी खलीलाबाद मधील शिवांगी खत्री प्रथम, भुसावल महाराष्ट्र येथील रुपेश वटवाणी द्वितीय, सुरत गुजरात मधील नक्षीता दासानी तृतीय. वृद्ध गटामध्ये सुरत येथील जितेंद्र दासाणि प्रथम, इंदौर येथील चांदनी तालरेजा द्वितीय तर गुजरात आदीपूर येथील शांता भवनानी तृतीय.
सर्व विजेत्यांना ऑनलाइन प्रशस्तीपत्र देऊन गौरवण्यात आलं. आपली मातृभाषा जपली पाहिजे व सिंधी संस्कृती हे इतिहास जमा होऊ नये या हेतूने ही स्पर्धा आयोजित करण्यात आली असे मत आयोजक डॉ. भरत जेठवानी यांनी मांडले. सर्व विजेत्यांचे सहसंयोजक विश्व सिंधी सेवा संगम चे संस्थापक अध्यक्ष गोपाल सजनानी व आंतरराष्ट्रीय अध्यक्ष डॉ. राजू मनवानी यांनी अभिनंदन केले
नांदेड,बातमी24:-लोकसभा निवडणुकीत दलित-मुस्लिम मतांवर विजयी साकारणाऱ्या काँग्रेसने यावेळी तिकीट विक्रीचे दुकान चालविले असून अनेक ठिकाणी…
नांदेड,बातमी24:-मराठवाडा समनव्य समिती पुणे,याच्या वतीने दिला जाणारा या वर्षीचा मराठवाडा भूषण पुरस्कार सनदी अधिकारी तथा…
नांदेड,बातमी 24:-मागील अनेक वर्षांपासून किनवट व माहुर या दोन तालुक्यातील पेसा क्षेत्रातील रिक्त पदांचा अनुशेष…
नांदेड,बातमी24 : गेल्या 48 तासांपासून नांदेड जिल्ह्यावर आभाळ कोसळले असून रविवारी जिल्ह्याच्या 93 पैकी 45…
नांदेड, बातमी24:- नांदेड जिल्ह्यामध्ये मागील दोन दिवसापासून अतिवृष्टीमुळे पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झालेले आहे. अशा…
नांदेड,बातमी24 : नांदेड जिल्ह्यामध्ये गेल्या २४ तासांमध्ये पावसाने जोर धरला असून अजूनही पाऊस सुरू आहे.…