नांदेड

माळेगाव यात्रेसाठी निर्बंध कायम;मूलभूत सुविधा दिल्या जाणार;आपत्तीचा विचार करता अध्यक्ष अंबुलगेकर यांची समंजस भूमिका

नांदेड, बातमी24:- पुढील महिण्यात होऊ घातलेल्या श्री क्षेत्र माळेगाव यात्रेबाबत जिल्हा परिषदेचे लोकप्रतिनिधी यात्रा भरावी,यासाठी आग्रही असलेली तरी, प्रशासनासमोर कोरोनाच्या नव्या विषाणूचे संकट आ वासून बसले आहे. या सगळ्या संकटाचा विचार करता जिल्हा परिषद अध्यक्ष मंगाराणी अंबुलगेकर यांनी समंजसपणाची भूमिका घेत कोरोना आपत्ती बाबत असलेले सर्व निर्बंधाचे पालन करून पाणी व विजेची सुविधा दिली जाईल,त्याचसोबत देवस्वारी व मानकरी यांचा सन्मान-सत्कार होणार असल्याचे सौ.अंबुलगेकर यांनी सांगितले.

जिल्हा परिषद स्थायी समिती बैठक बुधवारी दुपारी त्यांच्या निजीकक्षात झाली. यावेळी जिल्हा परिषद सदस्य प्रवीण पाटील चिखलीकर यांनी माळेगाव यात्रा भरविण्यासंदर्भात सर्वसाधारण सभेतील चर्चेची आठवण करून दिली. यावर काही पदाधिकारी यांनी चिखलीकर यांच्या सुरात सूर मिसळण्याचा प्रयत्न केला. यावरून वातावरण गरम झाले होते.मात्र कोरोनाच्या संभाव्य धोका तसेच जनावरांना झालेली लागण पाहता, यात्रा भरविणे संकट ओढाऊन घेण्यासारखे होईल,अशी भूमिका प्रशासनाने घेतली,ही भूमिका एका बाजूने रास्त असून तसे अहवाल पशु व आरोग्य विभागाने दिले असल्याचे मंगाराणी अंबुलगेकर यांनी कळविले.

या उपर तरी प्रवीण पाटील चिखलीकर हे आग्रही असल्याचे दिसून आले. जिल्हाधिकारी डॉ.विपीन इटनकर यांनी जे आदेश दिले,यात काही सुधारणा किंवा बदल होतील का याबाबत समिती सर्व सदस्य पदाधिकारी असे शिष्टमंडळ जिल्हाधिकारी डॉ.इटनकर यांच्या भेटीस गेले. या निरबंधात कुठलाही बद्दल होणार नसून भाविक दर्शनासाठी येऊ शकतील,मात्र कोरोनाच्या सर्व नियमांचे पालन करावे लागेल, पारंपरिक देवस्वारी होईल,परंतु सांस्कृतिक असे कोणतेही काहीही कार्यक्रम घेता येणार नसल्याची बाब त्यांनी निदर्शनास आणून दिली.

ही बाब पदाधिकारी यांना ही अमान्य नव्हती.त्यामुळे पदाधिकारी,त्यातली त्यात जिल्हा परिषद अध्यक्ष मंगाराणी अंबुलगेकर यांनी सगळ्या संकटाबाबत समिती सदस्य यांना अवगत करून दिले.त्यामुळे यात्रा ठिकाणी मूलभूत सुविधा देऊ, लसीकरण कॅम्प आयोजित केले जातील,पण कुठेली इतर कार्यक्रम होणार नसल्याचे सांगत यात्रेबाबत चर्चेला पूर्णविराम दिला.

जयपाल वाघमारे - संपादक

Recent Posts

आंबेडकरी चळवळीच लोक नेतृत्व असलेल्या सुरेश गायकवाड यांना काँग्रेसने डावलेले;वाळूमाफियाला उमेदवारी

नांदेड,बातमी24:-लोकसभा निवडणुकीत दलित-मुस्लिम मतांवर विजयी साकारणाऱ्या काँग्रेसने यावेळी तिकीट विक्रीचे दुकान चालविले असून अनेक ठिकाणी…

4 weeks ago

सनदी अधिकारी वर्षा ठाकूर-घुगे यांना मराठवाडा भूषण पुरस्कार जाहीर

नांदेड,बातमी24:-मराठवाडा समनव्य समिती पुणे,याच्या वतीने दिला जाणारा या वर्षीचा मराठवाडा भूषण पुरस्कार सनदी अधिकारी तथा…

2 months ago

सीईओ करणवाल यांच्या पुढाकाराने शिक्षकांच्या रिक्त पदांचा प्रश्न निकाली;गुणवत्तेची चिंता मिटणार

नांदेड,बातमी 24:-मागील अनेक वर्षांपासून किनवट व माहुर या दोन तालुक्यातील पेसा क्षेत्रातील रिक्त पदांचा अनुशेष…

3 months ago

जिल्हयात अतिवृष्टीमुळे २ लाख हेक्टरपेक्षा अधिक क्षेत्र बाधित;९३ पैकी ४५ मंडळात अतिवृष्टी

नांदेड,बातमी24 : गेल्या 48 तासांपासून नांदेड जिल्ह्यावर आभाळ कोसळले असून रविवारी जिल्ह्याच्या 93 पैकी 45…

3 months ago

शेतकऱ्यांनी पीक नुकसानीची तक्रार 72 तासांच्या आत करावी:- जिल्हाधिकारी राऊत

नांदेड, बातमी24:- नांदेड जिल्ह्यामध्ये मागील दोन दिवसापासून अतिवृष्टीमुळे पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झालेले आहे. अशा…

3 months ago

नांदेड जिल्ह्यामध्ये अतिवृष्टी; नागरिकांना सतर्कतेचे जिल्हाधिकाऱ्यांचे आवाहन

नांदेड,बातमी24 : नांदेड जिल्ह्यामध्ये गेल्या २४ तासांमध्ये पावसाने जोर धरला असून अजूनही पाऊस सुरू आहे.…

3 months ago