नांदेड

गुटखा माफियांचा कर्दनकाळ ठरणारा अधिकारी सेवानिवृत्त;नांदेड पुन्हा हब ठरणार!

नांदेड, बातमी24:- नांदेडमधील गुटखा माफियांना पोलिसांची कम आणि अत्यंत पारदर्शक सेवा बनवणाऱ्या एका अधिकाऱ्याची धास्ती वाटत असे, ते अधिकारीसेवानिवृत्ती झाल्याने गुटखा माफियांमधून आनंदीआनंद गडे जिकडे तुकडे आपलेच राज्य असू भासू लागले आहे. त्यामुळे गुटखा माफियांना अंकुश लावण्याचे पुढील काळात पोलीस व अन्न व औषधी कार्यालयाच्या अधिकाऱ्यांसमोर मोठे आव्हान असणार आहे.

नांदेड येथील अन्न व औषध प्रशासन कार्यालयाचे प्रभारी सहायय आयुक्त पदावरून प्रवीण काळे हे 31 जुलै रोजी नियत वयोमनांनुसार सेवानिवृत्त झाले.

धडाकेबाज अधिकारी अशी प्रवीण काळे यांची ओळख राहिली आहे. मतांबर गुटखा माफियांना त्यांनी सळो की पळो करत जेलची हवा दाखविली आहे. करोडो रुपयांचा अवैध गुटखा त्यांच्या काळात ताब्यात घेऊन माफियांवर पोलीस गुन्हे नोंद झाले.या दरम्यानच्या काळात प्रवीण काळे कुणालाही सोडत नसल्याचे पाहून बऱ्याच माफियांनी हा धंदा सोडून इतर व्यवसाय धरले होते.

महाराष्ट्रमध्ये गुटखा बंदी असल्याने नांदेड जिल्ह्याच्या सीमेवर असलेल्या तेलंगणा व कर्नाटक या दोन्ही जिल्ह्यातून राज्यभरात नांदेड मार्गे गुटखा पोहचत असतो.नांदेडमध्ये येणाऱ्या गुटखा ट्रकवर पाळत ठेवून प्रवीण काळे यांनी कारवाई बडगा उगारला तसेच साठा करून ठेवलेला गुटखा गोदाम छापे मारून प्रवीण काळे यांनी ताब्यात घेऊन त्याची विल्हेवाट लावली.

प्रवीण काळे यांनी अशा कारवाया सातत्याने चालू ठेवल्यामुले ते बऱ्याच वेळा गुटखा माफियांच्या निशाण्यावर आले.मात्र त्यांनी जीवाची पर्वा न करता, अशा माफियांच्या धमक्यांना कधीही भीक न घालता कारवायांचा धडाका चालूच ठेवला.त्यामुळे नांदेडमधील गुटखा माफियांच वखार आणि साम्राज्य उध्वस्त होऊ शकले ते झाले सुद्धा होय.

प्रवीण काळे यांची सेवानिवृत्ती झाल्याने या माफियांकडून पुन्हा सक्रिय होण्याचे संकेत मिळत आहेत. मागच्या काही वर्षांत कारवाईच्या भीतीमुळे या धंदापासून दुरावलेले माफिया राज  पुन्हा धंदा सुरू करण्याच्या तयारीत लागले आहेत. ही माफियांमंडळी प्रवीण काळे यांच्या सेवनिवृत्तीची जणू प्रतीक्षा करत होते,असे दिसत आहे.त्यामुळे पुढील काळात अवैध गुटखा केंद्र नांदेड होऊ द्यायचे नसेल तर अन्न व औषध प्रशासन अधिकाऱ्यांना मनगटात बळ आणून काम करावे लागेल, या माफियाकडून खिसे गरम करत राहिले तर माफियांच्या ताटाखालचे मांजर बनून हुजरेगिरी करावी लागू शकते, तसेच पोलिसांना ही साथ द्यावी लागेल अन्यथा नांदेडमधील माफिया मंडळी अवैध गुटखा विक्री व पुरवठा करणारे राज्याचे केंद्र ठरल्याशिवाय राहणार नाही.

जयपाल वाघमारे - संपादक

Recent Posts

सनदी अधिकारी वर्षा ठाकूर-घुगे यांना मराठवाडा भूषण पुरस्कार जाहीर

नांदेड,बातमी24:-मराठवाडा समनव्य समिती पुणे,याच्या वतीने दिला जाणारा या वर्षीचा मराठवाडा भूषण पुरस्कार सनदी अधिकारी तथा…

4 days ago

सीईओ करणवाल यांच्या पुढाकाराने शिक्षकांच्या रिक्त पदांचा प्रश्न निकाली;गुणवत्तेची चिंता मिटणार

नांदेड,बातमी 24:-मागील अनेक वर्षांपासून किनवट व माहुर या दोन तालुक्यातील पेसा क्षेत्रातील रिक्त पदांचा अनुशेष…

2 weeks ago

जिल्हयात अतिवृष्टीमुळे २ लाख हेक्टरपेक्षा अधिक क्षेत्र बाधित;९३ पैकी ४५ मंडळात अतिवृष्टी

नांदेड,बातमी24 : गेल्या 48 तासांपासून नांदेड जिल्ह्यावर आभाळ कोसळले असून रविवारी जिल्ह्याच्या 93 पैकी 45…

2 weeks ago

शेतकऱ्यांनी पीक नुकसानीची तक्रार 72 तासांच्या आत करावी:- जिल्हाधिकारी राऊत

नांदेड, बातमी24:- नांदेड जिल्ह्यामध्ये मागील दोन दिवसापासून अतिवृष्टीमुळे पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झालेले आहे. अशा…

2 weeks ago

नांदेड जिल्ह्यामध्ये अतिवृष्टी; नागरिकांना सतर्कतेचे जिल्हाधिकाऱ्यांचे आवाहन

नांदेड,बातमी24 : नांदेड जिल्ह्यामध्ये गेल्या २४ तासांमध्ये पावसाने जोर धरला असून अजूनही पाऊस सुरू आहे.…

3 weeks ago

नांदेड जिल्ह्याचे खासदार वसंतराव चव्हाण यांचे निधन

नांदेड,बातमी24:-नांदेड जिल्ह्याचे नवनिर्वाचित खासदार वसंतराव चव्हाण यांचे निधन झाले, ही वार्ता दि.26 सोमवारी सकाळी धडकली.त्याच्यावर…

4 weeks ago