रुग्ण संख्येचा पुन्हा उचांक;26 जणांनी सोडले प्राण
नांदेड, बातमी24ः नांदेड जिल्ह्यात कोरोनाच्या रुग्णांची संख्या कमी होण्याऐवजी वाढतच चालली, असून गुरुवार दि. 8 रोजी 1 हजार 450 नवे कोरोना बाधित रुग्ण सापडले आहेत. यात एकटया मनपा हद्दीमधील 612 जणांचा समावेश आहे. तर 26 जणांचा कोरोनाच्या संसर्गाने मृत्यू झाला आहे.
गुरुवार दि. 8 रोजी आलेल्या अहवालानुसार 5 हजार 263 जणांची चाचणी करण्यात आली. यामध्ये 1 हजार 450 जणांचे अहवाल कोरोना बाधित आले. आरटीपीसीआर चाचणीत 686 तसेच अंटीजनमध्ये 764 जणांचा समावेश आहे. त्यामुळे जिल्ह्यात आतापर्यंत कोरोना बाधितांची संख्या 52 हजार 342 झाली. आजरोजी 1 हजार 257 जणांना रुग्णालयातून डिस्चार्ज देण्यात आला.त्यामुळे बरे झालेले आतापर्यंत रुग्ण हे 40 हजार 198 एवढे आहेत.
मागच्य चौविस तासांमध्ये 26 जणांचा कोरोनाच्या संसर्गाशी लढताना मृत्यू झाला. यात अकरा महिला 16 पुरुषांचा समावेश आहे. आज मरण पावलेल्यांमध्ये चाळीस वर्षे वयोगटांपेक्षा अधिक वयस्क नागरिकांचा समावेश आहे.जिल्ह्यात मागच्या वर्षेभराच्या काळात 996 जणांच्या मृत्यू नोंद प्रशासनाकडून करण्यात आली आहे. तर आजघडिला 10 हजार 989 रुग्णांवर उपचार सुरु आहेत. यातील अतीगंभीर रुग्णांची संख्या 181 एवढी आहे.
——
केंद्रीय पथकाकडून पाहणी
नांदेड जिल्ह्यात कोरोनाच्या वाढती रुग्ण संख्या चिंता दर्शविणारी आहे. नित्याने पंचविसपेक्षा अधिक लोकांचा मृत्यू यात होत आहे. या सगळया पार्श्वभूमिवर केंद्र सरकारचे पथक नांदेड जिल्ह्याच्या दौर्यावर आले होते. या पथकाने शासकीय रुग्णालयांना भेटी देऊन पाहणी केली. या वेळी जिल्हाधिकारी डॉ. विपीन इटनकर, जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. निळकंट भोसीकर यांच्यासह वैद्यकीय अधिकार्यांची उपस्थिती होती.
नांदेड,बातमी24:-लोकसभा निवडणुकीत दलित-मुस्लिम मतांवर विजयी साकारणाऱ्या काँग्रेसने यावेळी तिकीट विक्रीचे दुकान चालविले असून अनेक ठिकाणी…
नांदेड,बातमी24:-मराठवाडा समनव्य समिती पुणे,याच्या वतीने दिला जाणारा या वर्षीचा मराठवाडा भूषण पुरस्कार सनदी अधिकारी तथा…
नांदेड,बातमी 24:-मागील अनेक वर्षांपासून किनवट व माहुर या दोन तालुक्यातील पेसा क्षेत्रातील रिक्त पदांचा अनुशेष…
नांदेड,बातमी24 : गेल्या 48 तासांपासून नांदेड जिल्ह्यावर आभाळ कोसळले असून रविवारी जिल्ह्याच्या 93 पैकी 45…
नांदेड, बातमी24:- नांदेड जिल्ह्यामध्ये मागील दोन दिवसापासून अतिवृष्टीमुळे पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झालेले आहे. अशा…
नांदेड,बातमी24 : नांदेड जिल्ह्यामध्ये गेल्या २४ तासांमध्ये पावसाने जोर धरला असून अजूनही पाऊस सुरू आहे.…