नांदेड, बातमी24ः भाजपचे जिल्हाध्यक्ष व्यंकटराव पाटील गोजेगावकर हे कोरोनातून संसर्गमुक्त झाल्यानंतर महानगराध्यक्ष प्रवीण साले पॉझिटीव्ह आले आहेत. माझ्यासह इतर तीन पक्षाचे पदाधिकारी सुद्धा कोरोना पॉझिटीव्ह आले असल्याची माहिती खुद प्रवीण साले यांनी दिली.
काही दिवसांपूर्वी भाजपचे ग्रामीण जिल्हाध्यक्ष तथा जिल्हा परिषद सदस्य व्यंकटराव पाटील गोजेगावकर हे कोरोना पॉझिटीव्ह आले होते. त्याच्यांसह त्यांच्या कुटुंंबातील अन्य काही सदस्य सुद्धा कोरोना पॉझिटीव्ह आले होते. तीन दिवसांपूर्वी त्यांनी कोरोनावर मात केल्यानंतर भाजप महानगराध्यक्ष प्रवीण साले यांचा कोरोना रिपोर्ट पॉझिटीव्ह आला आहे.
भाजप महानगराध्यक्ष उभयनलाल यादव हे सुरुवातीला कोरोना पॉझिटीव्ह आले. यादव यांच्या संपर्कात भाजप महानगराध्यक्ष प्रवीण साले. भाजप महानगर सरचिटणीस विजय गंभीरे व भाजप तरोडा मंडळाध्यक्ष सुर्यकांत कदम हे आले होते. या तिघांनी चाचणी करून घेतली. यात साले. गंभीरे व कदम यांचा अहवाल पॉझिटीव्ह आला आहे. हे तिघे कोविड केअर सेेटर पंजाब भवन येथे उपचार घेत आहेत.
____
दोन्ही महानगराध्यक्ष कोरोना पॉझिटीव्ह
काँग्रेसचे आमदार तथा महानगराध्यक्ष अमरनाथ राजूरकर यांचा अहवाल चार दिवसांपूर्वी कोरोना पॉझिटीव्ह आला.त्यानंतर शुक्रवारी भाजपच्या महानगरध्यक्ष प्रवीण साले यांचा अहवाल सुद्धा कोरोना पॉझिटीव्ह आला आहे.
नांदेड,बातमी24:-लोकसभा निवडणुकीत दलित-मुस्लिम मतांवर विजयी साकारणाऱ्या काँग्रेसने यावेळी तिकीट विक्रीचे दुकान चालविले असून अनेक ठिकाणी…
नांदेड,बातमी24:-मराठवाडा समनव्य समिती पुणे,याच्या वतीने दिला जाणारा या वर्षीचा मराठवाडा भूषण पुरस्कार सनदी अधिकारी तथा…
नांदेड,बातमी 24:-मागील अनेक वर्षांपासून किनवट व माहुर या दोन तालुक्यातील पेसा क्षेत्रातील रिक्त पदांचा अनुशेष…
नांदेड,बातमी24 : गेल्या 48 तासांपासून नांदेड जिल्ह्यावर आभाळ कोसळले असून रविवारी जिल्ह्याच्या 93 पैकी 45…
नांदेड, बातमी24:- नांदेड जिल्ह्यामध्ये मागील दोन दिवसापासून अतिवृष्टीमुळे पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झालेले आहे. अशा…
नांदेड,बातमी24 : नांदेड जिल्ह्यामध्ये गेल्या २४ तासांमध्ये पावसाने जोर धरला असून अजूनही पाऊस सुरू आहे.…