नांदेड

पंचायत ‘राज’चा ग्रामीण दौरा जिल्हा परिषदेसाठी समाधानकारक; कुठे कौतुक तर सक्त ताकीद

नांदेड, बातमी24:-नांदेड जिल्ह्याच्या दौऱ्यावर आलेल्या पंचायत राज समितीने पहिल्यादिवशी अधिकाऱ्यांची खरडपट्टी काढल्यानंतर आज विविध तालुक्याच्या दौरा केला. यावेळी समिती सदस्यांना ग्रामीण भागात ठोस कारवाई करण्यासारखे फारस काही हाती लागले नाही.काही ठिकाणी चौकशी करण्याची सूचना दिली,तर काही भागातील कामे बघून समितीने समाधान ही व्यक्त केले.त्यामुळे आजचा दिवस जिल्हा परिषद अधिकारी,गट विकास अधिकारी या सर्वांसाठी दिलासदायी असाच म्हणावा लागेल.

पंचायत राज समितीचा आजचा दौऱ्याचा दुसरा दिवस होता. पाच टीम करून समिती सदस्य हे किनवट व माहूर वगळता सर्व तालुक्यात गेले होते. यावेळी समिती सदस्यांनी जिल्हा परिषद अंतर्गत विविध संस्थांची पाहणी केली.

जिल्हा परिषद सीईओ वर्षा ठाकूर व समिती अध्यक्ष डॉ.संजयकुमार रायमूलकवार यांनी मुगट, धर्माबाद,मुदखेड व उमरी तालुक्याची पाहणी केली. ठिकठिकाणी जिल्हा परिषद कर्मचाऱ्यांनी समिती सदस्यांचे केलेले स्वागत पाहून भारावून गेले.

काही भागात समिती सदस्यांनी आरोग्य केंद्र,पाणी पुरवठा योजना कामे पाहणी केली.काहींनी शाळा भेटी दिल्या.रस्ते कामाचा दर्जा बघितला. बऱ्याच पंचायत समितीचला भेटी देऊन आमदार मंडळींनी विविध योजनांचा आढावा घेतला. यावेळी तक्रारीबाबत निपटारा करण्याचे आदेश ही आमदार मंडळींनी गट विकास अधिकाऱ्यांना दिल्या.काही तालुक्याच्या ठिकाणी समिती आमदारांना जायला उशीर झाला.त्यामुळे आढावा ही रात्री साडे आठ वाजेपर्यंत चालल्याचे सांगण्यात आले.
——
सीईओ ठाकूर यांच्या उत्कृष्ट नियोजनाची समितीवर छाप

जिल्हा परिषदेच्या दौऱ्यावर समिती येणार असल्याने मागील काही दिवसांपासून जिल्हा परिषद कडून सूक्ष्म नियोजन केले गेले. समिती दौऱ्यात कुठेही कुठल्याही प्रकारचा कसूर ठेवला गेला नाही. हे समितीला ग्रामीण भागात दौरे करताना दिसून आले.याबाबत समिती सदस्यांनी समाधान व्यक्त केल्याच समजत.

जयपाल वाघमारे - संपादक

Recent Posts

सनदी अधिकारी वर्षा ठाकूर-घुगे यांना मराठवाडा भूषण पुरस्कार जाहीर

नांदेड,बातमी24:-मराठवाडा समनव्य समिती पुणे,याच्या वतीने दिला जाणारा या वर्षीचा मराठवाडा भूषण पुरस्कार सनदी अधिकारी तथा…

5 days ago

सीईओ करणवाल यांच्या पुढाकाराने शिक्षकांच्या रिक्त पदांचा प्रश्न निकाली;गुणवत्तेची चिंता मिटणार

नांदेड,बातमी 24:-मागील अनेक वर्षांपासून किनवट व माहुर या दोन तालुक्यातील पेसा क्षेत्रातील रिक्त पदांचा अनुशेष…

2 weeks ago

जिल्हयात अतिवृष्टीमुळे २ लाख हेक्टरपेक्षा अधिक क्षेत्र बाधित;९३ पैकी ४५ मंडळात अतिवृष्टी

नांदेड,बातमी24 : गेल्या 48 तासांपासून नांदेड जिल्ह्यावर आभाळ कोसळले असून रविवारी जिल्ह्याच्या 93 पैकी 45…

3 weeks ago

शेतकऱ्यांनी पीक नुकसानीची तक्रार 72 तासांच्या आत करावी:- जिल्हाधिकारी राऊत

नांदेड, बातमी24:- नांदेड जिल्ह्यामध्ये मागील दोन दिवसापासून अतिवृष्टीमुळे पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झालेले आहे. अशा…

3 weeks ago

नांदेड जिल्ह्यामध्ये अतिवृष्टी; नागरिकांना सतर्कतेचे जिल्हाधिकाऱ्यांचे आवाहन

नांदेड,बातमी24 : नांदेड जिल्ह्यामध्ये गेल्या २४ तासांमध्ये पावसाने जोर धरला असून अजूनही पाऊस सुरू आहे.…

3 weeks ago

नांदेड जिल्ह्याचे खासदार वसंतराव चव्हाण यांचे निधन

नांदेड,बातमी24:-नांदेड जिल्ह्याचे नवनिर्वाचित खासदार वसंतराव चव्हाण यांचे निधन झाले, ही वार्ता दि.26 सोमवारी सकाळी धडकली.त्याच्यावर…

4 weeks ago