नांदेड,बातमी24:-नांदेड वाघाळा शहर महानगरपालिकेचे आयुक्त म्हणून पदभार स्वीकारल्यानंतर डॉ.महेशकुमार डोईफोडे यांनी शहरात विनापरवानगी बॅनर अनधिकृत नळाबाबत नवीन मोहीम हाती घेतली आणि यशस्वी करून दाखवली नवनवीन संकल्पनेतून शहरवासीयांना देण्यात येणाऱ्या सोयी सुविधांमध्ये गुणात्मक वाढ करण्याचा त्यांचा नेहमीच प्रयत्न राहिलेला आहे. त्याचाच परिपाक म्हणून महापालिकेमध्ये आयुक्तांनी कर्मचाऱ्यांकरिता *”Employee Of The Month”* आणि अधिकारी यांचे मधून *”Officer Of The Month”* प्रत्येक महिन्याला निवडून सन्मानित करण्याचे ठरविले आहे. याकरिता आयुक्त यांचे अध्यक्षतेखाली अतिरिक्त आयुक्त यांचेसमवेत इतर अधिकारी यांची समिती सुद्धा गठित करण्यात आलेली आहे.
सर्व अधिकाऱ्यांच्या कामकाजाचा आढावा घेऊन समितीने महापालिकेची विधी अधिकारी तथा नगरसचिव श्री.अजितपालसिंग संधू यांची *”Officer Of The Month”* या पुरस्काराचे पहिले मानकरी म्हणून निवड केलेली आहे.तसेच उद्दिष्टापेक्षा जास्त मालमत्ता कर वसुलीसाठी, वसुलि लिपिक श्री.परमेश्वर रोडेवार यांची सर्व कर्मचाऱ्यांमधुन *”Employee Of The Month”* म्हणुन निवड करण्यात आली आहे.
वरिष्ठांच्या मार्गदर्शनाखाली संधू यांनी मालमत्ता विभागाच्या माध्यमातून शहरांमध्ये तात्पुरते बॅनर धोरण आखण्यापासून ते अंमलबजावणी पर्यंत तसेच खाजगी बॅनर चे शुल्क वसुलीबाबत कठोर परिश्रम घेतले. त्याचाच परिणाम नजीकच्या काळात दिसून आला नांदेड महानगरपालिका हद्दीत विनापरवानगी एकही बॅनर दिसून येत नाही यात त्यांना महापालिकेच्या सर्व क्षेत्रीय अधिकारी यांचे सुद्धा मोलाचे सहकार्य लाभले. पुरस्कार मिळाल्याबद्दल श्री संधू यांचे आयुक्त श्री.महेशकुमार डोईफोडे अतिरिक्त आयुक्त श्री.गिरिष कदम, मुख्य लेखा परिक्षक श्री.भिसे, मुख्य लेखा अधिकारी श्री.जनार्दन पखवाने,उपायुक्त श्री. दिवेकर, श्री.सुंकेवार,श्री.खानसोळे,श्री.सोंडगे,लेखाधिकारी सौ.मुंडे,सहा.आयुक्त श्री.संजय जाधव, श्री.राजेश चव्हाण, डॉ.रईसोद्दीन, मिर्झा बेग,रमेश चौरे,श्री.सोनसळे व इतर सर्व विभागप्रमुख, अधिकारी व कर्मचारी यांनी अभिनंदन केले.
नांदेड,बातमी24:-लोकसभा निवडणुकीत दलित-मुस्लिम मतांवर विजयी साकारणाऱ्या काँग्रेसने यावेळी तिकीट विक्रीचे दुकान चालविले असून अनेक ठिकाणी…
नांदेड,बातमी24:-मराठवाडा समनव्य समिती पुणे,याच्या वतीने दिला जाणारा या वर्षीचा मराठवाडा भूषण पुरस्कार सनदी अधिकारी तथा…
नांदेड,बातमी 24:-मागील अनेक वर्षांपासून किनवट व माहुर या दोन तालुक्यातील पेसा क्षेत्रातील रिक्त पदांचा अनुशेष…
नांदेड,बातमी24 : गेल्या 48 तासांपासून नांदेड जिल्ह्यावर आभाळ कोसळले असून रविवारी जिल्ह्याच्या 93 पैकी 45…
नांदेड, बातमी24:- नांदेड जिल्ह्यामध्ये मागील दोन दिवसापासून अतिवृष्टीमुळे पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झालेले आहे. अशा…
नांदेड,बातमी24 : नांदेड जिल्ह्यामध्ये गेल्या २४ तासांमध्ये पावसाने जोर धरला असून अजूनही पाऊस सुरू आहे.…