Categories: नांदेड

शनिवार ठरणार कोरोनाकाळ; मनपा हद्दीत रुग्णसंख्या वाढली

नांदेड, बातमी24ः-  नांदेड शहरात दोन ठिकाणावरून कोविड-19 च्या कोरोनांचे नमूने तपासले जात आहे. यामध्ये शनिवार दि. 13 जून रोजी महापालिकेच्या हद्दीत कोरोनाच्या रुग्ण वाढण्याचा सिलसिला कायम असून आजरोजी स्वामी रामानंद तीर्थ विद्यापीठाच्या प्रयोग शाळेतील नमूने तपासणीचा अहवालामध्ये नव्या 22 रुग्णांची भर पडल्याचे सुत्रांकडून समजते. तसेच डॉ. शंकरराव चव्हाण शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयात सुरु करण्यात आलेल्या तपासणाचा रिपोर्ट येणे दुपारपर्यंत बाकी होते.

नांदेड जिल्ह्यात शुक्रवारी 10 तर गुरुवारी 22 रुग्ण कोरेाना पॉझिटीव्ह आले होते. कोरोनाच्या रुग्णांची आकडेवारी दुहेरी संख्येत मागच्या दोन दिवसांमध्ये होती. ही आकडेवारी कायम राहिली, असून गुरुवारप्रमाणे शनिवारी सुद्धा रुग्णांची संख्या 22 पेक्षा अधिक असणार आहे. स्वामी रामानंद तीर्थ विद्यापीठाच्या प्रयोग शाळेच्या कोरोना तपासणी अहवालामध्ये 22 रूग्ण हे नांदेड-वाघाळा महानगरपालिकेच्या हद्दीमधील आहेत.ही संख्या 22 आहेे. तर शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाकडील अहवाल काय येतो, याकडे ही लक्ष असणार आहे.

नांदेड जिल्ह्यातील कोरोनाच्या रुग्णांची संख्या कालपर्यंत 234 इतकी होती. यात आजच्या 22 रुग्णांची भर पडल्यास रुग्णसंख्या 256 आणि वैद्यकीय महाविद्यालयातील काही पॉझिटीव्ह आल्यास कोरोनाच्या रुग्णांची संख्या 256 पेक्षा अधिक जाऊ शकते. त्यामुळे कोरोनाचा संसर्ग टाळण्यासाठी सुरक्षित राहणे महत्वाचे ठरणार आहे.

जयपाल वाघमारे - संपादक

Recent Posts

सनदी अधिकारी वर्षा ठाकूर-घुगे यांना मराठवाडा भूषण पुरस्कार जाहीर

नांदेड,बातमी24:-मराठवाडा समनव्य समिती पुणे,याच्या वतीने दिला जाणारा या वर्षीचा मराठवाडा भूषण पुरस्कार सनदी अधिकारी तथा…

6 days ago

सीईओ करणवाल यांच्या पुढाकाराने शिक्षकांच्या रिक्त पदांचा प्रश्न निकाली;गुणवत्तेची चिंता मिटणार

नांदेड,बातमी 24:-मागील अनेक वर्षांपासून किनवट व माहुर या दोन तालुक्यातील पेसा क्षेत्रातील रिक्त पदांचा अनुशेष…

2 weeks ago

जिल्हयात अतिवृष्टीमुळे २ लाख हेक्टरपेक्षा अधिक क्षेत्र बाधित;९३ पैकी ४५ मंडळात अतिवृष्टी

नांदेड,बातमी24 : गेल्या 48 तासांपासून नांदेड जिल्ह्यावर आभाळ कोसळले असून रविवारी जिल्ह्याच्या 93 पैकी 45…

3 weeks ago

शेतकऱ्यांनी पीक नुकसानीची तक्रार 72 तासांच्या आत करावी:- जिल्हाधिकारी राऊत

नांदेड, बातमी24:- नांदेड जिल्ह्यामध्ये मागील दोन दिवसापासून अतिवृष्टीमुळे पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झालेले आहे. अशा…

3 weeks ago

नांदेड जिल्ह्यामध्ये अतिवृष्टी; नागरिकांना सतर्कतेचे जिल्हाधिकाऱ्यांचे आवाहन

नांदेड,बातमी24 : नांदेड जिल्ह्यामध्ये गेल्या २४ तासांमध्ये पावसाने जोर धरला असून अजूनही पाऊस सुरू आहे.…

3 weeks ago

नांदेड जिल्ह्याचे खासदार वसंतराव चव्हाण यांचे निधन

नांदेड,बातमी24:-नांदेड जिल्ह्याचे नवनिर्वाचित खासदार वसंतराव चव्हाण यांचे निधन झाले, ही वार्ता दि.26 सोमवारी सकाळी धडकली.त्याच्यावर…

4 weeks ago