नांदेड,बातमी24:- जिल्ह्यातील नायगाव, अर्धापूर, माहूर या नगरपंचायतीच्या सदस्य पदांच्या सार्वत्रिक निवडणूक- 2021 चा कार्यक्रम राज्य निवडणूक आयोगाने निश्चित केला आहे. याबाबत जिल्हाधिकारी डॉ. विपीन इटनकर यांनी आज पत्रकार परिषद घेऊन माहिती दिली. या निवडणूक प्रक्रियेत अंतिम प्रभागनिहाय मतदार याद्या अधिप्रमाणित करुन प्रसिद्ध करण्याचा दिनांक सोमवार 29 नोव्हेंबर 2021 आहे. जिल्हाधिकारी यांनी निवडणूक कार्यक्रम जारी करण्याची तारीख मंगळवार 30 नोव्हेंबर 2021 आहे.
नामनिर्देशनपत्र राज्य निवडणूक आयोगाने निश्चित केलेल्या वेबसाईटवर भरण्यासाठी उपलब्ध असण्याचा कालावधी हा बुधवार 1 डिसेंबर 2021 रोजी सकाळी 11 ते मंगळवार 7 डिसेंबर 2021 रोजी दुपारी 2 वाजेपर्यंत राहील. नामनिर्देशनपत्रे स्विकारण्याचा कालावधी बुधवार 1 डिसेंबर ते मंगळवार 7 डिसेंबर 2021 रोजी सकाळी 11 ते दुपारी 3 वाजेपर्यंत राहील. शनिवार 4 डिसेंबर व रविवार 5 डिसेंबर 2021 रोजी सुट्टीच्या दिवशी नामनिर्देशपत्र स्विकारण्यात येणार नाहीत.
नामनिर्देशनपत्राची छाननी व वैधरित्या नामनिर्देशित झालेल्या उमेदवारांची यादी प्रसिद्ध करण्याचा दिनांक बुधवार 8 डिसेंबर 2021 रोजी सकाळी 11 वाजल्यापासून राहिल. नामनिर्देशनपत्रे मागे घेण्याचा अंतिम दिनांक अपील नसेल तेथे सोमवार 13 डिसेंबर 2021 रोजी दुपारी 3 वाजेपर्यंत. अपील असल्यास वैधरित्या नामनिर्देशित केलेल्या उमेदवारांची यादी प्रसिद्ध झाल्याच्या तारखेपासून तीन दिवसांच्या आत, जिल्हा न्यायाधीशाकडे अपिल करता येईल. निवडणूक निर्णय अधिकारी हे अपिलाचा निर्णय लवकरात लवकर प्राप्त करुन घेण्यासाठी प्रयत्न करतील. अपिलाचा निर्णय ज्या तारखेस करण्यात येईल त्या तारखेनंतर तिसऱ्या दिवशी किंवा तत्पूर्वी मात्र गुरुवार 16 डिसेंबर 2021 पर्यंत राहिल.
निवडणूक चिन्ह नेमून देण्याचा तसेच अंतिमरित्या निवडणूक लढविणाऱ्या उमेदवारांची यादी प्रसिद्ध करण्याचा दिनांक उमेदवारी मागे घेण्यासाठीच्या शेवटच्या दिवसानंतरच्या लगतच्या दिवशी. आवश्यक असल्यास मतदानाचा दिनांक मंगळवार 21 डिसेंबर 2021 रोजी सकाळी 7.30 पासून ते सायं 5.30 पर्यंत. मतमोजणी व निकाल जाहीर करण्याचा दिनांक बुधवार 22 डिसेंबर 2021 रोजी सकाळी 7.30 पासून ते सायं 5.30 वाजेपर्यंत. मतमोजणी व निकाल जाहीर करण्याचा दिनांक हा बुधवार 22 डिसेंबर 2021 रोजी सकाळी 10 वाजल्यापासून राहिल. महाराष्ट्र शासन राजपत्रात निकाल प्रसिद्ध कलम 19 मधील तरतुदीनुसार करण्यात येणार आहे, असे राज्य निवडणूक आयुक्त कार्यालयाकडून देण्यात आलेली माहिती जिल्हाधिकारी डॉ. विपीन इटनकर यांनी सविस्तर सांगितली.
नांदेड,बातमी24:-लोकसभा निवडणुकीत दलित-मुस्लिम मतांवर विजयी साकारणाऱ्या काँग्रेसने यावेळी तिकीट विक्रीचे दुकान चालविले असून अनेक ठिकाणी…
नांदेड,बातमी24:-मराठवाडा समनव्य समिती पुणे,याच्या वतीने दिला जाणारा या वर्षीचा मराठवाडा भूषण पुरस्कार सनदी अधिकारी तथा…
नांदेड,बातमी 24:-मागील अनेक वर्षांपासून किनवट व माहुर या दोन तालुक्यातील पेसा क्षेत्रातील रिक्त पदांचा अनुशेष…
नांदेड,बातमी24 : गेल्या 48 तासांपासून नांदेड जिल्ह्यावर आभाळ कोसळले असून रविवारी जिल्ह्याच्या 93 पैकी 45…
नांदेड, बातमी24:- नांदेड जिल्ह्यामध्ये मागील दोन दिवसापासून अतिवृष्टीमुळे पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झालेले आहे. अशा…
नांदेड,बातमी24 : नांदेड जिल्ह्यामध्ये गेल्या २४ तासांमध्ये पावसाने जोर धरला असून अजूनही पाऊस सुरू आहे.…