नांदेड,बातमी24:-कोरोनाच्या नव्या व्हेरीएंट ओमॅक्रोनची लाट दक्षिण आफ्रिकामध्ये निर्माण झाल्याने जगभर भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.या पार्श्वभूमीवर कोरोना लसीकरणाचा वेग वाढविण्यासाठी प्रशासनाच्या वतीने प्राथमिक विभागाच्या शाळा लांबणीवर टाकण्याचा निर्णय घेण्यात आला,असून शाळा 13 डिसेंबरपासून सुरू करण्याबाबत कळविण्यात आले आहे.
कोरोनाची दुसरी लाट ओसरल्यानंतर दैनंदिन व्यवहार सुरळीत होऊ लागले,त्याचसोबत माध्यमिक शाळा व महाविद्यालय सुरू झाले असून प्राथमिक विभागाच्या शाळा सुरू करण्याबाबत राज्य शासनाकडून 1 डिसेंबर पासून राज्यातील सर्व प्राथमिक विभागाच्या शाळा सुरू करण्याचे जाहीर करण्यात आले.
कोरोनाच्या तिसऱ्या लाटेचा संभाव्य धोका लक्षात घेता,शिक्षक व शिक्षकेत्तर कर्मचारी मंडळींचे शंभर टक्के लसीकरण करून घेण्याचा निर्णय प्रशासनाने घेतला आहे.याबाबत जिल्हाधिकारी,जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकारी व मनपा आयुक्त यांनी आढावा घेऊन यासंबंधी प्रसिध्दीपत्रक जाहीर करण्यात आले.
जिल्ह्यातील शिल्लक राहिलेल्या शिक्षण व शिक्षकेत्तर कर्मचारी यांचे 12 डिसेंबरपर्यंत लसीकरण पूर्ण करण्याचे उद्दिष्ट असून त्यानंतर ग्रामीण भागातील पहिली ते चौथी व शहरी भागातील पहिली ते सातवीपर्यतच्या शाळा 13 डिसेंबर रोजी सुरू होणार असल्याचे कळविण्यात आले.
जिल्ह्यातील यापूर्वी सुरू झालेल्या शाळा पूर्ववतपणे सुरू राहणार आहे.मात्र विध्यार्थी पालक यांचे सुद्धा लसीकरण दुसरा डोस घेतल्याचे प्रमाणपत्र सादर करावे लागणार आहे.
नांदेड,बातमी24:-लोकसभा निवडणुकीत दलित-मुस्लिम मतांवर विजयी साकारणाऱ्या काँग्रेसने यावेळी तिकीट विक्रीचे दुकान चालविले असून अनेक ठिकाणी…
नांदेड,बातमी24:-मराठवाडा समनव्य समिती पुणे,याच्या वतीने दिला जाणारा या वर्षीचा मराठवाडा भूषण पुरस्कार सनदी अधिकारी तथा…
नांदेड,बातमी 24:-मागील अनेक वर्षांपासून किनवट व माहुर या दोन तालुक्यातील पेसा क्षेत्रातील रिक्त पदांचा अनुशेष…
नांदेड,बातमी24 : गेल्या 48 तासांपासून नांदेड जिल्ह्यावर आभाळ कोसळले असून रविवारी जिल्ह्याच्या 93 पैकी 45…
नांदेड, बातमी24:- नांदेड जिल्ह्यामध्ये मागील दोन दिवसापासून अतिवृष्टीमुळे पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झालेले आहे. अशा…
नांदेड,बातमी24 : नांदेड जिल्ह्यामध्ये गेल्या २४ तासांमध्ये पावसाने जोर धरला असून अजूनही पाऊस सुरू आहे.…