नांदेड,बातमी24:-नांदेड जिल्ह्यात कोरोनाचे रोज येणारे आकडे नवा उचांक गाठत असून आजची आकडेवारी पुन्हा धक्का देणारी ठरली,असून शुक्रवारी 697 नवे रुग्ण आढळून आले आहेत, तर पाच जणांचा बळी कोरोनाच्या संसर्गाने घेतला आहे.नांदेड जिल्ह्यातील नागरीकांनी काळजी घेण्याचे आवाहन प्रशासनाकडून करण्यात येत आहे.
शुक्रवार दि.19 रोजी आलेल्या अहवालानुसार 3 हजार 126 नमुने तपासण्यात आले.यात 2 हजार 295 निगेटिव्ह तर 697 जणांचे अहवाल कोरोना पॉझिटिव्ह आले आहेत. आरटीपीसीआर चाचणीत 405 व अंटीजनमध्ये 292 नमूने पॉझिटिव्ह आले आहेत.
यात 348 जण नांदेड मनपा हद्दीमधील आहेत.तर उर्वरित 345 जण हे ग्रामीण भागातील आहेत.245 जणांना रुग्णालयातून सुट्टी देण्यात आली आहे.
आज रोजी पाच जणांचा मृत्यू झाला.यात चार पुरुष व एका महिलेचा समावेश आहे. मालेगाव रोडवरील शिवाजी नगर भागातील 57 वर्षीय पुरुष,स्वामी विवेकानंद नगर येथील 57 वर्षीय महिला,सिडको येथील 59 वर्षीय पुरुष,लोहा येथील 55 वर्षीय पुरुष तसेच मालेगाव रोडवरील 50 वर्षीय पुरुष दगावला. आतापर्यंत 632 जण मरण पावले आहेत.सध्या 4 हजार 170 जण उपचार घेत असून 51 जणांची प्रकृती गंभीर आहे.
नांदेड,बातमी24:-लोकसभा निवडणुकीत दलित-मुस्लिम मतांवर विजयी साकारणाऱ्या काँग्रेसने यावेळी तिकीट विक्रीचे दुकान चालविले असून अनेक ठिकाणी…
नांदेड,बातमी24:-मराठवाडा समनव्य समिती पुणे,याच्या वतीने दिला जाणारा या वर्षीचा मराठवाडा भूषण पुरस्कार सनदी अधिकारी तथा…
नांदेड,बातमी 24:-मागील अनेक वर्षांपासून किनवट व माहुर या दोन तालुक्यातील पेसा क्षेत्रातील रिक्त पदांचा अनुशेष…
नांदेड,बातमी24 : गेल्या 48 तासांपासून नांदेड जिल्ह्यावर आभाळ कोसळले असून रविवारी जिल्ह्याच्या 93 पैकी 45…
नांदेड, बातमी24:- नांदेड जिल्ह्यामध्ये मागील दोन दिवसापासून अतिवृष्टीमुळे पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झालेले आहे. अशा…
नांदेड,बातमी24 : नांदेड जिल्ह्यामध्ये गेल्या २४ तासांमध्ये पावसाने जोर धरला असून अजूनही पाऊस सुरू आहे.…