नांदेड, दि. 27 ऑगस्टः आरोग्य सेवा हीच रुग्ण व ईश्वर सेवा असते. हा मानवी दृष्टीकोन व निखळ समाजसेवा प्रेरणादायी मानली जाते. समाज सेवेचे व्रत अंगी बाळगत श्री. गुरुजी रुग्णालय सुरु करण्यात आले आहे. श्री. मथुराशांती प्रतिष्ठाण या नुतन व्यवस्थापनाचे माध्यमातून हे रुग्णालय, तब्बल दीडशे खाटांचे असे भव्य व सुसज्ज आहे. या रुग्णालयाकडून शासकीय नियमानुसार विनामूल्य वा अत्यंत माफक व किफायतशीर दरात रुग्णांना आरोग्य सेवा पुरविल्या जाणार असल्याची माहिती ‘‘श्री मथुराशांती प्रतिष्ठाण, नांदेडचे’’ अध्यक्ष डॉ. लक्ष्मीकांत बजाज यांनी यावेळी पत्रकारांशी संवाद साधताना दिली.
नांदेड येथील छत्रपती चौक, पूर्णा रोडवर असलेल्या श्री. गुरुजी रुग्णालय येथे शनिवार दि. 27 रोजी आयोजित करण्यात आलेल्या पत्रकार परिषदेत बोलताना, डॉ. लक्ष्मीकांत बजाज म्हणाले, की बदलत्या मानवी जीवन शैलीसोबत आरोग्याचे प्रश्न, गंभीर समस्या होत चालली आहे. त्यात वेगवेगळया प्रकाराच्या आजाराच्या संदर्भाने उपचार घ्यायचे झाले, की दर्जेदार आरोग्य सेवा-सुविधा माफक व किफायतशीर दरात कुठे व कशा मिळणार असा प्रश्न प्रत्येक रुग्ण व त्यांच्या नातेवाईकांसमोर आ वासून उभा असतो. यात रुग्णांवर पडणारा आर्थिक भार ही आजाराप्रमाणे तितकीच गंभीर बाब मानली जाते. या सगळया बाबींचा विचार करता श्री. मथुराशांती प्रतिष्ठाणच्या माध्यमातून श्री. गुरुजी रुग्णालय नव्या व्यवस्थापनाने सुरु करण्याचा निर्णय चार महिन्यांपूर्वी झाला. मागील तीन महिन्यांपासून हे रुग्णालय नव्या संचात, रुग्णसेवेत रूजू झाले आहे. नांदेड, परभणी व हिंगोली जिल्ह्यातील दीडशे खाटांचे सहकारी तत्वावर चालणारे हे परिसरातील एकमेव रुग्णालय असल्याचे डॉ. बजाज यांनी सांगितले.
कृ.मा.प
या रुग्णालयात सर्व व्याधीवर उपचार केले जाणार आहेत. यात प्रामुख्याने अस्थिरोग, मेडीसीन, बालरोग, स्त्री प्रसूती, मुत्ररोग, मेंदू विकार, ह्दयरोग, दंतरोग, शल्यचिकित्सा व फिजिओथेरपी,मधुमेह, रक्तदाब, एनआयसीयू, पीआयसीयू, हिमोफिलिया असे सर्व विविध विभाग अत्याधुनिकीकरनासह कार्यान्वित झाले आहे. अद्ययावत समजण्यात येणारी नवनवीन अत्याधुनिक उपकरणे ही दाखल झालेली आहेत. यांचे शुल्क मात्र सर्वात कमी आहे. या रुग्णालयात महात्मा फुले जनआरोग्य योजना/ प्रधानमंत्री जन आरोग्य योजने अंतर्गत तळागाळातील गरीब रुग्णांना उत्तमोत्तम आरोग्यसेवा विनामूल्य उपचार व शस्त्रक्रिया लाभ मिळण्याची सुविधा रुग्णालयाकडून दिली जाणार आहे. या योजनेत न बसणार्या इतर रुग्णांना सुद्धा कमी शुल्कात सर्वोत्तम आरोग्य सेवा देण्याचे ध्येय असल्याचे डॉ. लक्ष्मीकांत बजाज म्हणाले.
श्री. गुरुजी रुग्णालयात पाच ऑपरेशन थिएटर्स, अत्याधुनिक अतिदक्षता विभाग, सुसज्ज जनरल वार्ड, वातानुकुलित निवासी सुविधा असणार आहे. याकामी तज्ञ डॉक्टर्स त्यामध्ये भिनलेली निस्पृह सेवावृत्ती, सौजन्यपूर्ण मनुष्यबळ, नियोजनबद्ध कार्यप्रणाली आणि सर्व स्तरातील कर्मचारी यांच्या मध्ये असणारी सामाजिक बांधिलकी, यामुळे श्री गुरुजी रुग्णालय आरोग्य सेवा देणारे वैशिष्ट्यपूर्ण रुग्णालय आहे.
यावेळी श्री गुरुजी रुग्णालयातील डॉ. चांदू पाटील, डॉ. छाया गवाले, डॉ.दिनेश पवार, डॉ. हनुमंत पाटील, डॉ. श्रीराम श्रीरामे, डॉ. प्रदीप संगनोड, डॉ. रमण तोष्णीवाल, डॉ. अभिजित खरणारे, डॉ. कैलाश कंठेवाड, डॉ.प्रकाश पाटोदेकर, डॉ.संदीप दरबस्तवार, डॉ.अविनाश भारती, डॉ. अरुण महाले, डॉ.सविता उप्पोड, डॉ.अर्चना बजाज, डॉ.शेखर चौधरी, डॉ.नेहा जोशी, डॉ. शीतल मस्के, डॉ. गणेश कदम, डॉ. यामिनी कोकरे या रुग्णालयात कार्यरत डॉक्टरची उपस्थिती होती.
नांदेड,बातमी24:-लोकसभा निवडणुकीत दलित-मुस्लिम मतांवर विजयी साकारणाऱ्या काँग्रेसने यावेळी तिकीट विक्रीचे दुकान चालविले असून अनेक ठिकाणी…
नांदेड,बातमी24:-मराठवाडा समनव्य समिती पुणे,याच्या वतीने दिला जाणारा या वर्षीचा मराठवाडा भूषण पुरस्कार सनदी अधिकारी तथा…
नांदेड,बातमी 24:-मागील अनेक वर्षांपासून किनवट व माहुर या दोन तालुक्यातील पेसा क्षेत्रातील रिक्त पदांचा अनुशेष…
नांदेड,बातमी24 : गेल्या 48 तासांपासून नांदेड जिल्ह्यावर आभाळ कोसळले असून रविवारी जिल्ह्याच्या 93 पैकी 45…
नांदेड, बातमी24:- नांदेड जिल्ह्यामध्ये मागील दोन दिवसापासून अतिवृष्टीमुळे पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झालेले आहे. अशा…
नांदेड,बातमी24 : नांदेड जिल्ह्यामध्ये गेल्या २४ तासांमध्ये पावसाने जोर धरला असून अजूनही पाऊस सुरू आहे.…