नांदेड,बातमी24:- दिव्यांगाच्या कल्याणार्थ राबविण्यात येत असलेल्या योजनांची अमलबजावणी करण्यासाठी आवश्यक ती माहिती गट विकास अधिकारी यांच्याकडून वेळेवर प्राप्त होत नसल्याने समाजकल्याण सभापती ऍड.रामराव नाईक यांनी समिती बैठकीत तीव्र नाराजी व्यक्त केली.
जिल्हा परिषद समाजकल्याण समितीची बैठक मंगळवार दि.8 रोजी झाली होती.या ऑनलाईन बैठकीत दिव्यांगाच्या विविध योजनांसबंधी माहिती देण्यात यावी, याबाबत वेळोवेळी गट विकास अधिकारी यांना अवगत करण्यात आले आहे.तसा पत्रव्यवहार सुद्धा समाजकल्याण अधिकारी यांनी केलं आहे.मात्र गट विकास अधिकारी हे दिव्यांग बांधवांच्या योजना बाबत अक्षम्य दुर्लक्ष करत आहेत.
समितीच्या झालेल्या बैठकीत समिती सदस्य यांनी नाराजी व्यक्त केली आहे. यावर बोलताना ऍड.नाईक म्हणाले,की दिव्यांग योजनांची माहिती देण्यास टाळाटाळ करणाऱ्या गट विकास अधिकाऱ्यावर कारवाई करण्याचे निर्देश देण्यात आले आहे.सदरची योजना पुढील काही दिवसांमध्ये लागू करण्याबाबत पाउले उचलली जातील असे ऍड.नाईक यांनी सांगितले.
नांदेड,बातमी24:-लोकसभा निवडणुकीत दलित-मुस्लिम मतांवर विजयी साकारणाऱ्या काँग्रेसने यावेळी तिकीट विक्रीचे दुकान चालविले असून अनेक ठिकाणी…
नांदेड,बातमी24:-मराठवाडा समनव्य समिती पुणे,याच्या वतीने दिला जाणारा या वर्षीचा मराठवाडा भूषण पुरस्कार सनदी अधिकारी तथा…
नांदेड,बातमी 24:-मागील अनेक वर्षांपासून किनवट व माहुर या दोन तालुक्यातील पेसा क्षेत्रातील रिक्त पदांचा अनुशेष…
नांदेड,बातमी24 : गेल्या 48 तासांपासून नांदेड जिल्ह्यावर आभाळ कोसळले असून रविवारी जिल्ह्याच्या 93 पैकी 45…
नांदेड, बातमी24:- नांदेड जिल्ह्यामध्ये मागील दोन दिवसापासून अतिवृष्टीमुळे पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झालेले आहे. अशा…
नांदेड,बातमी24 : नांदेड जिल्ह्यामध्ये गेल्या २४ तासांमध्ये पावसाने जोर धरला असून अजूनही पाऊस सुरू आहे.…