नांदेड

समाज कल्याण सभापती नाईक यांनी चढविला काळा कोट

 

नांदेड,बातमी24:- नांदेड जिल्हा परिषद समाजकल्याण सभापती ऍड.रामराव नाईक हे सभापती झाल्यापासून जिल्हा परिषदेच्या कारभारात अधिक रमले आहेत.गुरुवार दि.25 रोजी देगलूर येथील न्यायालयात कोट
घालून हजर झाले.यातून पुन्हा आपल्या मूळ व्यवसायात वळण्याचे संकेत त्यांनी दिले.

नांदेड जिल्हा परिषदेवर देगलूर तालुक्यातील होट्टल जिल्हा परिषद गटातून ते सन 2017 साली काँग्रेस तिकीटकर विजयी झाले,त्यानंतर गत वर्षी ते समाजकल्याण सभापती म्हणून विराजमान झाले.दरम्यानचा वर्षेभराचा कार्यकाळ कोरोनामुळे हातरिकामा राहिला.

या दरम्यानच्या काळात ते जिल्हा परिषद व मतदार संघात सक्रिय राहिले,50 कोटी रुपयांची दलित वस्ती सुधार योजनेचे आदेश काढले,आता नव्याने 60 कोटी रुपयांची तयारी सुरू केली.याकडे सर्वांचे लक्ष लागले असताना,ऍड.नाईक यांनी काळ कोट घालून न्यायालयीन कामकाजात सहभाग नोंदविला.
पुन्हा जिल्हा परिषद निवडणूक न लढविण्याचा मानस अनेक वेळा ऍड.नाईक यांनी बोलून दाखवित आला, पुन्हा आपली वकिली बरी असे ते आवर्जून सांगत असतात, जिल्हा परिषद विद्यमान पदाधिकारी यांचा कार्यकाळ 8 ते 9 महिने राहिला आहे.त्यामुळे आपली वकिली जोमाने करू असे वाटत असल्याने वकिली व्यवसायातील सक्रिय होण्याचे संकेत त्यांनी दिले आहे.

जयपाल वाघमारे - संपादक

Recent Posts

सनदी अधिकारी वर्षा ठाकूर-घुगे यांना मराठवाडा भूषण पुरस्कार जाहीर

नांदेड,बातमी24:-मराठवाडा समनव्य समिती पुणे,याच्या वतीने दिला जाणारा या वर्षीचा मराठवाडा भूषण पुरस्कार सनदी अधिकारी तथा…

5 days ago

सीईओ करणवाल यांच्या पुढाकाराने शिक्षकांच्या रिक्त पदांचा प्रश्न निकाली;गुणवत्तेची चिंता मिटणार

नांदेड,बातमी 24:-मागील अनेक वर्षांपासून किनवट व माहुर या दोन तालुक्यातील पेसा क्षेत्रातील रिक्त पदांचा अनुशेष…

2 weeks ago

जिल्हयात अतिवृष्टीमुळे २ लाख हेक्टरपेक्षा अधिक क्षेत्र बाधित;९३ पैकी ४५ मंडळात अतिवृष्टी

नांदेड,बातमी24 : गेल्या 48 तासांपासून नांदेड जिल्ह्यावर आभाळ कोसळले असून रविवारी जिल्ह्याच्या 93 पैकी 45…

2 weeks ago

शेतकऱ्यांनी पीक नुकसानीची तक्रार 72 तासांच्या आत करावी:- जिल्हाधिकारी राऊत

नांदेड, बातमी24:- नांदेड जिल्ह्यामध्ये मागील दोन दिवसापासून अतिवृष्टीमुळे पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झालेले आहे. अशा…

3 weeks ago

नांदेड जिल्ह्यामध्ये अतिवृष्टी; नागरिकांना सतर्कतेचे जिल्हाधिकाऱ्यांचे आवाहन

नांदेड,बातमी24 : नांदेड जिल्ह्यामध्ये गेल्या २४ तासांमध्ये पावसाने जोर धरला असून अजूनही पाऊस सुरू आहे.…

3 weeks ago

नांदेड जिल्ह्याचे खासदार वसंतराव चव्हाण यांचे निधन

नांदेड,बातमी24:-नांदेड जिल्ह्याचे नवनिर्वाचित खासदार वसंतराव चव्हाण यांचे निधन झाले, ही वार्ता दि.26 सोमवारी सकाळी धडकली.त्याच्यावर…

4 weeks ago