नांदेड,बातमी24ः नांदेड जिल्हा परिषदेचे समाजकल्याण सभापती अॅड. रामराव नाईक हे भोकर विधानसभा मतदारसंघातील मुदखेड, अर्धापुर व भोकर तालुक्यतील प्रत्येक तांडा वस्तीवर जाऊन विविध समस्या व तांडयावरील लोकांच्या अडीअडचणी समजून घेत आहे. यासंबंधीचे जबाबदारी सार्वजनिक बांधकाममंत्री तथा पालकमंत्री अशोक चव्हाण यांनी त्यांच्यावर सोपविली आहे.
पालकमंत्री अशोक चव्हाण यांच्या आदेशानुसार अॅड. रामराव नाईक हे मागच्या पंधरा ते वीस दिवसांपासून नित्याने ग्रामीण भागाचा दौरा करत आहेत. या दौर्याच्या निमित्ताने दिवसाकाठी पाच ते दहा तांडयांना भेटी देऊन त्या ताडयाला मिळालेल्या विकास निधीची प्रशासकीय मान्यता त्या ताडयावरील नाईक व प्रमुख नागरिकांच्या स्वाधीन करून यापुढे तांडयावर काय-काय कामे प्रस्तावित करता येऊ शकतात, याचा आढावा घेऊन पालकमंत्री अशोक चव्हाण यांच्याकडे माहिती देण्याचे काम करत आहेत.
भोकर विधानसभा मतदारसंघातील बहुतांशी तांडे अॅड. रामराव नाईक यांनी भेटी देऊन पूर्ण केली आहे. अशोक चव्हाण यांनी सुद्धा या मतदारसंघात दलितवस्ती विकास योजनेअंतर्गत करोडो रुपयांचा निधी देऊ केला,असून प्रत्येक गावात समाजमंदिराच्या उभारणीचे कामे हाती घेतली आहे. तांडा विकासासह दलितवस्तीचा विकासाचा अजेंडा अशोक चव्हाण यांनी हाती घेतला, असून ही कामे दर्जेदार झाली पाहिजेत, यासंबंधीची जबादारी समाजकल्याण सभापती अॅड. रामराव नाईक यांच्यावर सोपविली असल्याचे सांगण्यात येते.
नांदेड,बातमी24:-लोकसभा निवडणुकीत दलित-मुस्लिम मतांवर विजयी साकारणाऱ्या काँग्रेसने यावेळी तिकीट विक्रीचे दुकान चालविले असून अनेक ठिकाणी…
नांदेड,बातमी24:-मराठवाडा समनव्य समिती पुणे,याच्या वतीने दिला जाणारा या वर्षीचा मराठवाडा भूषण पुरस्कार सनदी अधिकारी तथा…
नांदेड,बातमी 24:-मागील अनेक वर्षांपासून किनवट व माहुर या दोन तालुक्यातील पेसा क्षेत्रातील रिक्त पदांचा अनुशेष…
नांदेड,बातमी24 : गेल्या 48 तासांपासून नांदेड जिल्ह्यावर आभाळ कोसळले असून रविवारी जिल्ह्याच्या 93 पैकी 45…
नांदेड, बातमी24:- नांदेड जिल्ह्यामध्ये मागील दोन दिवसापासून अतिवृष्टीमुळे पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झालेले आहे. अशा…
नांदेड,बातमी24 : नांदेड जिल्ह्यामध्ये गेल्या २४ तासांमध्ये पावसाने जोर धरला असून अजूनही पाऊस सुरू आहे.…