नांदेड, बातमीः संत-महंत व महापुरुषांच्या कार्यातून समाजाची उभारणी व जगण्याचा मार्ग माणसाला मिळाला. त्यामुळे प्रत्येकासाठी आदर्श ठरणार्या प्रत्येक महापुरुषांचा पुतळा उभारण्याचे महानगर पालिका हद्दीत झाले. हे महापुरुषांच पुतळे महानगरातील सामाजिक एकोप्याचे प्रतिक असल्याचे प्रतिपादन सार्वजनिक बांधकाममंत्री तथा पालकमंत्री यांनी केले. कौठा भागातील महात्मा बसवेश्वर यांच्या अश्वारुद पुतळयाचे भूमिपुजनाप्रसंगी ते बोलत होते.
कौठा भागातील आयजी ऑफिससमोरील नियोजित महात्मा बसवेश्वर यांच्या आश्वारुद पुतळयाचे भूमिपूजन शनिवार दि. 15 ऑगस्ट रोजी पार पडले. ते बोलत होते. या वेळी व्यासपीठावर नांदेड उत्तरचे आमदार मोहन हंबर्डे, विधान परिषदेचे आमदार अमरनाथ राजूरकर, माजी पालकमंत्री डी.पी. सावंत,जिल्हापरिषद अध्यक्ष मंगाराणी अंबुलगेकर, महापौर दीक्षा धबाले, माजी आमदार ईश्वर भोसीकर,जिल्हाधिकारी डॉ.विपीन इटनकर, जिल्हा परिषद शिक्षण सभापती संजय बेळगे, माजी महापौर शैलजा स्वामी, किशोर स्वामी, हरिहरराव भोसीकर, संतोष पांडागळे, पंश्चिम बंगाल राज्यातील जिल्हाधिकारी श्रीनिवास पाटील, मनपा आयुक्त डॉ. सुनील लहाने, पोलिस अधीक्षक विजयकुमार मगर आदींची उपस्थिती होती.
अशोक चव्हाण म्हणाले, की समतेची पाईक महात्मा बसवेश्वर यांचा पुतळा नांदेड शहरात व्हावा, अशी आमची मनोमन इच्छा होती. परंतु काही अडचणी व अडकाठी आल्या. मात्र महाविकास आघाडीच्या सरकारने पुतळा उभारणीस मंजूरी दिली. त्यानुसार भूमिपूजन करण्यात आले. प्रत्येक शहरात प्रत्येक महापुरुषांचा पुतळा उभारण्यात आला आहे. असे आदर्श शहर बनविण्याचा प्रयत्न आम्ही केला आहे. नांदेड शहर हे समता, न्यायाचे प्रतिक बनत चालल्याचे गौरवाद्गार अशोक चव्हाण यांनी काढले. या वेळी इतर सर्व मान्यवरांची भाषणे झाली.
——-
कौठा परिसराचा कायापालट करू
कौठा परिसरातील नियोजित न्यायालय इमारतीची परवानगी मिळाली, असून या भागात प्रशासकीय इमारती आणण्याचा माझा मनोदय आहे. या भागाचा पुढील काळात कायापालट करण्याचे आश्वासन अशोक चव्हण यांनी दिले.
नांदेड,बातमी24:-लोकसभा निवडणुकीत दलित-मुस्लिम मतांवर विजयी साकारणाऱ्या काँग्रेसने यावेळी तिकीट विक्रीचे दुकान चालविले असून अनेक ठिकाणी…
नांदेड,बातमी24:-मराठवाडा समनव्य समिती पुणे,याच्या वतीने दिला जाणारा या वर्षीचा मराठवाडा भूषण पुरस्कार सनदी अधिकारी तथा…
नांदेड,बातमी 24:-मागील अनेक वर्षांपासून किनवट व माहुर या दोन तालुक्यातील पेसा क्षेत्रातील रिक्त पदांचा अनुशेष…
नांदेड,बातमी24 : गेल्या 48 तासांपासून नांदेड जिल्ह्यावर आभाळ कोसळले असून रविवारी जिल्ह्याच्या 93 पैकी 45…
नांदेड, बातमी24:- नांदेड जिल्ह्यामध्ये मागील दोन दिवसापासून अतिवृष्टीमुळे पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झालेले आहे. अशा…
नांदेड,बातमी24 : नांदेड जिल्ह्यामध्ये गेल्या २४ तासांमध्ये पावसाने जोर धरला असून अजूनही पाऊस सुरू आहे.…