नांदेड

बारगळ यांच्यासाठी प्रशासनाच्या पायघड्या; सीईओ वर्षा ठाकूर यांचे दुबळे प्रशासन!

 

नांदेड, बातमी24:- एखाद्या अधिकारी रुजू होतो,हे प्रशासन प्रमुख अँग्री ऑफिसर अशी ओळख बनविलेल्या वर्षा ठाकूर यांना माहीत न होणे हास्यास्पद बाब ठरली आहे. त्यामुळे बैठकीस आलेल्या अधिकाऱ्याची मानहानी सीईओ वर्षा ठाकूर यांच्या समोर झाली.हे प्रशासनाचे अपयश मानले जाते.

स्थायी समिती बैठक शुक्रवार दि.6 रोजी झाली. या बैठकीमध्ये सर्वाधिक चर्चा ठरली ती, प्रभारी कार्यकारी अभियंता म्हणून जिल्हा परिषद ग्रामीण पाणी पुरवठा विभागात रुजू झालेल्या बावस्कर यांच्या येण्याने होय.

शेकडो तक्रारी असलेल्या बारगळ यांच्या हकालपट्टी करून त्या जागी जीवन प्राधिकरण विभागाचे बावस्कर यांचे आदेश निघाले,मात्र चुकून कुलकर्णी असे आदेश पडले.

बारगळ यांच्या जागी बावस्कर हे रुजू गुरुवारी रुजू झाले. ते रुजू होण्यास प्रशासनाच्या सांगण्यावरूनच आले असावेत,एकतर्फी ते रुजू होऊ शकत नव्हते.कदाचित एकतर्फी रुजू झाले असतील तर प्रशासनाने यासंबंधी सीईओ वर्षा ठाकूर यांना अवगत करायला हवे होते.

बावस्कर हे स्थायी बैठकीस आले असता, त्या अधिकाऱ्यास आतंकवादी,नक्षलवादी अशी उपमा देत गुन्हे नोंद करा, अशी गरळ पदाधिकाऱ्यांची ओकली.

प्रशासनातील अधिकाऱ्यांनी बावस्कर यांच्या संबंधी बगला वर करण्याचा प्रयत्न दिसून आला.बावस्कर जाताच बारगळ हे खुर्चीला मुंगळ्या सारखे चिटकून बसले.बारगळ हे खुर्चीवर बसताच चिराग मिळाल्याचा आनंद मनातली मनात साजरा करत असल्याचे दिसून आले.
—–
सीईओ ठाकूर यांच्या दुबळेपणा समोर

वर्षा ठाकूर यांना कुणी अधिकारी रुजू झाल्याचे माहीत होत नाही किंवा त्यांना सामान्य प्रशासनकडून कळविले नसावे,याबद्दल आश्चर्य व्यक्त होत आहे. त्यावरून वर्षा ठाकूर यांच्या प्रशासनाचा दुबळेपणासमोर आला आहे.

जयपाल वाघमारे - संपादक

Recent Posts

सनदी अधिकारी वर्षा ठाकूर-घुगे यांना मराठवाडा भूषण पुरस्कार जाहीर

नांदेड,बातमी24:-मराठवाडा समनव्य समिती पुणे,याच्या वतीने दिला जाणारा या वर्षीचा मराठवाडा भूषण पुरस्कार सनदी अधिकारी तथा…

5 days ago

सीईओ करणवाल यांच्या पुढाकाराने शिक्षकांच्या रिक्त पदांचा प्रश्न निकाली;गुणवत्तेची चिंता मिटणार

नांदेड,बातमी 24:-मागील अनेक वर्षांपासून किनवट व माहुर या दोन तालुक्यातील पेसा क्षेत्रातील रिक्त पदांचा अनुशेष…

2 weeks ago

जिल्हयात अतिवृष्टीमुळे २ लाख हेक्टरपेक्षा अधिक क्षेत्र बाधित;९३ पैकी ४५ मंडळात अतिवृष्टी

नांदेड,बातमी24 : गेल्या 48 तासांपासून नांदेड जिल्ह्यावर आभाळ कोसळले असून रविवारी जिल्ह्याच्या 93 पैकी 45…

2 weeks ago

शेतकऱ्यांनी पीक नुकसानीची तक्रार 72 तासांच्या आत करावी:- जिल्हाधिकारी राऊत

नांदेड, बातमी24:- नांदेड जिल्ह्यामध्ये मागील दोन दिवसापासून अतिवृष्टीमुळे पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झालेले आहे. अशा…

2 weeks ago

नांदेड जिल्ह्यामध्ये अतिवृष्टी; नागरिकांना सतर्कतेचे जिल्हाधिकाऱ्यांचे आवाहन

नांदेड,बातमी24 : नांदेड जिल्ह्यामध्ये गेल्या २४ तासांमध्ये पावसाने जोर धरला असून अजूनही पाऊस सुरू आहे.…

3 weeks ago

नांदेड जिल्ह्याचे खासदार वसंतराव चव्हाण यांचे निधन

नांदेड,बातमी24:-नांदेड जिल्ह्याचे नवनिर्वाचित खासदार वसंतराव चव्हाण यांचे निधन झाले, ही वार्ता दि.26 सोमवारी सकाळी धडकली.त्याच्यावर…

4 weeks ago