नांदेड

उधापासून कडक नियमावली; भाजीपाला-फळविक्रेतेसह खाद्य दुकाने दुपारी 1 पर्यंतच

नांदेड,बातमी24:-  कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी प्रतिबंधात्मक उपाययोजना म्हणून नांदेड जिल्ह्यात दि.14 एप्रिल रोजी अत्यावश्यक सेवेबाबत प्रतिबंधात्मक उपाययोजना जाहीर केल्या होत्या. सदर अत्यावश्यक सेवेत असणाऱ्या ठिकाणी नागरिकांची मोठ्या प्रमाणात होणारी गर्दी लक्षात घेवून याबाबत गांभिर्याने निर्णय घेणे अत्यावश्यक झाले. जिल्ह्यातील कोरोनाचा वाढता संसर्ग लक्षात घेवून आता सोमवार दि. 19 एप्रिल 2021 पासून प्रतिबंधात्मक उपाययोजनेतंर्गत किराणा सामान दुकाने, भाजीपाला दुकाने, भाजीबाजार, फळविक्रेते, बेकरी, मिठाई, खाद्य दुकाने आणि सर्व प्रकारची खाद्य दुकाने या आस्थापना सकाळी 8 ते दुपारी 1 या वेळेतच सुरु राहतील. यानंतरच्या वेळेत केवळ घरपोच सेवा (होम डिलेव्हरी) साठी मुभा असेल, असे जिल्हादंडाधिकारी डॉ. विपीन इटनकर यांनी प्रतिबंधात्मक आदेशात सांगितले.

सदर आदेशाचे उल्लंघन केल्यास आपत्ती व्यवस्थापन अधिनियम 2005 व साथरोग नियंत्रण अधिनियम 1897 तसेच भारतीय दंड संहिता 1860 च्या कलम 188 प्रमाणे दंडनीय कारवाईस पात्र राहील.

जयपाल वाघमारे - संपादक

Recent Posts

आंबेडकरी चळवळीच लोक नेतृत्व असलेल्या सुरेश गायकवाड यांना काँग्रेसने डावलेले;वाळूमाफियाला उमेदवारी

नांदेड,बातमी24:-लोकसभा निवडणुकीत दलित-मुस्लिम मतांवर विजयी साकारणाऱ्या काँग्रेसने यावेळी तिकीट विक्रीचे दुकान चालविले असून अनेक ठिकाणी…

4 weeks ago

सनदी अधिकारी वर्षा ठाकूर-घुगे यांना मराठवाडा भूषण पुरस्कार जाहीर

नांदेड,बातमी24:-मराठवाडा समनव्य समिती पुणे,याच्या वतीने दिला जाणारा या वर्षीचा मराठवाडा भूषण पुरस्कार सनदी अधिकारी तथा…

2 months ago

सीईओ करणवाल यांच्या पुढाकाराने शिक्षकांच्या रिक्त पदांचा प्रश्न निकाली;गुणवत्तेची चिंता मिटणार

नांदेड,बातमी 24:-मागील अनेक वर्षांपासून किनवट व माहुर या दोन तालुक्यातील पेसा क्षेत्रातील रिक्त पदांचा अनुशेष…

3 months ago

जिल्हयात अतिवृष्टीमुळे २ लाख हेक्टरपेक्षा अधिक क्षेत्र बाधित;९३ पैकी ४५ मंडळात अतिवृष्टी

नांदेड,बातमी24 : गेल्या 48 तासांपासून नांदेड जिल्ह्यावर आभाळ कोसळले असून रविवारी जिल्ह्याच्या 93 पैकी 45…

3 months ago

शेतकऱ्यांनी पीक नुकसानीची तक्रार 72 तासांच्या आत करावी:- जिल्हाधिकारी राऊत

नांदेड, बातमी24:- नांदेड जिल्ह्यामध्ये मागील दोन दिवसापासून अतिवृष्टीमुळे पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झालेले आहे. अशा…

3 months ago

नांदेड जिल्ह्यामध्ये अतिवृष्टी; नागरिकांना सतर्कतेचे जिल्हाधिकाऱ्यांचे आवाहन

नांदेड,बातमी24 : नांदेड जिल्ह्यामध्ये गेल्या २४ तासांमध्ये पावसाने जोर धरला असून अजूनही पाऊस सुरू आहे.…

3 months ago