नांदेड,25- जिल्हा परिषद अंतर्गत सर्व शिक्षकांचे वेतन व भत्ते शालार्थ प्रणाली अंतर्गत आता सीएमपी प्रणालीचा अवलंब करून शिक्षकांच्या खात्यावर वेतन अदा करण्यात येणार आहेत, अशी माहिती जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी वर्षा ठाकूर-घुगे यांनी दिली आहे.
शालार्थ प्रणाली अंतर्गत शिक्षकांचे वेतन सीएमसी प्रणालीद्वारे करण्यात येणार आहे. या प्रणालीचे उद्घाटन मुख्य कार्यकारी अधिकारी तथा प्रशासक वर्षा ठाकूर-घुगे यांच्या हस्ते आज बुधवार दिनांक 25 मे रोजी करण्यात आले. जिल्हा परिषदेच्या कै. यशवंतराव चव्हाण सभागृहात हा कार्यक्रम संपन्न झाला. यावेळी मुख्य लेखा व वित्त अधिकारी शिवप्रकाश चन्ना, प्राथमिक विभागाच्या शिक्षणाधिकारी डॉ. सविता बिरगे, माध्यमिकचे शिक्षणाधिकारी प्रशांत दिग्रसकर, उप शिक्षणाधिकारी माधव सलगर, दिलीप बनसोडे आदींची यावेळी उपस्थिती होती.
यापूर्वी शिक्षकांचे वेतन व भत्ते ऑफलाइन पद्धतीने आदा करण्यात येत होते. त्यामुळे वेतन अदा करण्यास मोठ्या प्रमाणामध्ये विलंब होत होता. स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवी वर्षा निमित्त व शासनाच्या निर्णयानुसार शिक्षण विभागातील 11 हजार 600 शिक्षक व मुख्याध्यापकांचे सीएमपी झेडपी एफएमएस प्रणालीव्दारे वेतन आदा करण्यात येणार आहे. रोख व्यवस्थापन प्रणाली सॉफ्टवेअरद्वारे एका क्लिक मध्ये शिक्षकांचे वेतन त्यांच्या बँक खात्यात जमा होणार आहे.
सीएमपी प्रणालीची अंमलबजावणी करण्यासाठी जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी वर्षा ठाकूर-घुगे यांनी वेळोवेळी पाठपुरावा केला आहे. मुख्य लेखा व वित्त अधिकारी शिवप्रकाश चन्ना व शिक्षण अधिकारी डॉ. सविता बिरगे यांनी प्रधान्याने या प्रणालीव्दारे वेतन आदा करण्यासाठी प्रयत्न केले आहेत.
आज मुख्य कार्यकारी अधिकारी वर्षा ठाकूर-घुगे यांनी या प्रणालीचे उद्घाटन केले. या प्रणालीच्या एका क्लिकने आज सर्व शिक्षकांचे वेतन त्यांच्या खात्यात जमा झाले आहे. यापुढे नियमीत विनाविलंब या प्रणालीद्वारे वेळेत वेतन होणार असल्याची माहिती जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी वर्षा ठाकूर-घुगे यांनी यावेळी दिली. सीएमपी प्रणालीव्दारे वेळेत वेतन आदा होणार असल्यामुळे अनेक शिक्षकांनी आनंद व्यक्त करुन प्रशासनाचे आभार मानले आहेत. यावेळी शिक्षक संघटनेच्या पदाधिका-यांनी मुख्य कार्यकारी अधिकारी वर्षा ठाकूर-घुगे यांचा बुके देवून सत्कार केला.
नांदेड,बातमी24:-लोकसभा निवडणुकीत दलित-मुस्लिम मतांवर विजयी साकारणाऱ्या काँग्रेसने यावेळी तिकीट विक्रीचे दुकान चालविले असून अनेक ठिकाणी…
नांदेड,बातमी24:-मराठवाडा समनव्य समिती पुणे,याच्या वतीने दिला जाणारा या वर्षीचा मराठवाडा भूषण पुरस्कार सनदी अधिकारी तथा…
नांदेड,बातमी 24:-मागील अनेक वर्षांपासून किनवट व माहुर या दोन तालुक्यातील पेसा क्षेत्रातील रिक्त पदांचा अनुशेष…
नांदेड,बातमी24 : गेल्या 48 तासांपासून नांदेड जिल्ह्यावर आभाळ कोसळले असून रविवारी जिल्ह्याच्या 93 पैकी 45…
नांदेड, बातमी24:- नांदेड जिल्ह्यामध्ये मागील दोन दिवसापासून अतिवृष्टीमुळे पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झालेले आहे. अशा…
नांदेड,बातमी24 : नांदेड जिल्ह्यामध्ये गेल्या २४ तासांमध्ये पावसाने जोर धरला असून अजूनही पाऊस सुरू आहे.…