नांदेड

विद्यार्थ्यांचा इंग्रजी विषयाचा शिक्षकांनी सराव करून घ्यावा:सीईओ ठाकूर

नांदेड,बातमी24:-विद्यार्थ्यांना इंग्रजी बोलता येत नाही. इंग्रजीत लिहिता येत नाही म्हणून ते मागे पडतात .कुठलीही भाषा ही सरावाने अंगवळणी पडते म्हणून इंग्रजीचा अधिकाधिक सराव करून घेण्यासाठी छोट्या गोष्टी ,संभाषण, पत्र लेखन अशा कौशल्यावर भर देणारे अध्यापन शिक्षकांकडून अपेक्षित आहे, असे नांदेड जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी वर्षा ठाकूर- घुगे यांनी आज जिल्हा गुणवत्ता कक्षाच्या बैठकीत सांगितले.
नांदेड जिल्ह्यातील शैक्षणिक गुणवत्ता विकासाचा आढावा व पुढील नियोजनासाठी जिल्हा शैक्षणिक गुणवत्ता विकास बैठकीचे आयोजन करण्यात आले होते त्यावेळी त्या बोलत होत्या.

प्राथमिकचे शिक्षणाधिकारी प्रशांत दिग्रसकर यांनी या कार्यक्रमाची भूमिका सांगितली . प्रास्ताविक जिल्हा शिक्षण व प्रशिक्षण संस्थेचे प्राचार्य रवींद्र आंबेकर यांनी केले . यावेळी बोलताना मुख्य कार्यकारी अधिकारी वर्षा ठाकूर यांनी शैक्षणिक गुणवत्ता विकासाच्या संदर्भाने अनेक मुद्द्यांना स्पर्श केला . सध्याचे युग हे तंत्र युग आहे , त्यामुळे शिक्षकांनी तंत्रस्नेही असण्याबरोबर विद्यार्थ्यांनाही तंत्रस्नेही बनवणे गरजेचे आहे .असं सांगताना मुलांना साध्या संगणकाच्या प्रणाली, गुगल ओपन करणे, , वर्डमध्ये काही लिहिणे, चित्र रेखाटन करता येणे, ई-मेल वापरणे अशा साध्या गोष्टी करता येणे गरजेचे आहे. त्यासाठी विद्यार्थ्यांना पारंगत करता येईल असे वेगळे प्रयत्न करावेत ,अशी सूचना त्यांनी केली .
रूटीनमध्ये अडकून बसू नका , नाविन्यपूर्ण उपक्रमांचा ध्यास धरा यासाठी सर्व प्रयत्न गटशिक्षणाधिकार्‍यांनी करणे गरजेचे आहे . इंग्रजी भाषा आणि गणितात मुले मागे पडतात यासाठी मुलांच्या कुठल्या अडचणी आहेत त्या शाळास्तरावर शिक्षकांनी समजून घ्याव्यात. पर्यवेक्षकीय अधिकाऱ्यांनी शाळा भेटीदरम्यान या बाबी पाहणे गरजेचे आहे.
प्रत्येक शाळेत सुंदर ग्रंथालय असायला हवे .पुस्तकांची नीट मांडणी केलेली असावी . पुस्तकांचे वर्गीकरण केलेले असावे. अशा पुस्तकांची देवघेव विद्यार्थ्यांना होते का, विद्यार्थी वाचतात का, विद्यार्थ्याने वाचल्यावर त्यावर काही विद्यार्थ्यांनी प्रतिक्रिया दिल्या आहेत का, अशा पद्धतीने दस्तावेज ठेवून सर्व ग्रंथालय सुसज्ज करावेत .माझा गाव सुंदर गाव या अंतर्गत सर्व गाव पातळीवर स्वच्छतेचे अभियान सुरू आहे. शाळांनीही याच्यामध्ये सहभाग घेणे गरजेचे आहे. सर्व शाळांची रंगरंगोटी आणि स्वच्छता, अभिलेखे वर्गीकरण या बाबतीत काम केलेलं असलं पाहिजे . या बाबी स्वतः भेटी देऊन पाहणार असल्याचे त्यांनी सांगितले.
जे शिक्षक उत्तम काम करतात त्यांची नोंद घ्या .त्यांच्या यशकथा तयार करा असे सांगून शाळांमध्ये राबवावयाची शैक्षणिक पंचसूत्री त्यांनी सांगितली एक तास वाचनासाठी, प्रयोगशाळांचे क्रीयीकरण ,शिक्षक मित्र , स्पोकन इंग्लिश याबाबत अधिक काम होणे गरजेचे असल्याचे त्यांनी सूचित केले.
शाळाबाह्य मुलांची समस्या गंभीर आहे हे चित्र विदारक वाटते. शाळाबाह्य मुलांना शाळेत जाणं हा कोविड काळातील मोठा प्रश्न आहे. या प्रश्नाच्याप्रती अत्यंत गांभीर्याने काम करावे असे सांगून त्यांनी जिल्हा शिक्षण प्रशिक्षण संस्था व शिक्षण विभागांनी समन्वयाने एकत्रित काम करावे म्हणजे जिल्ह्यातील शैक्षणिक गुणवत्ता सिद्ध होईल अशी अपेक्षा त्यांनी व्यक्त केली .
विद्यार्थ्यांच्या आधार कार्डबाबत काम होणे गरजेचे आहे . विद्यार्थ्यांचे डुप्लिकेशन मोठ्या प्रमाणात आहे. हे शोधून काढा. ज्यांनी या बाबत जाणीवपूर्वक चुका केल्या आहेत त्यांच्यावर कारवाई प्रस्तावित करावी लागेल असेही संकेत त्यांनी दिले.

उत्तम शैक्षणिक काम केल्याबद्दल गटशिक्षणाधिकारी लोहा रवींद्र सोनटक्के व मुदखेड येथील शिक्षण विस्तार अधिकारी सुधीर गुट्टे यांचे यांचा यावेळी त्यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला.
? प्राचार्य रवींद्र आंबेकर यांनी डायट मार्फत घेण्यात येत असलेले उपक्रम शैक्षणिक गुणवत्ता विकासासाठीचे नियोजन आदींची माहिती दिली. डायटचे ज्येष्ठ अधिव्याख्याता जयश्री आठवले , माणिक जाधव , सुदर्शन चिटकुलवार यांनी उपक्रमांचे सादरीकरण केले. या सादरीकरणाचे मुख्य कार्यकारी अधिकारी यांनी कौतुक केले .माध्यमिकचे शिक्षणाधिकारी माधव सलगर, निरंतरचे शिक्षणाधिकारी दिलीप बनसोडे,डायटचे ज्येष्ठ अधिव्याख्याता श्रीकिशन देशमुख,अधिव्याख्याता चंद्रकांत धुमाळे , अतुल चंद्रमोरे, उमेश नरवाडे, अभय परिहार, ज्योत्स्ना धुतमल,चंद्रकांत धुमाळे, समग्र शिक्षा चे सहाय्यक कार्यक्रम अधिकारी विलास ढवळे ,अर्चना बागवाले , सर्व विषय सहाय्यक तालुक्यातील सर्व गटशिक्षणाधिकारी यांची यावेळी उपस्थिती होती.
.

जयपाल वाघमारे - संपादक

Recent Posts

सनदी अधिकारी वर्षा ठाकूर-घुगे यांना मराठवाडा भूषण पुरस्कार जाहीर

नांदेड,बातमी24:-मराठवाडा समनव्य समिती पुणे,याच्या वतीने दिला जाणारा या वर्षीचा मराठवाडा भूषण पुरस्कार सनदी अधिकारी तथा…

4 days ago

सीईओ करणवाल यांच्या पुढाकाराने शिक्षकांच्या रिक्त पदांचा प्रश्न निकाली;गुणवत्तेची चिंता मिटणार

नांदेड,बातमी 24:-मागील अनेक वर्षांपासून किनवट व माहुर या दोन तालुक्यातील पेसा क्षेत्रातील रिक्त पदांचा अनुशेष…

2 weeks ago

जिल्हयात अतिवृष्टीमुळे २ लाख हेक्टरपेक्षा अधिक क्षेत्र बाधित;९३ पैकी ४५ मंडळात अतिवृष्टी

नांदेड,बातमी24 : गेल्या 48 तासांपासून नांदेड जिल्ह्यावर आभाळ कोसळले असून रविवारी जिल्ह्याच्या 93 पैकी 45…

2 weeks ago

शेतकऱ्यांनी पीक नुकसानीची तक्रार 72 तासांच्या आत करावी:- जिल्हाधिकारी राऊत

नांदेड, बातमी24:- नांदेड जिल्ह्यामध्ये मागील दोन दिवसापासून अतिवृष्टीमुळे पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झालेले आहे. अशा…

2 weeks ago

नांदेड जिल्ह्यामध्ये अतिवृष्टी; नागरिकांना सतर्कतेचे जिल्हाधिकाऱ्यांचे आवाहन

नांदेड,बातमी24 : नांदेड जिल्ह्यामध्ये गेल्या २४ तासांमध्ये पावसाने जोर धरला असून अजूनही पाऊस सुरू आहे.…

3 weeks ago

नांदेड जिल्ह्याचे खासदार वसंतराव चव्हाण यांचे निधन

नांदेड,बातमी24:-नांदेड जिल्ह्याचे नवनिर्वाचित खासदार वसंतराव चव्हाण यांचे निधन झाले, ही वार्ता दि.26 सोमवारी सकाळी धडकली.त्याच्यावर…

4 weeks ago