नांदेड,बातमी24:- माजी आमदार किशनराव राठोड तथा भाजपचे विद्यमान आमदार डॉ.तुषार राठोड यांचे चुलत बंधू,पुतणे व सालगडी हे बसून गेलेली चार चाकी कार पुराच्या पाण्यामुळे पुलावरून वाहून गेली होती.यात सालगडी बचावला.मात्र कार सायंकाळी उशिरा सापडली.परंतु त्या पिता-पुत्राचा शोध लागला नव्हता. या दोघांचे प्रेत बुधवार दि.8 रोजी सकाळी आढळून आले.
भगवान किशन राठोड (वय.68 )व मुलगा संदीप भगवान राठोड (वय.38) व त्यांचा सालगडी देवकते हे तिघे नांदेडवरून मुखेडकडे जात असताना मोती नाल्यावरील पुलावरून कार वाहून पुराच्या पाण्यात वाहून गेली.यात सालगडी देवकते हे झाडावर चढल्याने ते त्यात बलाबाल बचावले.तर भगवान राठोड व त्यांचा पुत्र संदीप राठोड हे पुराच्या पाण्यात वाहून गेले.काल सायंकाळी उशिरापर्यंत मोहीम प्रशासनाने हाती घेतली होती.मात्र त्यांचा थांगपत्ता लागू शकला नव्हता.
पुराचे पाणी ओसरल्याने सकाळी भगवान राठोड यांचा मृतदेह नदीपात्रापासून जवळ असलेल्या एका शेतात तर संदीप राठोड यांचा मृतदेह नदीच्या पात्रातच आढळून आला.दोन्ही मृतदेह बाहेर काढून शवविच्छेदन करण्यासाठी मुखेड येथील उपजिल्हा रुग्णालयाकडे रवाना करण्यात आले,असून त्यानंतर अंत्यसंस्कार होणार असल्याचे समजते.
नांदेड,बातमी24:-लोकसभा निवडणुकीत दलित-मुस्लिम मतांवर विजयी साकारणाऱ्या काँग्रेसने यावेळी तिकीट विक्रीचे दुकान चालविले असून अनेक ठिकाणी…
नांदेड,बातमी24:-मराठवाडा समनव्य समिती पुणे,याच्या वतीने दिला जाणारा या वर्षीचा मराठवाडा भूषण पुरस्कार सनदी अधिकारी तथा…
नांदेड,बातमी 24:-मागील अनेक वर्षांपासून किनवट व माहुर या दोन तालुक्यातील पेसा क्षेत्रातील रिक्त पदांचा अनुशेष…
नांदेड,बातमी24 : गेल्या 48 तासांपासून नांदेड जिल्ह्यावर आभाळ कोसळले असून रविवारी जिल्ह्याच्या 93 पैकी 45…
नांदेड, बातमी24:- नांदेड जिल्ह्यामध्ये मागील दोन दिवसापासून अतिवृष्टीमुळे पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झालेले आहे. अशा…
नांदेड,बातमी24 : नांदेड जिल्ह्यामध्ये गेल्या २४ तासांमध्ये पावसाने जोर धरला असून अजूनही पाऊस सुरू आहे.…