नांदेड, बातमी24ः काँग्रेसचे आमदार अमरनाथ राजूरकर हे कोरोना पॉझिटीव्ह अन अधिकार्यांसह काही लोकप्रतिनिधीनी घाबरले होते. सुदैवाने यात कुणी अधिकारी व लोकप्रतिनिधी कोरोना पॉझिटीव्ह आला नाही. यापुढील संभाव्य धोका लक्षात घेता जिल्हाधिकारी कार्यालयातील अधिकारी-लोकप्रतिनिधींच्या बैठकींचा सिलसिल थांबणार की नाही, असा प्रश्न या निमित्ताने उपस्थितीत होत आहे.
नांदेड जिल्हयात कोरेानाच्या रुग्णांची संख्या झपाटयाने वाढत आहे. अकराशेच्या पुढे आकडा गेला आहे. या कोरोनाच्या संसर्गाची झळ यापूर्वीच माजी मुख्यमंत्री, सार्वजनिक बांधकाममंत्री अशोक चव्हाण यांना बसली. त्यानंतर आमदार मोहन हंबर्डे हे सुद्धा कोरोना पॉझिटीव्ह आले आहेत. आता विधान परिषद आमदार अमरनाथ राजूरकर हे पॉझिटीव्ह आले आहेत.
राज्य सरकारकडून ही कोरोनाचा संसर्ग पसरू नये, यासाठी ऑनलाईन बैठकांवर भर दिला जात आहे. अधिकार्यांच्या बैठका ही ऑनलाईन होत असताना नांदेड जिल्हयात मात्र बैठकावर बैठक होत आहेत. पालकमंत्री अशोक चव्हाण हे नांदेड जिल्ह्याच्या दौर्यावर आले, की बैठकावर बैठका जिल्हाधिकारी कार्यालयात लागतात. बैठक घेणे तिळ मात्र गैर नाही. विकास कामांना गती येते. मात्र अशा बैठका ऑनलाईन पद्धतीने घेता येऊ शकतात.
प्रत्यक्ष अधिकारी व लोकप्रतिनिधींनी एकत्र येऊन बैठका घेतल्यास कोरोनाचा धोका संभवू शकतो. यापूर्वी पालकमंत्री अशोक चव्हाण, आमदार मोहन हंबर्डे व आता अमरनाथ राजूरकर यांना कोरेाना झाला आहे. लोकप्रतिनिधींचा लोकासंग्रह मोठा असतो. गर्दीत राहावे लागते. या सगळया पार्श्वभूमिकचा विचार करता, संभाव्य धोका टाळण्यासाठी अधिकारी व लोकप्रतिनिधींच्या होणार्या बैठका न टाळता ऑनलाईन पद्धतीने घेतल्यास धोका टळू शकतो. यासाठी जिल्हाधिकारी डॉ.विपीन इटनकर व लोकप्रतिनधिनी सकारात्मक विचार केल्यास ऑनलाईन बैठका किंवा अगदी मोजक्या अधिकार्यांना बोलावून शक्य होऊ शकते.
नांदेड,बातमी24:-लोकसभा निवडणुकीत दलित-मुस्लिम मतांवर विजयी साकारणाऱ्या काँग्रेसने यावेळी तिकीट विक्रीचे दुकान चालविले असून अनेक ठिकाणी…
नांदेड,बातमी24:-मराठवाडा समनव्य समिती पुणे,याच्या वतीने दिला जाणारा या वर्षीचा मराठवाडा भूषण पुरस्कार सनदी अधिकारी तथा…
नांदेड,बातमी 24:-मागील अनेक वर्षांपासून किनवट व माहुर या दोन तालुक्यातील पेसा क्षेत्रातील रिक्त पदांचा अनुशेष…
नांदेड,बातमी24 : गेल्या 48 तासांपासून नांदेड जिल्ह्यावर आभाळ कोसळले असून रविवारी जिल्ह्याच्या 93 पैकी 45…
नांदेड, बातमी24:- नांदेड जिल्ह्यामध्ये मागील दोन दिवसापासून अतिवृष्टीमुळे पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झालेले आहे. अशा…
नांदेड,बातमी24 : नांदेड जिल्ह्यामध्ये गेल्या २४ तासांमध्ये पावसाने जोर धरला असून अजूनही पाऊस सुरू आहे.…