नांदेड

कोरोनामुळे वंचितच्या नेत्याचे निधन; गत विधानसभेचे होते उमेदवार

नांदेड, बातमी24ःकाही दिवसांपूर्वी कोरोनामुळे संक्रमित झालेले वंचित बहुजन आघाडीचे नेते तथा नांदेड उत्तर विधानसभा मतदारसंघातून उमेदवार राहिलेल्या मुकुंद चावरे यांचे शनिवार दि. 26 रोजी सायंकाळच्या सुमारास निधन झाले.

कोरोनाच्या संसर्गासह रुग्णांच्या मृत्यूचा आकडा ही वाढत आहे. यात काही दिवसांपूूर्वी मुकुंद चावरे हे कोरोना पॉझिटीव्ह आल्यानंतर त्यांच्यावर विष्णुपुरी येथील शासकीय रुग्णालयात उपचार सुरु होते. मात्र उपचारास प्रतिसाद न मिळू शकल्याने त्यांची प्राणज्योत सायंकाळी पाच वाजेच्या सुमारास मावळली.

मयत मुकुंद चावरे वंचित बहुजन आघाडीचे प्रमुख अ‍ॅड. प्रकाश आंबेडकर यांचे विश्वासू व निकटवर्तीय म्हणून ओळखले जात असत. यातूनच चावरे यांना सन 2019 साली झालेल्या विधानसभा निवडणुकीत नांदेड उत्तर विधानसभा मतदारसंघातून उमेदवारी देण्यात आली होती. या निवडणुकीत चावरे यांनी पंचविस हजाराहून अधिक मते मिळविली होती.आहेत.पश्चात पत्नी, तीन मुली व दोन मुले असा परिवार आहे. त्यांच्या पार्थिवावर उद्या अंत्यसंस्कार करण्यात येणार
——
मार्गदर्शक हरपला- प्रशांत इंगोले
मुकुंद चावरे हे चळवळीचा आक्रमक व निष्ठावंत चेहरा होते. त्यांच्यासोबत मला काम करण्याची संधी मिळाली. अ‍ॅड. प्रकाश आंबेडकर यांचे विश्वासू शिलेदारांपैकी एक होते. त्यांच्या जाण्याने पक्षाचे मोठे नुकसान झाल्याची भावना वंचित बहुजन आघाडीचे जिल्हाध्यक्ष प्रशांत इंगोले यांनी व्यक्त केली.

जयपाल वाघमारे - संपादक

Recent Posts

सनदी अधिकारी वर्षा ठाकूर-घुगे यांना मराठवाडा भूषण पुरस्कार जाहीर

नांदेड,बातमी24:-मराठवाडा समनव्य समिती पुणे,याच्या वतीने दिला जाणारा या वर्षीचा मराठवाडा भूषण पुरस्कार सनदी अधिकारी तथा…

4 days ago

सीईओ करणवाल यांच्या पुढाकाराने शिक्षकांच्या रिक्त पदांचा प्रश्न निकाली;गुणवत्तेची चिंता मिटणार

नांदेड,बातमी 24:-मागील अनेक वर्षांपासून किनवट व माहुर या दोन तालुक्यातील पेसा क्षेत्रातील रिक्त पदांचा अनुशेष…

2 weeks ago

जिल्हयात अतिवृष्टीमुळे २ लाख हेक्टरपेक्षा अधिक क्षेत्र बाधित;९३ पैकी ४५ मंडळात अतिवृष्टी

नांदेड,बातमी24 : गेल्या 48 तासांपासून नांदेड जिल्ह्यावर आभाळ कोसळले असून रविवारी जिल्ह्याच्या 93 पैकी 45…

2 weeks ago

शेतकऱ्यांनी पीक नुकसानीची तक्रार 72 तासांच्या आत करावी:- जिल्हाधिकारी राऊत

नांदेड, बातमी24:- नांदेड जिल्ह्यामध्ये मागील दोन दिवसापासून अतिवृष्टीमुळे पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झालेले आहे. अशा…

2 weeks ago

नांदेड जिल्ह्यामध्ये अतिवृष्टी; नागरिकांना सतर्कतेचे जिल्हाधिकाऱ्यांचे आवाहन

नांदेड,बातमी24 : नांदेड जिल्ह्यामध्ये गेल्या २४ तासांमध्ये पावसाने जोर धरला असून अजूनही पाऊस सुरू आहे.…

3 weeks ago

नांदेड जिल्ह्याचे खासदार वसंतराव चव्हाण यांचे निधन

नांदेड,बातमी24:-नांदेड जिल्ह्याचे नवनिर्वाचित खासदार वसंतराव चव्हाण यांचे निधन झाले, ही वार्ता दि.26 सोमवारी सकाळी धडकली.त्याच्यावर…

4 weeks ago