नांदेड,बातमी24:- नांदेड जिल्ह्यातील मृत्यूचा आकडा व मृत्यूशी झुंज देणाऱ्यांची संख्या कमी होण्याचे नाव घेत नाही.सोमवारी कोरोनामुळे सात जणांचा मृत्यू,58 जण हे मृत्यशी संघर्ष करत आहेत.
सोमवार दि. 14 रोजी 1 हजार 62 जणांची तपासणी करण्यात आली. यात 665 जणांचे अहवाल निगेटिव्ह तर 352 जणांचा स्वब हा कोरोना पॉझिटिव्ह आला आहे. त्यामुळे जिल्ह्यातील बाधित रुग्णांची संख्या 11 हजार 837 झाली आहे. यातील कोरोना मुक्त रुग्ण हे 7 हजार 796 रुग्ण बरे झाले, तर उपचार घेत असलेल्या रुग्णांची संख्या 3 हजार 769 एवढी आहे. यात अतिगंभीर रुग्ण हे 58 आहेत,तर मागच्या 24 तासात 7 जणांनी जीव सोडला आहे.
नांदेड शहरातील कैलास नगर येथील 60 वर्षीय इसमाचा दि.11 रोजी मृत्यू झाला.मुखेड येथील बालाजी मंदिर येथील 68 वर्षीय महिलेचा दि.13 रोजी, अर्धापूर येथील 58 इसमाचा दि.13 रोजी, हनुमान गड येथील 51 वर्षीय महिलेचा दि.13 रोजी,मगनपुरा येथील 65 वर्षीय 65 वर्षीय पुरुषाचा दि.14 रोजी,बजरंग कॉलोनी येथील 63 वर्षीय पुरुषाचा दि.14 रोजी,तर हदगाव तालुक्यातील गोजेगाव येथील 75 वर्षीय महिलेचा दि.14 रोजी मृत्यू झाला.त्यामुळे जिल्ह्यातील मृतांची संख्या 318 एवढी झाली आहे.
नांदेड,बातमी24:-लोकसभा निवडणुकीत दलित-मुस्लिम मतांवर विजयी साकारणाऱ्या काँग्रेसने यावेळी तिकीट विक्रीचे दुकान चालविले असून अनेक ठिकाणी…
नांदेड,बातमी24:-मराठवाडा समनव्य समिती पुणे,याच्या वतीने दिला जाणारा या वर्षीचा मराठवाडा भूषण पुरस्कार सनदी अधिकारी तथा…
नांदेड,बातमी 24:-मागील अनेक वर्षांपासून किनवट व माहुर या दोन तालुक्यातील पेसा क्षेत्रातील रिक्त पदांचा अनुशेष…
नांदेड,बातमी24 : गेल्या 48 तासांपासून नांदेड जिल्ह्यावर आभाळ कोसळले असून रविवारी जिल्ह्याच्या 93 पैकी 45…
नांदेड, बातमी24:- नांदेड जिल्ह्यामध्ये मागील दोन दिवसापासून अतिवृष्टीमुळे पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झालेले आहे. अशा…
नांदेड,बातमी24 : नांदेड जिल्ह्यामध्ये गेल्या २४ तासांमध्ये पावसाने जोर धरला असून अजूनही पाऊस सुरू आहे.…