Categories: नांदेड

जिल्हाधिकार्‍यांचा निर्णय ठरतोय महत्वाचा

नांदेड, बातमी24ः जिल्हाधिकारी डॉ. विपीन इटनकर यांनी चाचण्यांची गती  वाढविल्याने कोरोनाचे रुग्ण समोर येत आहे. त्यामुळे मागच्या काही दिवसांपासनू रुग्णांची संख्या वाढत आहे. ही रुग्ण संख्या बाहेर येणे महत्वाचे होते. त्यामुळे वेळेत उपचार आणि संसर्गावर मात करणे शक्य होणार आहे. परिणामी जिल्हाधिकारी डॉ. इटनकर यांचा निर्णय महत्वाचा ठरत आहे.

कोरोनाच्या चाचण्या पूर्वी आवश्यकतेप्रमाणे केल्या जात होत्या. कोरोनाचा रुग्ण आढळून आल्यास त्यांच्या संपर्कात आलेल्या किंवा एखाद्या रुग्णास कोरोनाचा संसर्गाची लक्षणे आढळून आल्यासच कोरोनाची चाचणी केली जात होती. त्यातली-त्यात आरटी-पीसीआर या चाचणीवर अवलंबून राहावे लागत होते. शिवाय या चाचणीसाठी लागणारा वेळ हा त्रासदायक ठरत होता. त्यामुळे अंटीजन किटव्दारे तात्काळी चाचणी लगेच अहवाल येत आहे.

या अंटीजन चाचणीमुळे तात्काळ कोरोनाची माहिती मिळत असल्याने लगेच उपचारास घेऊन जाणे शक्य होत आहे. यातून जो शांत वाहकाची साखळी तुटण्यास ही मोठी मदत होत आहे. आजघडिला कोरोनाच्या रुणांची संख्या झपाटयाने वाढत असल्याचे दिसत असले, तरी कालांतराने ही रुग्ण संख्या कमी-कमी होत जाणार हे अशी शक्यता दिसून येते. जिल्हाधिकारी डॉ. विपीन इटनकर यांचा रॅपीड चाचण्या वाढविण्याचा निर्णय महत्वाचा ठरत आहे.
——
चौकट
अंटीजन किटव्दारे होणारी तपासणी ही कंटेन्मेंट झोनमधील नागरिकांची तपासणी, रुग्णाच्या संपर्कात आलेल्या नागरिकांसाठी, तसेच पन्नास वर्षांवरील सर्व नागरिकांसाठी केली जात आहे.

जयपाल वाघमारे - संपादक

Recent Posts

सनदी अधिकारी वर्षा ठाकूर-घुगे यांना मराठवाडा भूषण पुरस्कार जाहीर

नांदेड,बातमी24:-मराठवाडा समनव्य समिती पुणे,याच्या वतीने दिला जाणारा या वर्षीचा मराठवाडा भूषण पुरस्कार सनदी अधिकारी तथा…

5 days ago

सीईओ करणवाल यांच्या पुढाकाराने शिक्षकांच्या रिक्त पदांचा प्रश्न निकाली;गुणवत्तेची चिंता मिटणार

नांदेड,बातमी 24:-मागील अनेक वर्षांपासून किनवट व माहुर या दोन तालुक्यातील पेसा क्षेत्रातील रिक्त पदांचा अनुशेष…

2 weeks ago

जिल्हयात अतिवृष्टीमुळे २ लाख हेक्टरपेक्षा अधिक क्षेत्र बाधित;९३ पैकी ४५ मंडळात अतिवृष्टी

नांदेड,बातमी24 : गेल्या 48 तासांपासून नांदेड जिल्ह्यावर आभाळ कोसळले असून रविवारी जिल्ह्याच्या 93 पैकी 45…

3 weeks ago

शेतकऱ्यांनी पीक नुकसानीची तक्रार 72 तासांच्या आत करावी:- जिल्हाधिकारी राऊत

नांदेड, बातमी24:- नांदेड जिल्ह्यामध्ये मागील दोन दिवसापासून अतिवृष्टीमुळे पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झालेले आहे. अशा…

3 weeks ago

नांदेड जिल्ह्यामध्ये अतिवृष्टी; नागरिकांना सतर्कतेचे जिल्हाधिकाऱ्यांचे आवाहन

नांदेड,बातमी24 : नांदेड जिल्ह्यामध्ये गेल्या २४ तासांमध्ये पावसाने जोर धरला असून अजूनही पाऊस सुरू आहे.…

3 weeks ago

नांदेड जिल्ह्याचे खासदार वसंतराव चव्हाण यांचे निधन

नांदेड,बातमी24:-नांदेड जिल्ह्याचे नवनिर्वाचित खासदार वसंतराव चव्हाण यांचे निधन झाले, ही वार्ता दि.26 सोमवारी सकाळी धडकली.त्याच्यावर…

4 weeks ago