नांदेड,बातमी24:- शिक्षणाने डॉक्टर तर सेवेने थेट सनदी अधिकारी असणाऱ्या जिल्हाधिकारी डॉ. विपीन इटनकर यांची प्रत्येक कृतीही सामाजिक जाणिव समृद्ध करणारी असते.श्री स्थापनेतून त्यांनी व त्यांच्या डॉक्टर सहचरणीने कोरोनामुक्तीसह इकोफ्रेंडली गणपती असा पर्यावरणमुक्तीचा संदेश दिला.
शुक्रवारी सर्वत्र गणरायाचे आगमन उत्सवपूर्ण वातावरणात आगमन झाले. गणेश मंडळ भक्तांनी सुद्धा कोरोना नियमांचे पालन करत श्री चे स्वागत केले. ठिकठिकाणी जसे मंडळांनी गणेश स्थापना केली, काही मंडळांनी सामाजिक संदेश देणारे देखावे बनवायला सुरुवात केली आहे. तसेच घरोघरी गणरायाची स्थापना झाली आहे, या निमित्ताने प्रत्येक घरात सजावटी साकारण्या आल्या आहेत.
नांदेड जिल्हाधिकारी डॉ.विपीन इटनकर यांच्या स्नेह या शासकीय निवासस्थानी डॉ. शालिनी इटनकर यांनी इकोफ्रेंडली गणपतीची स्थापना करण्यात आली असून या माध्यमातून पर्यावरणाचा संदेश देण्याचा प्रयत्न केला.तर मागच्या दीड वर्षापासून कोरोनाचा लढाईसाठी जीवाचे रान करून जिल्ह्यातील बाधितांचे देवदूत ठरणाऱ्या डॉ.विपीन इटनकर यांनी सुद्धा जाणीवपूर्वक कोरोनामुक्तीसाठी महत्वाचे असणाऱ्या लसीकरणं जनजागृती आणि मास्क बाबत जागर करणारा देखावा तयार केला आहे.
यामध्ये कोविड-19 लस घ्या नंतरच मोदक घ्या हा संदेश देत लसीकरणाची महत्व पटवून दिले आहे. त्याचसोबत मास्क नाही तर मोदक नाही,यातून मास्क घालणे किती महत्वाचे आहे,हे दर्शवण्याचा प्रयत्न केला.
——-
जिल्हाधिकाऱ्यांचे मंडळांना आवाहन
तिसऱ्या संभाव्य लाटेचा चर्चा सुरू असताना नांदेड जिल्ह्यातील नागरिकांनी अधिक सजग होऊन कोरोनाचा धोका हाणून पाडावा लागेल.यासाठी लसीकरण हा एकमेव पर्याय असू सोबत घराबाहेर पडताना मास्क वापरणे, गर्दी टाळणे व वारंवार हात धुणे महत्वाचे असल्याचे डॉ.विपीन इटनकर यांनी सांगत यासाठी नागरिकांनी पुढाकार घेण्याच आवाहन त्याांनी केेेलं
.
नांदेड,बातमी24:-लोकसभा निवडणुकीत दलित-मुस्लिम मतांवर विजयी साकारणाऱ्या काँग्रेसने यावेळी तिकीट विक्रीचे दुकान चालविले असून अनेक ठिकाणी…
नांदेड,बातमी24:-मराठवाडा समनव्य समिती पुणे,याच्या वतीने दिला जाणारा या वर्षीचा मराठवाडा भूषण पुरस्कार सनदी अधिकारी तथा…
नांदेड,बातमी 24:-मागील अनेक वर्षांपासून किनवट व माहुर या दोन तालुक्यातील पेसा क्षेत्रातील रिक्त पदांचा अनुशेष…
नांदेड,बातमी24 : गेल्या 48 तासांपासून नांदेड जिल्ह्यावर आभाळ कोसळले असून रविवारी जिल्ह्याच्या 93 पैकी 45…
नांदेड, बातमी24:- नांदेड जिल्ह्यामध्ये मागील दोन दिवसापासून अतिवृष्टीमुळे पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झालेले आहे. अशा…
नांदेड,बातमी24 : नांदेड जिल्ह्यामध्ये गेल्या २४ तासांमध्ये पावसाने जोर धरला असून अजूनही पाऊस सुरू आहे.…